अदाणी समूहाचे प्रमूख गौतम अदाणी यांनी अदाणी हेल्थ सिटी (AHC) एकात्मिक आरोग्य कॅम्पस सुरू करण्याची घोषणा केली आहे. अदाणी हेल्थ सिटीची निर्मिती अदाणी ग्रुपच्या नॉन-फॉर-प्रॉफिट हेल्थकेअर शाखाद्वारे केली जाईल. त्यासाठी अदाणी समूहाने यासाठी जगातील सर्वात मोठ्या ना-नफा वैद्यकीय समूह 'मेयो क्लिनिक'शी हातमिळवणी केली आहे. मुंबई आणि अहमदाबाद येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार असून 1000 खाटांची सोय उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलमध्ये परवडणाऱ्या दरात उपचार मिळतील, असे अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी जाहीर केले आहे.
गौतम अदाणी यांच्या सेवा साधना, सेवा प्रार्थना आणि सेवा ही परमात्मा या सामाजिक तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने, अदाणी कुटुंब देशभरातील सर्व स्तरांतील लोकांना परवडणारी, जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय शिक्षण आणण्याचा खर्च पूर्णपणे भागवेल.
मुंबई आणि अहमदाबादमध्ये यामधील दोन एकात्मिक आरोग्य कॅम्पस बांधण्यासाठी अदाणी कुटुंबाकडून 6,000 कोटींंपेक्षा जास्त देणगी देणार आहे. इतकंच नाही तर गौतम अदाणी यांनी देशातील शहरं आणि गावांमध्ये अशा प्रकारच्या एकात्मिक अदाणी आरोग्य शहरांसाठी योजना तयार केली आहे.
यामधील प्रत्येक एकात्मिक AHC कॅम्पसमध्ये 1,000 खाटांचे मल्टी-सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटल, 150 अंडरग्रेजुएट्स, 80+ रहिवासी आणि 40+ फेलो, स्टेप-डाउन आणि ट्रान्सिशनल केअर सुविधा आणि अत्याधुनिक संशोधन सुविधांसह वैद्यकीय महाविद्यालये यांचा समावेश असेल. AHC वैद्यकीय परिसंस्थेचा उद्देश सर्व सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील लोकांना सेवा देणे, डॉक्टरांच्या पुढील पिढीला प्रशिक्षित करणे आणि क्लिनिकल संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बायोमेडिकल इन्फॉर्मेटिक्सवर लक्ष केंद्रित करणे हे आहे.
अदाणी समूह अमेरिकेतील मेयो क्लिनिक ग्लोबल कन्सल्टिंग (मेयो क्लिनिक) च्या सहकार्यानं ही योजना करणार आहे. मेयो क्लिनिक डिजिटल आणि माहिती तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवा गुणवत्ता वाढीवर लक्ष केंद्रित करणार आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या एकत्रिकरणावर त्यामधील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.
( नक्की वाचा : गौतम अदाणी यांची मुलाच्या विवाहानिमित्त आदर्श कृती, सामाजिक कामांसाठी 10 हजार कोटींची मदत )
समाजातील प्रत्येकाला जागतिक दर्जाची आरोग्यसेवा
दोन वर्षांपूर्वी, माझ्या 60 व्या वाढदिवशी मला भेट म्हणून, माझ्या कुटुंबाने आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकासात सुधारणा करण्यासाठी 60,000 कोटी देण्याचं वचन दिलं होतं, अशी आठवण गौतम अदाणी यांनी यावेळी सांगितली.
या योगदानातून अदानी हेल्थ सिटीचा विकास हा अनेक मोठ्या प्रकल्पांपैकी पहिला प्रकल्प आहे, जो भारतीय समाजातील प्रत्येक घटकातील लोकांना परवडणारी, जागतिक दर्जाची आरोग्यसेवा पुरविण्याच्या दिशेने खूप मोठा पल्ला गाठेल. मेयो क्लिलिकसोबतच्या आमच्या सहकार्यातील गंभीर रोगांवरील उपचार तसंच वैद्यकीय नवकल्पनांन भर देऊन, देशातील आरोग्यसेवा उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास अदाणी यांनी यावेळी व्यक्त केला.
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)