Covishield नंतर Covaxin चे साईड इफ्केट्स उघड, वाचा काय आहे धक्कादायक गौप्यस्फोट

Side effects in Covaxin recipients : कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिन लस घेणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील साईड इफेक्ट्स समोर आले आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

New study finds side effects in Covaxin recipients : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आता कमी झालेला असला तरी त्यामुळे झालेलं नुकसान अद्याप भरुन निघालेलं नाही. या व्हायरसचा सामना करण्यासाठी कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लस देशातील बहुतेकांना देण्यात आल्या आहेत. त्यापैकी कोव्हिशिल्ड लस घेणाऱ्यांना साईड इफेक्टचा फटका बसला असल्याचं काही दिवसांपूर्वीच उघड झालंय. ही लस बनवणाऱ्या ब्रिटनमधील कंपनीनं देखील याची कबुली दिलीय. त्यापोठापाठ आता कोवॅक्सिन लस घेणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील साईड इफेक्ट्स समोर आले आहेत. बनारस हिंदू विद्यापीठाच्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती उघड झालीय. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भारत बायोटेककडून बनवण्यात आलेल्या या कोवॅक्सिनचा बनारस हिंदू विद्यापीठातील संखा चक्रवर्ती आणि त्यांच्या टीमनं अभ्यास केला. या अभ्यासाचा रिपोर्ट स्प्रिंगल लिंक (SpringerLink) जर्नलमध्ये प्रकाशित झालाय. त्यानुसार कोवॅक्सिन घेणाऱ्या व्यक्तींना एक वर्षांपर्यंत साईड इफेक्ट्स दिसल्याचं या अभ्यासात स्पष्ट करण्यात आलंय.

कोणते साईड इफेक्ट्स आढळले?

कोवॅक्सिन घेणाऱ्या 1024 जणांचा यामध्ये अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये 635 किशोरवयीन तर 391 तरुणांचा समावेश होता. एक वर्षानंतर या सर्वांचं फॉलोअप चेकअप करण्यात आलं. त्या चेकअपचे साईड इफेक्ट्स आता समोर आले आहेत.

304 म्हणजेच जवळपास 48 टक्के किशोरवयीन मुलांमध्ये 'Viral Upper Respiratory Tract Infection' आढळले.  124 तरुणांमध्येही हे साईड इफेक्ट्स आढळले आहेत. 10.5 किशोरवयीन व्यक्तींमध्ये त्वचेसंबंधी विकार, सामान्य विकार 10.2 टक्के तर मज्जासंस्थेचे विकार 4.7 टक्के किशोरवयीन व्यक्तींमध्ये आढळले आहेत. 

Advertisement

( नक्की वाचा : कोव्हिशिल्ड लसीमुळे Heart Attack चा धोका? वाचा कंपनीनं कोर्टात काय सांगितलं )
 

प्रौढ व्यक्तींमध्ये आढळलेल्या साईड इफेक्ट्सची माहिती देखील यामध्ये देण्यात आली आहे. त्यानुसार सामान्य विकार (8.9 टक्के), मज्जासंस्थांचे विकार 5.5 टक्के आणि स्नायू आणि सांधे विकाराचं प्रमाण 5.8 टक्के तरुणांमध्ये आढळलं आहे.  

या अभ्यासात सहभागी झालेल्या 4.6 टक्के महिलांमध्ये मासिक पाळीत अनियमितता आढळून आली. डोळ्यासंबंधीचे विकार 2.7 टक्के तर हाइपोथाराडियमचे विकार 0.6 टक्के आढळले आहेत.  1 टक्के लोकांमधील साईड इफेक्ट्सचं प्रमाण गंभीर असल्याचं या आजारात स्पष्ट करण्यात आलंय. 

Advertisement