Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना नेणारं विमान कोसळलं, वाचा आत्तापर्यंतचे देशातील मोठे अपघात

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमधील भीषण विमान अपघातानंतर देशभरात आजवर झालेल्या विमान अपघाताच्या कटू आठवणी जाग्या झाल्या आहेत. 

जाहिरात
Read Time: 3 mins
Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना नेणारं विमान टेक ऑफ करताच कोसळलं.
मुंबई:

Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना नेणारं विमान टेक ऑफ करताच कोसळलं. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. विमानानं उड्डाण करताच ते कोसळलं. अपघातामधील जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तसंच बचाव पथक घटनास्थळी दाखल झालंय. 

अहमदाबादमधील या भीषण विमान अपघातानंतर देशभरात आजवर झालेल्या विमान अपघाताच्या कटू आठवणी जाग्या झाल्या आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

 Air India Express Flight IX-1344, कोझिकोड  2020

7 ऑगस्ट २०२० रोजी झालेला एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट आयएक्स-1344 ला हा अपघात झाला. कोव्हिड-19 च्या साथीच्या आजारात परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 'वंदे भारत मिशन' अंतर्गत दुबईहून कोझिकोड (कालिकत) येथे येत असताना, बोइंग 737-800 हे विमान जोरदार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे कोझिकोडच्या 'टेबलटॉप' धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत असताना घसरले. ते ३० फुटांच्या दरीत कोसळले आणि त्याचे दोन तुकडे झाले. या अपघातात दोन्ही वैमानिकांसह 21 जणांचा मृत्यू झाला. तर 100 हून जास्त जखमी झाले. 

Air India Express Flight IX-812 – मंगळूरु,  2010

22 मे 2010 रोजी मंगळूरु आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट आयएक्स-812 हे विमान कोसळले. हे विमान दुबईहून मंगळुरकडे येत होते. . 'टेबलटॉप' धावपट्टीवर (उंच पठारावर असलेली आणि दोन्ही बाजूंना तीव्र उताराची धावपट्टी) उतरताना, विमानाने धावपट्टी ओलांडली, वेळेत थांबले नाही आणि एका खोल दरीत कोसळून त्याला आग लागली. या अपघातात 158 जणांचा मृत्यू झाला आणि फक्त 8 जण बचावले.

( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळले, 242 प्रवाशांचा जीव धोक्यात! वाचा सर्व अपडेट्स )
 

Alliance Air Flight 7412 - पाटणा, 1998

17 जुलै 1998 बिहारमधील पाटणा विमानतळाजवळ अलायन्स एअर फ्लाईट 7412 या विमानाचा चा दुर्दैवी अपघात झाला.  हे विमान लँडिंगच्या वेळी 'गो-अराउंड' करत असताना अनियंत्रित झाले आणि विमानतळाजवळच्या दाट लोकवस्तीच्या निवासी भागात कोसळले. या दुर्घटनेत विमानात असलेले 55 प्रवासी आणि कर्मचारी तसेच जमिनीवरील 5 नागरिक अशा एकूण 60 जणांचा मृत्यू झाला.

Advertisement

चरखी दादरी येथील हवेतील टक्कर - 1996

12 नोव्हेंबर 1996 रोजी हरियाणातील चरखी दादरीजवळ दोन विमानांची हवेत टक्कर झाली.  सौदी अरेबियन एअरलाइन्स फ्लाईट 763 आणि कझाकस्तान एअरलाइन्स फ्लाईट 1907 या दोन व्यावसायिक विमानांमध्ये गैरसंवाद आणि उंचीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे ही भीषण टक्कर झाली. दोन्ही विमानांमधील सर्व 349 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला.

( नक्की वाचा : Air India Plane Crash Live: अहमदाबादचं सरदार पटेल विमानतळ पुढील सुचना मिळेपर्यंत बंद )
 

Indian Airlines Flight 491 – छत्रपती संभाजीनगर - 1993

26 एप्रिल 1993 रोजी इंडियन एअरलाइन्स फ्लाईट 491 चा छत्रपती संभाजीनगर विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर लगेच अपघात झाला. हे धावपट्टीवरून उड्डाण करत असताना धावपट्टीवर अनवधानाने आलेल्या एका ट्रकला धडकले. या धडकेमुळे विमान अनियंत्रित होऊन कोसळले आणि त्याला आग लागली. विमानात असलेल्या 118 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमधील 55 जणांना या अपघातामध्ये जीव गमवावा लागला. 

Advertisement

Indian Airlines Flight 605 - बंगळुरु - 1990 

14 फेब्रुवारी 1990 रोजी इंडियन एअरलाइन्स फ्लाईट 605 बंगळूरु (बंगलोर) येथील एचएएल विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना कोसळले. या अपघातामध्ये विमानात असलेल्या 146 प्रवाशांपैकी 92 जणांचा मृत्यू झाला.