Adani Airport Holdings : अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्सकडून ड्रॅगनपाससोबतची भागिदारी संपुष्टात

Adani Airport Holdings News : अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्सने विमानतळ लाऊंजमध्ये प्रवेश पुरवणारी कंपनी ड्रॅगनपाससोबतची भागीदारी त्वरित प्रभावाने समाप्त केली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

Adani Airport Holdings News : अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्सने विमानतळ लाऊंजमध्ये प्रवेश पुरवणारी कंपनी ड्रॅगनपाससोबतची भागीदारी त्वरित प्रभावाने समाप्त केली आहे.

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्सचा हा निर्णय त्यांनी भागीदारीची घोषणा केल्यानंतर जवळपास एका आठवड्यात आला आहे. अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्सने एका निवेदनात म्हटले आहे की, "ड्रॅगनपासच्या ग्राहकांना यापुढे अदाणी कंपनीकडून व्यवस्थापित करण्यात येणाऱ्या विमानतळांवरील लाऊंजमध्ये प्रवेश मिळणार नाही. या बदलाचा इतर ग्राहकांच्या विमानतळ लाऊंज आणि प्रवासाच्या अनुभवावर कोणताही परिणाम होणार नाही.'

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स आणि ड्रॅगनपासने गेल्या आठवड्यात भागीदारी केली होती, ज्यामध्ये ड्रॅगनपासला 'संपूर्ण भारतातील अदाणी व्यवस्थापित विमानतळांवरील लाऊंज तसेच इतर महत्त्वाच्या लाऊंजमध्ये प्रवेश' देण्यात आला होता.

ड्रॅगनपासकडून जगभरातील विमानतळ लाऊंजमध्ये प्रवेश पुरविला जातो.
 

(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)