आर्थिक व्यवहारांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे पॅन कार्ड (Permanent Account Number) आधार कार्डशी जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. नव्याने पॅन कार्ड काढण्यासाठीच्या नियमात (PAN card new rule) बदल करण्यात आला असून हा बदल 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT)याबाबतची माहिती दिली आहे. डिजिटायझेशनला प्रोत्साहन देणे आणि कर भरणा प्रणाली अधिक पारदर्शक करणे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.
(नक्की वाचा:जुनं पॅन कार्ड-ई पॅन आणि पॅन 2.0 मध्ये नक्की फरक काय?)
काय आहे नवीन नियम? (What is the new rule for PAN card )
1 जुलै 2025 पासून ज्यांना नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करायचा आहे, त्यांच्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य असेल. (PAN Aadhaar linking)आधार कार्डशिवाय नवीन पॅन कार्ड मिळणार नाही. पॅन कार्ड जारी करण्यासाठी आधार क्रमांकाची पडताळणी होणे गरजेचे आहे. ते झाल्याशिवाय पॅन कार्ड मिळणार नाही. नव्या नियमामुळे अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल असा दावा करण्यात आला आहे. सध्या पॅन कार्डासाठी अर्ज करत असताना जन्मतारखेचा पुरावा आणि इतर कागदपत्रे दिली तरी काम भागत होतं. मात्र आता आधार कार्डाशिवाय पॅन कार्ड मिळणार नाही.
(नक्की वाचा:घरबसल्या आधार कार्ड अपडेट कसं कराल? या स्टेप्स करा फॉलो!)
सध्याच्या पॅनकार्ड धारकांचे काय? (Deadline to link existing PAN with Aadhaar)
ज्यांच्याकडे सध्या पॅन कार्ड आहे आणि ज्यांनी 1 ऑक्टोबर 2024 पूर्वी आधार नोंदणी आयडी वापरून पॅन कार्ड मिळवले आहे, त्यांना पॅन आणि आधारची जोडणी करणे गरजेचे आहे.(Aadhaar PAN deadline) यासाठीची मुदत 31 डिसेंबर 2025 ही आहे, सध्याच्या घडीला पॅन-आधार लिंक करण्याची प्रक्रिया विनामूल्य आहे. प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार मार्च 2024 पर्यंत देशामध्ये पॅनकार्ड धारकांची संख्या 74 कोटी इतकी असून त्यापैकी 60.50 कोटी नागरिकांनी पॅन आणि आधार कार्ड जोडणी केलेली आहे.
पॅन आधार लिंक न केल्यास काय होईल?
अशी जोडणी केली नाही तर ते पॅन निष्क्रीय होईल ज्यामुळे नागरिकांना खालील गोष्टी करता येणार नाही
- आयकर रिटर्न (ITR) भरता येणार नाही.
- बँकेतील मोठे आर्थिक व्यवहार थांबतील.
- टीडीएस (TDS) आणि टीसीएस (TCS) जास्त दराने कापला जाईल.
- इन्कम टॅक्स रिफंड (परतावा) मिळणार नाही.
(नक्की वाचा:PAN कार्डमध्ये असतो तुमच्या नावाचाही समावेश, काय असतो नंबरचा अर्थ? )
आधार-पॅन कसे लिंक कराल?
आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन, पॅन आणि आधार ऑनलाइन लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला ठराविक शुल्क भरावे लागेल (काही विशिष्ट प्रकरणांमध्ये शुल्क माफ केले आहे). केंद्र सरकारने हा निर्णय बोगस पॅन कार्ड आणि त्याआधारे होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी तसेच करदात्यांची अचूक माहिती आयकर विभागाकडे उपलब्ध ठेवण्यासाठी घेतला आहे. केंद्र सरकारने पॅन 2.0 ही मोहीम (What is PAN 2.0 project?) सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांना डिजिटल स्वरुपात पॅन कार्ड दिली जाणार आहेत.