जाहिरात
8 hours ago

Air India Plane Crash Live:  एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळ्याची घटना समोर आली आहे. अहमदाबादच्या मेघानी नगर येथे ही दुर्घटना घडली आहे. टेक ऑफच्या वेळी ही दुर्घटना घडल्याचे माहिती मिळत आहे. अहमदाबादहून लंडन येथे हे विमान जात होतं अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.  विमानात 242 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती देखील मिळत आहे. विमानाने टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटातचं हे विमान कोसळल्याचं कळतंय. साधारण 1.17 वाजता या विमानाने टेक ऑफ केलं, तर दीड वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. 

Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात न्हावा गावच्या मैथिली पाटीलचा दुर्दैवी

गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात सर्व क्रू सदस्यांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे. यात पनवेल तालुक्यातील न्हावा गावची रहिवासी आणि हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मैथिली आपल्या ड्युटीसाठी न्हावा गावातून निघाली होती. ती एअर इंडियामध्ये हवाई सुंदरी म्हणून कार्यरत होती आणि अहमदाबादहून लंडनच्या दिशेने जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणावर ती ड्युटीवर होती. अपघातग्रस्त विमानात ती सेवेत असल्याची पुष्टी अद्याप अधिकृतरीत्या करण्यात आलेली नसली, तरी तिच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी ही माहिती दिली आहे.

Ahmedabad Plane Crash: कुणाला वाचवण्याची संधी मिळालीच नाही- अमित शहा

अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. या अपघाताने देशाला मोठा धक्का बसला आहे. ज्यांचा यात मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांच्या दुखात आपण सहभागी आहोत. अपघाताची माहिती सरकारला मिळाली होती. 230 प्रवाशी, 12 क्रू मेंबर होते. एक प्रवाशी या अपघातातून वाचला आहे. मृत्यू किती झालेत याचा आकडा नंतर घोषीत केला जाईल. एक प्रवाशी वाचला त्याला आपण भेटलो आहे. सव्वा लाख लिटर इंधन विमानात होता. तापमान जास्त होतं. त्यामुळे कुणाला वाचवण्याची संधीच मिळाली नाही. सर्व मृतदेह बाहेर काढण्याचं काम संपलं आहे. कुटुंबीयांचे डिएनए घेण्याचं काम सुरू आहे.      

Air India Flight Crash: अमित शाह यांनी केली अपघातग्रस्त जागेची पाहाणी

अमित शाह यांनी अपघात झालेल्या ठिकाणी जावू पाहाणी केली. शिवाय परिस्थितीचा आढावा घेतला. 

Air India Plane Crash: महाराष्ट्रातल्या सात जणांचा विमान अपघातात मृत्यू

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात महाराष्ट्रातल्या सात जणांचा समावेश आहे. नागपूरच्या तिघांचा तर पंढरपूरच्या दोघांचा यात समावेश आहे. तर केबिन क्रू मधील दोन जण हे महाराष्ट्रातील होते. 

Air India Plane Crash Live: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे विमान अपघातात निधन

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे विमान अपघातात निधन झाले आहेत. अशी माहिती केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी दिली आहे. विजय रुपानी हे लंडनला आपल्या मुलीकडे चालले होते. त्यांची पत्नीही लंडनमध्ये होती. त्यांना आणण्यासाठीच ते निघाले होते. पण त्याच विमानाचा अपघात झाला.  

Air India Plane Crash: विमान अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना 1 कोटीची मदत

अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना टाटा ग्रुप 1 कोटी रुपये देणार आहे. तर  जखमींच्या वैद्यकीय खर्चाचीही जबाबदारी टाटा ग्रुपने घेतली आहे. त्यांची आवश्यक ती सर्व काळजी घेणार असल्याचं ही ग्रुपने जाहीर केलं आहे. याव्यतिरिक्त, बीजे मेडिकलच्या वसतिगृहाच्या बांधकामात मदत करण्याचं ही टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी सांगितलं. 

Air India Plane Crash: अमित शहा अहमदाबादला पोहोचले, दुर्घटनास्थळी भेट देणार

Air India Plane Crash: अमित शहा अहमदाबादला पोहोचले, दुर्घटनास्थळी भेट देणार  आहेत. ते आता परिस्थितीचा आढावा घेत आहेत. 

Air India Plane Crash Live: विमान अपघातातून एक प्रवासी आश्चर्यकारक बचावला

एअर इंडिया विमान अपघातातून एक प्रवासी आश्चर्यकारक बचावला आहे. अशी माहिती अहमदाबादच्या पोलिस आयुक्तांनी दिली आहे. रमेश विश्वकुमार असं या प्रवाशाचं नाव आहे. 11A  या सीटवर तो बसला होता. 

Air India Plane Crash: विमान अपघाताची चौकशी होणार- हवाई वाहतूक मंत्री

एअर इंडियाच्या विमान अपघाताबद्दल केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू म्हणाले की, "आम्ही या अपघाताची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करणार आहोत. ही घटना का घडली याची चौकशी करणार आहोत. या विमानात भाजप नेते विजय रुपणी ही होते असं ही नायडू यांनी स्पष्ट केले. 

Air India Plane Crash: अहमदाबादमधील विमान अपघातात जखमी झालेल्या 25 जणांची यादी जाहीर

गुजरात आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांनी सांगितलं की, "अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह, कर्मचारी निवासस्थान आणि इतर निवासी क्षेत्रे विमान कोसळलेल्या भागात आहेत. जखमींपैकी 50 जणांना अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे." शिवाय अहमदाबाद पोलिसांनी अहमदाबादमधील विमान अपघातात जखमी झालेल्या 25 जणांची यादी जारी केली आहे.

