Adani Energy Solutions FY26 Results: अदाणी समूहातील 'अदाणी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड'ने (AESL) गुरुवारी आपले आर्थिक वर्ष 2026 चे वार्षिक निकाल जाहीर केले. कंपनीने निव्वळ नफ्यात (Adjusted PAT) 32 टक्क्यांची उल्लेखनीय वाढ नोंदवत 2,393 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. प्रामुख्याने ट्रान्समिशन, स्मार्ट मीटरिंग आणि वितरण व्यवसायातील दुहेरी अंकी वाढीमुळे कंपनीला हे यश मिळाले आहे. ट्रान्समिशन आणि स्मार्ट मीटरिंग विभागांमधील दमदार वाढ आणि वितरण व्यवसायातील स्थिर कामगिरीमुळे EBITDA वार्षिक 12.7 टक्क्यांनी वाढून8,726 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला, असे अदाणी समूहाच्या कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे.
महिला सक्षमीकरणाचा 'स्वाभिमान'! अदाणी फाउंडेशन आणि माविमचा उपक्रम ठरला सुपरहीट, पाहा कसं मिळवलं यश
अदाणी एनर्जीची दमदार कामगिरी
कंपनीचे एकूण उत्पन्न 15.9 टक्क्यांनी वाढून 28,325 कोटी रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहे. 'EBITDA' मध्ये 12.7 टक्क्यांची वाढ होऊन तो 8.726 कोटी रुपये झाला आहे. चौथ्या तिमाहीत (Q4 FY26) कंपनीने मुंबई HVDC प्रकल्पासह पाच महत्त्वाचे ट्रान्समिशन प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. दोन HVDC प्रकल्प यशस्वीपणे राबवणारी अदाणी एनर्जी ही भारतातील एकमेव खाजगी कंपनी ठरली आहे.
स्मार्ट मीटरिंग क्षेत्रात कंपनीने 1 कोटी मीटर्स बसवण्याचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला आहे. सध्या कंपनीकडे 2.46 कोटी स्मार्ट मीटर्सची ऑर्डर बुक असून, त्यातून 29,519 कोटी रुपयांच्या महसुलाची क्षमता आहे. कंपनीचा भांडवली खर्च (Capex) मागील वर्षाच्या तुलनेत 1.24 पटीने वाढून 14, 232 कोटी रुपये झाला आहे. जपान क्रेडिट रेटिंग एजन्सीने कंपनीला 'BBB+' रेटिंग दिले असून, ही कामगिरी भारताच्या सोव्हेरिन रेटिंगशी सुसंगत आहे.
'तांत्रिक क्षमता अन् सामर्थ्याचे द्योतक'
"सातत्यपूर्ण कार्यान्वयन आणि शिस्तबद्ध भांडवली व्यवस्थापनाच्या जोरावर, आर्थिक वर्ष 2026 मध्ये आम्ही दमदार कामगिरी केली आहे याचा आम्हाला आनंद आहे. आर्थिक वर्ष 2026 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने मुंबई एचव्हीडीसी प्रकल्पासह पाच पारेषण प्रकल्प कार्यान्वित केले, ज्यामुळे आम्ही भारतातील एकमेव खाजगी क्षेत्रातील कंपनी ठरलो आहोत जिने दोन एचव्हीडीसी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. हे आमच्या सखोल तांत्रिक क्षमता आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या सामर्थ्याचे द्योतक आहे," असे अदाणी एनर्जी सोल्युशन्सचे सीईओ कंदर्प पटेल म्हणाले.
Adani Group: अदाणी समूहाची मोठी घोषणा! 60,000 कोटींचा प्लॅन; देशात 300 शाळा, 30 रुग्णालये उभारणार
त्याचबरोबर या वर्षात "आम्ही 1 कोटी स्मार्ट मीटर्सच्या स्थापनेचा महत्त्वाचा टप्पाही ओलांडला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावरील पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीतील आमचे नेतृत्व अधिक मजबूत झाले आणि उद्योगासाठी नवीन मापदंड स्थापित झाले. चौथ्या तिमाहीसाठी (Q4 FY26), एकूण उत्पन्न वार्षिक 15.0 टक्क्यांनी वाढून 7,588 कोटी रुपये झाले. या तिमाहीसाठी EBITDA वार्षिक 4.9 टक्क्यांनी वाढून 2,372 कोटी रुपये झाला, तर PAT 723 कोटी रुपये होता, जो आर्थिक वर्ष 2025 च्या चौथ्या तिमाहीतील 714 कोटी रुपयांच्या तुलनेत कमी आहे. समायोजित निव्वळ नफा (PAT) वार्षिक 27.7 टक्क्यांनी वाढून 566 कोटी रुपयांवरून 723 कोटी रुपयांवर पोहोचला, असेही पटेल यांनी नमुद केले आहे.