जाहिरात

काय आहे 2.0 पॅन कार्ड ? जुनं पॅन कार्ड-ई पॅन आणि पॅन 2.0 मध्ये नक्की फरक काय?

Pan 2.0 Upgraded Version: पॅनकार्डचे अपग्रेडेड 'पॅन 2.0' असणार अधिक सुरक्षित आणि फायदेशीर. जाणून घेऊया काय आहे 2.0 पॅन कार्ड, जुन्या पॅन कार्ड, ई-पॅन आणि पॅन 2.0 मध्ये नक्की फरक काय?

काय आहे 2.0  पॅन कार्ड ? जुनं पॅन कार्ड-ई पॅन आणि पॅन 2.0 मध्ये नक्की फरक काय?

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी  पॅन 2.0 प्रकल्पाची  घोषणा केली आहे. पॅनकार्ड हे महत्त्वाच्या दस्ताऐवजांपैकी एक आहे. आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्ड अतिशय महत्त्वाचे आहे.  बँकेतील अनेक महत्त्वाच्या कामांसाठी पॅन कार्डची गरज लागतेच. मात्र आता देशातील सर्व पॅनकार्ड अपग्रेड होणार आहेत. पण,  काय आहे 2.0  पॅन कार्ड ? आणि नवीन पॅनकार्ड मिळाल्यावर जुन्या पॅन कार्डचं काय करायचं? असे अनेक प्रश्न  उपस्थित होतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत. 

OLA Electric च्या 4 नवीन स्कूटर लॉन्च, किंमत अवघ्या 39,999 रुपयांपासून सुरु

(नक्की वाचा: OLA Electric च्या 4 नवीन स्कूटर लॉन्च, किंमत अवघ्या 39,999 रुपयांपासून सुरु)

पॅन 2.0 हे पॅनकार्डचे नवीन व्हर्जन आहे. त्याचप्रणाणे त्याचे फिचर्सही जु्न्या पॅनकार्डपेक्षा वेगळे असतील. मात्र कोणाच्याही पॅन नंबरमध्ये बदल होणार नाही. पॅनकार्ड नंबर तोच राहणार आणि पॅन 2.0 वर क्यूआर कोड असेल. त्याचबरोबर हे कार्ड पेपरलेस असेल.  हे पॅनकार्ड अन्य दस्ताऐवजांसोबतही लिंक असते. त्यामुळे क्यूआर कोड स्कॅन केल्यावर टॅक्स भरणाऱ्याची संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळते. माहितीचा सगळा डेटा हा एकाच ठिकाणी सेव असतो. त्यामुळे  QR कोड असलेल्या या पॅन कार्डमधून कर भरणं,  आर्थिक देवाणघेवाण, टीडीएस/टिसीएस क्रेडीट, आयकर रिटर्न, बँकेचं खातं सुरु करण्याची काम अगदी सोप्या पद्धतीनं होतात.

सध्या वापरात असलेले पॅन कार्ड हे  वैध राहील, फक्त जुनं फॅनकार्ड अपग्रेड करावं लागेल. नवं क्युआर कोडवालं पॅनकार्ड बनवण्यासाठी onlineservices.nsdl.com करावा लागेल. याशिवाय पॅनकार्ड केंद्रावर जाऊन अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर, 15 ते 20 दिवसात पॅनकार्डची डिलिव्हरी होते.

पश्चिम रेल्वेवर सुरु होणार 13 AC लोकल, वाचा संपूर्ण वेळापत्रक

(नक्की वाचा: पश्चिम रेल्वेवर सुरु होणार 13 AC लोकल, वाचा संपूर्ण वेळापत्रक)

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅनकार्डचे अपग्रेडेशन मोफत असणार आहे. त्यामुळे पॅनकार्डधारकाला कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही. या पॅन कार्ड सिस्टमला डिजिटली तयार करण्यात आलं आहे. ज्यामुळे कोणतीही तक्रार, व्यवहार, कर भरणे यांसारख्या अनेक गोष्टी लवकरात लवकर प्रोसेस करता येतात. त्याशिवाय नवीन पॅन कार्ड सिस्टीममधून फसवणूक करता येणार नाही किंवा खोटं पॅन कार्ड बनवता येणार नाही.  यामुळे हे पॅन कार्ड भविष्यात यूनिव्हर्सल आयडी म्हणून वापरता येणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com