जाहिरात

एकापेक्षा अधिक PAN CARD वापरताय? इतकी मोठी होईल दंडात्मक कारवाई, जाणून घ्या नियम  

Penalty For Multiple PAN Cards: नवीन नियमांनुसार जर तुम्ही डुप्लिकेट पॅन कार्ड सरकारकडे जमा न केल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो. जाणून पॅन कार्डशी संबंधित नवीन नियमांबाबतची माहिती...  

एकापेक्षा अधिक PAN CARD वापरताय? इतकी मोठी होईल दंडात्मक कारवाई,  जाणून घ्या नियम  

तुमच्याकडेही एकापेक्षा अधिक पॅन कार्ड (Multiple PAN Cards) आहेत तर वेळीच सावध व्हा. आयकर विभागाने आता डुप्लिकेट पॅन कार्ड बाळगणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांनुसार तुम्ही तुमच्याकडील डुप्लिकेट पॅन कार्ड सरकारकडे जमा केले नाही तर मोठ्या दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागू शकतो. पॅन कार्डशी संबंधित नियमांमध्ये काय बदल करण्यात आले आहेत? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहेत नवे नियम?

आयकर कायदा 1961 नुसार, कोणतीही व्यक्ती एकापेक्षा अधिक पॅनकार्ड बाळगू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीकडे डुप्लिकेट पॅन कार्ड असेल तर त्याला/तिला ते तात्काळ सरकारकडे जमा करावे लागेल. असे न केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. डुप्लिकेट पॅन कार्डचा मुद्दा सरकारने अतिशय गांभीर्याने घेतला आहे आणि डुप्लिकेट पॅन ओळखण्यासाठी तंत्रज्ञानामध्ये अधिक सुधारणा करण्यात येत आहे.  

'वन नेशन, वन  स्टुडंट आयडी', विद्यार्थ्यांसाठी APPAR ID महत्त्वाचे! जाणून घ्या कार्डचे महत्त्व आणि कसा कराल अर्ज?

(नक्की वाचा : 'वन नेशन, वन स्टुडंट आयडी', विद्यार्थ्यांसाठी APPAR ID महत्त्वाचे! जाणून घ्या कार्डचे महत्त्व आणि कसा कराल अर्ज?)

पॅन कार्ड  2.0 स्कीम काय आहे?

सरकारने नुकतेच पॅन कार्ड 2.0 योजनेस मंजुरी दिली आहे. ज्याचा उद्देश पॅन - टॅन (TAN) जारी करणे तसेच व्यवस्थापन सोपे आणि आधुनिक पद्धतीने करणे हा आहे. महत्त्वाचे म्हणजे या नवीन योजनेच्या माध्यमातून डुप्लिकेट पॅन कार्डची समस्या संपुष्टात आणणे आणि फसवणुकीला आळा घालणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे.

डुप्लिकेट पॅन असल्यास काय करावे?

एकापेक्षा अधिक पॅन कार्ड असल्यास तुम्हाला डुप्लिकेट पॅन कार्ड सरकारकडे जमा करावे लागेल. हे काम NSDL किंवा UTIITSL यांच्या माध्यमातून केले जाऊ शकते. यासाठी आवश्यक फॉर्म भरून जमा करावे लागतील. पण डुप्लिकेट पॅन कार्ड जमा करण्यापूर्वी तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड आणि बँक खात्याशी जोडलेले आहे की नाही? याची खात्री करून घ्यावी. तसेच टॅक्स रेकॉर्ड आणि गुंतवणुकीशी संबंधित सर्व माहिती योग्य आहे का? हे देखील तपासून घ्यावे. 

काय आहे 2.0  पॅन कार्ड ? जुनं पॅन कार्ड-ई पॅन आणि पॅन 2.0 मध्ये नक्की फरक काय?

(नक्की वाचा: काय आहे 2.0 पॅन कार्ड ? जुनं पॅन कार्ड-ई पॅन आणि पॅन 2.0 मध्ये नक्की फरक काय?)

दंडात्मक कारवाई का आणि किती दंड भरावा लागेल?

जर तुम्ही डुप्लिकेट पॅन कार्ड जमा केले नाही तर आयकर कायद्याच्या कलम 272B अंतर्गत तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. ही समस्या टाळण्यासाठी तातडीने डुप्लिकेट पॅन कार्ड सरकारकडे जमा करा.

सरकारची कडक नियम

सरकारला डुप्लिकेट पॅन कार्ड आणि पॅन कार्डशी संबंधित होणाऱ्या फसवणुकीची समस्या पूर्णपणे संपुष्टात आणायच्या आहेत. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेतला जात आहे, जेणेकरून एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असण्याच्या घटनांना आळा बसण्यास मदत मिळेल.

तुमच्याकडेही एकपेक्षा अधिक डुप्लिकेट पॅन कार्ड असतील तर याकडे दुर्लक्ष करू नका वेळीच ते सरकारकडे जमा करा.