अदाणी समूहाचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या अदाणी फाऊंडेशन तर्फे संपूर्ण देशभर रक्तदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. 24 जून रोजी अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांचा 62 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने या रक्तदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. 21 राज्यांत 152 शहरांमध्ये या रक्तदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
अदाणी हेल्थकेअरच्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेला कर्मचाऱ्यांकडून उदंड असा प्रतिसाद लाभला. या मोहिमेअंतर्गत 24,500 युनिट रक्त (अंदाजे 9,800 लिटर) जमा करण्यात आले. जमा करण्यात आलेल्या रक्ताचा 73,500 रुग्णांना फायदा होणार आहे. गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या मोहिमेमध्ये 20,621 युनिट रक्त जमा झाले होते, यंदाच्या वर्षी त्याहीपेक्षा जास्त युनिट रक्त जमा झाले आहे.
या रक्तदान मोहिमेला लाभलेल्या प्रतिसादाबद्दल अदाणी फाऊंडेशनच्या प्रमुख डॉ.प्रीती अदाणी यांनी समाधान व्यक्त केले असून त्यांनी या मोहिमेत सहभागी झालेल्या अदाणी समूहातील प्रत्येक रक्तदात्याचे आभार मानले आहेत. गरजूंना मदत व्हावी यासाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊन प्रयत्न करण्यासाठी सज्ज असतो, आणि ही मोहीम हा त्याच दृष्टीने उचललेले पाऊल आहे असे डॉ.प्रीती अदाणी यांनी म्हटले.
ही मोहीम रेड क्रॉसच्या रक्तपेढ्या आणि सरकारी रुग्णालयांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. जवळपास 2 हजार डॉक्टर्स, पॅरामेडीक्स, डेटा ऑपरेटर्स आणि अदाणी समूहातील कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी यांनी मिळून ही रक्तदान मोहीम यशस्वी केली. 2011 सालापासून अदाणी फाऊंडेशन दरवर्षी रक्तदान मोहीम आयोजित करत असते. अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही मोहीम आयोजित केली जाते.