जाहिरात

Adani Group: अदाणी समूहाची मोठी घोषणा! 60,000 कोटींचा प्लॅन; देशात 300 शाळा, 30 रुग्णालये उभारणार

भारताच्या दीर्घकालीन प्रगतीत योगदान देणे हे आमचे उद्दिष्ट आहे." या शाळांमधून दर्जेदार शिक्षण आणि रुग्णालयांमधून प्रगत आरोग्य सेवा सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिली जाईल

Adani Group: अदाणी समूहाची मोठी घोषणा! 60,000 कोटींचा प्लॅन; देशात 300  शाळा, 30 रुग्णालये उभारणार

 Adani Group's Rs 60,000 investment plan: अदाणी समूहाने सामाजिक बांधिलकी जपत भारताच्या सामाजिक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी ६०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत देशभरात ३०० जागतिक दर्जाच्या शाळा आणि ३० अत्याधुनिक रुग्णालये उभारली जाणार आहेत, अशी माहिती अदाणी पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक करण अदाणी यांनी दिली. १३ मार्च रोजी नवी दिल्ली येथे आयोजित नेतृत्व शिखर परिषदेत ते बोलत होते.

पुढील १० वर्षांचे नियोजन

हा प्रकल्प पुढील १० वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने राबवला जाणार आहे. अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी २०२२ मध्ये त्यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त या दातृत्वाची घोषणा केली होती. 'सेवा हीच साधना' या तत्त्वावर आधारित हा उपक्रम शाश्वत आणि दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्यासाठी आखण्यात आला आहे.

Traffic Jam: मुंबई- गोवा महामार्गावर ट्रॅफिक जाम! 3 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; प्रवासाआधी वाचा डिटेल्स

आर्थिक प्रगतीसोबतच सामाजिक विकास

करण अदाणी यावेळी म्हणाले की, "पायाभूत सुविधा आर्थिक विकासाला चालना देतात, परंतु सामाजिक पायाभूत सुविधा राष्ट्राचा पाया मजबूत करतात. आमची जबाबदारी केवळ व्यवसाय उभारण्यापुरती मर्यादित नाही, तर भारताच्या दीर्घकालीन प्रगतीत योगदान देणे हे आमचे उद्दिष्ट आहे." या शाळांमधून दर्जेदार शिक्षण आणि रुग्णालयांमधून प्रगत आरोग्य सेवा सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिली जाईल.

अदाणी फाउंडेशनचे ३० वर्षांचे योगदान

या उपक्रमाची अंमलबजावणी अदाणी फाउंडेशनच्या माध्यमातून केली जाणार आहे. हे फाउंडेशन यंदा ऑगस्टमध्ये आपली ३० वर्षे पूर्ण करत आहे. फाउंडेशनने आतापर्यंत शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास आणि शाश्वत उपजीविका या क्षेत्रांत मोठे कार्य केले आहे. बंदरे, विमानतळ आणि ऊर्जा क्षेत्रातील विस्तार करत असतानाच, शाळा आणि रुग्णालयांच्या माध्यमातून संधींचा विस्तार करणे हे समूहाचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Gas Shortage: LPGसाठी राज्य सरकारची नियमावली! कुणाला किती गॅस मिळणार? 'या' संस्थांना 100 टक्के पुरवठा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com