भारत सरकारने दहशतवादाविरुद्धचे त्यांचे ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे सरकार आपले संरक्षण बजेट आणखी वाढवण्याचा विचार करत आहे. लवकरच संरक्षण अर्थसंकल्पाकडून अतिरिक्त तरतूद केली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सशस्त्र दलांच्या गरजा, आवश्यक खरेदी आणि संशोधन विकासासाठी ही अतिरिक्त तरतूद केली जाऊ शकते. ही अतिरिक्त तरतूद नवीन शस्त्रे आणि दारूगोळा, तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी खर्च करायची आहे. भविष्यातील धोके ओळखून भारत सरकार देशाच्या सुरक्षिततेवर भर देत आहे.
(नक्की वाचा- Donald Trump U Turn ट्रम्प पलटले,आता म्हणतात मी शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी केली नाही)
संरक्षण बजेट किती?
वर्ष | संरक्षण बजेट (कोटींमध्ये) |
2014-15 | 2,29,000 कोटी रुपये |
2015-16 | 2,46,727 कोटी रुपये |
2016-17 | 3,40,921 कोटी रुपये |
2017–18 | 3,59,854 कोटी रुपये |
2018–19 | 4,04,365 कोटी रुपये |
2019-20 | 4,31,011 कोटी रुपये |
2020–21 | 4,71,378 कोटी रुपये |
2021-22 | 4,78,196 कोटी रुपये |
2022-23 | 5,25,166 कोटी रुपये |
2023-24 | 5,93,538 कोटी रुपये |
2024-25 | 6,21,941 कोटी रुपये |
2025-26 | 6,81,210 कोटी रुपये |
संरक्षण मंत्रालयचा 50 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त तरतुदीचा प्रस्ताव असेल. हिवाळी अधिवेशनात अतिरिक्त निधीसाठी मंजुरी मिळू शकते. यावर्षी संरक्षण बजेट विक्रमी 6.81 लाख कोटी रुपये होते. मोदी सरकार आल्यापासून गेल्या दहा वर्षांत संरक्षण बजेटमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. संरक्षण बजेटमध्ये जवळपास तीन पट वाढ झाली आहे. 2014-15 मध्ये संरक्षण बजेट 2.69 लाख कोटी होते. यावेळी ते 6.81 लाख कोटी रुपये आहे, जे एकूण बजेटच्या 13.45 टक्के आहे. इतर सर्व मंत्रालयांमध्ये संरक्षणाचे बजेट सर्वाधिक आहे.
(नक्की वाचा- India-Pakistan : पाकिस्तानला आली शांतीची आठवण; शाहबाज शरीफांकडून चर्चेचा प्रस्ताव)
पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त
7 मे रोजी लष्कराने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ला केला होता आणि तेथील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. या लष्करी कारवाईत 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. तसेच, मोठ्या संख्येने दहशतवादी जखमी झाले. या कारवाईनंतर, लष्कराने स्पष्ट केले की त्यांनी फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरच हल्ला केला होता. मात्र त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने लष्करी हल्ले केले. त्याला भारताने चोख उत्तर देत पाकिस्तानची जिरवली.