जाहिरात
This Article is From Apr 30, 2024

कोव्हिशिल्ड लसीमुळे Heart Attack चा धोका? वाचा कंपनीनं कोर्टात काय सांगितलं

कोरोना व्हायरस (Coronavirus) रोखण्यासाठी देण्यात आलेल्या कोव्हिशिल्ड लसीमुळे (covishield vaccine) मानवी शरिरावर दुष्परिणाम होऊ शकतात, अशी धक्कादायक कबुली या लसीची निर्मिती करणाऱ्या कंपनीनं दिली आहे

कोव्हिशिल्ड लसीमुळे Heart Attack चा धोका?  वाचा कंपनीनं कोर्टात काय सांगितलं
मुंबई:

कोरोना व्हायरस (Coronavirus) रोखण्यासाठी देण्यात आलेल्या कोव्हिशिल्ड लसीमुळे (covishield vaccine) मानवी शरिरावर दुष्परिणाम होऊ शकतात, अशी धक्कादायक कबुली या लसीची निर्मिती करणाऱ्या कंपनीनं दिली आहे. अ‍ॅस्ट्राझेनेका या कंपनीनं ब्रिटनमधील न्यायालयात ही कबुली दिलीय.  

या लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमसह (TTS) थ्रोम्बोसिस हा दुर्लभ विकार होऊ शकतो, अशी कबुली या कंपनीनं दिलीय. यामध्ये शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात तसंच प्लेट लेटची संख्या कमी होते. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो, असं कंपनीनं मान्य केलंय. हे दुष्परिणाम क्वचितच होऊ शकतात, असं कंपनीनं कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. 'अ‍ॅस्ट्राझेनेका' विरोधात सुरु असलेल्या खटल्यामध्ये कंपनीनं लसीचे दुष्परिणाम मान्य केल्यानं जगभर खळबळ उडाली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोव्हिशिल्ड लसची निर्मिती ब्रिटनमधील अ‍ॅस्ट्राझेनेका -ऑक्सफर्ड विद्यापीठानं भारतामधील सिरम इन्स्टिट्यूटच्या मदतीनं केली होती. भारतासह जगभरात कोरना व्हायरसच्या कालखंडात या लशीचा डोस अनेक भारतीयांना देण्यात आला होता. त्याचबरोबर जगभर या लशीचं वितरण करण्यात आलं होतं. 

काय आहे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम?

थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) हा दुर्लभ आजार आहे. यामध्ये शरिरातील काही भागात रक्ताच्या गाठी बनतात. तसंच प्लेटलेटसची संख्या कमी होती. हे शरिरासाठी धोकादायक असू शकतो. या आजरांच्या लक्षणांमध्ये डोकेदुखीचा मोठ्या प्रमाणात त्रास होणे, पाय सुजणे, श्वास घेण्यात त्रासयाचा समावेश आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये लस घेतल्यानंतर ही लक्षणं आढळली तर त्यांनी तातडीनं डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. 

अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीनं दिलेल्या कबुलीमुळे त्यांना ब्रिटनमध्ये अनेक खटल्यांना सामोरं जावं लागू शकतो. ब्रिटनमधील न्यायालयातील कंपनीच्या विरोधात 51 खटले दाखल करण्यात आले आहे. यामध्ये पीडित व्यक्तीनं 100 मिलियन पौंडपर्यंत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. 

( नक्की वाचा : हातगुण कुणाचा चांगला? महिला डॉक्टरांचा की पुरुष डॉक्टरांचा; संशोधनातून मोठा खुलासा )
 

या प्रकरणातील पहिला याचिकाकर्ता जेमी स्कॉटनं एप्रिल 2021 मध्ये कोव्हिशिल्ड लस घेतली होती. त्यानंतर आपल्याला ब्लड क्लॉटिंगचा त्रास होतोय. तसंच कपाळावर कायमची जखम झालीय, असा आरोप केलाय. आपल्याला काम करण्यास प्रचंड त्रास होतो, असा दावाही त्यांनी केलीय. या प्रकरणातील सुनावणीच्या दरम्यान अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीनं ही कबुली दिली आहे. त्यामुळे पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई मिळू शकते. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com