Air India Plane Crash Live: विमान अपघातातून एकही जण वाचण्याची शक्यता कमी, अहमदाबाद पोलिसांची माहिती

अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघातातून एक ही जणा वाचण्याची शक्यता नसल्याचे अहमदाबाद पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे विमानातील सर्व प्रवाशी दगावल्याची भिती व्यक्त केली जात आहे. विमानात एकूण 242 जण होते.  

Air India Plane Crash: अहमदाबाद सिव्हील हॉस्पिटल बाहेर नातेवाईकांची गर्दी

अहमदाबाद सिव्हील हॉस्पिटल बाहेर नातेवाईकांची मोठी गर्दी झाली आहे. विमानात असलेले आपल्या नातेवाईकांचे काय झाले याची त्यांना माहिती मिळत नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या सोबत काय झाले हे त्यांना जाणून घ्यायचं आहे. पण सध्या त्यांना कोणतीही माहिती मिळत नाही. त्यामुळे त्यांना राग व्यक्त केला आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दुख:

अहमदाबादमध्ये झालेला विमान अपघात हा धक्कादायक आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Ahmedabad Flight Crash: घटनास्थळावरची दृष्य आले समोर

घटनास्थळावरची स्थितीतचे व्हिडीओ आले समोर. 

Air India Plane Crash Today: NDRF ची पथके घटनास्थळी दाखल

अहमदाबादमधील विमान अपघातस्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचr (एनडीआरएफ) तीन पथके कार्यरत आहेत.वडोदरा येथून आणखी तीन पथके अहमदाबादसाठी रवाना करण्यात आली आहे. अशी माहिती एनडीआरएफकडून देण्यात आली आहे. 

Air India Plane Crash Today: मुरलीधर मोहळ यांनी व्यक्त केलं दुख:

नागरि हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी व्यक्त केलं दुख:

Air India Plane Crash Today: इंग्लंड सरकारनेही जारी केली हेल्पलाईन नंबर

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताची आम्हाला माहिती आहे असं इंग्लंडमधील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.  युके भारतातील स्थानिक अधिकाऱ्यांसोबत काम करत आहे. जेणेकरून तातडीने पावलं उचलता येतील. शिवाय संबंधितांना मदत करता येईल. ज्या ब्रिटिश नागरिकांना मदतीची आवश्यकता आहे किंवा ज्यांना मित्र किंवा कुटुंबाबद्दल चिंता आहे, त्यांनी 020 7008 5000 असं इंग्लंड सरकारने स्पष्ट केलं आहे.  

Ahmedabad Plane Crash: एअर इंडिया फ्लाइट 171 च्या दुर्घटनेने आम्हाला धक्का बसला - गौतम अदाणी

एअर इंडिया फ्लाइट 171 च्या दुर्घटनेने आम्हाला धक्का बसला आहे. असं ट्वीट अदाणी ग्रुपचे प्रमुख गौतम अदाणी यांनी केलं आहे. शिवाय अपघात ग्रस्त कुटुंबीयांच्या दुखात आपण सहभागी असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे. 

Air India Plane Crash Live UPdate: एअर इंडियाने जारी केला हॉटलाईन क्रमांक

अहमदाबाद विमान अपघाताबाबत अधिक माहिती देण्यासाठी एअर इंडियाने 1800 5691 444  प्रवासी हॉटलाइन क्रमांक जारी केला आहे. त्यावर अधिक माहिती मिळेल. 

नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू तातडीने अहमदाबादला रवाना

विमान अपघाताची बातमी मिळताच विजयवाडा येथे असलेले नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू तातडीने अहमदाबादला रवाना झाले आहेत. ते डीजीसीए, एएआय, एनडीआरएफ आणि गुजरात राज्य प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत. बचाव आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी आहेत अशी माहिती ही राममोहन नायडू यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. 

अहमदाबादचं सरदार पटेल विमानतळ पुढील सुचना मिळेपर्यंत बंद

एअर इंडिया विमान अपघाताच्या घटनेमुळे, अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (SVPIA) सध्या बंद करण्यात आलं आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे. 

शरद पवारांनी व्यक्त केलं दुख

अहमदाबाद विमान अपघातानंतर शरद पवारांनी दुख व्यक्त केलं आहे. 

विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) चे महासंचालक अहमदाबादला रवाना

विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) चे महासंचालक, पथकासह अहमदाबादला चौकशीसाठी रवाना झाले आहेत. अशी  नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सूत्रांची माहिती आहे. 

अपघातानंतर पंतप्रधान मोदींनी केली शहा आणि नायडू यांच्या बरोबर चर्चा

पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा आणि नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी त्यांना अहमदाबादला जाऊन विमान दुर्घटनेतील पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. सगळीकडे धुराचे लोट दिसत आहेत. शिवाय एकच धावपळ उडाल्याचे चित्र आहे. 

गृहमंत्री अमित शाह अहमदाबादसाठी रवाना

एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहमदाबादसाठी रवाना झाले आहेत. ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 

विमानात एकूण २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स

गुजरात राज्य पोलिस नियंत्रण कक्षानुसार, अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI-171 गुरुवारी सरदार वल्लभभाई पटेल अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेत असताना कोसळले. विमानात एकूण २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. एअर इंडियाचे विमान बोईंग ७२७ ट्विन जेट होते.

एअर इंडियाचे विमान एआय १७१ हे लंडनला जात होते

एअर इंडियाचे विमान एआय १७१ हे लंडनला जात होते. विमानात २४२ लोक होते, ज्यात २ पायलट आणि १० केबिन क्रू होते. विमानाचा कॅप्टन सुमित सभरवाल होते, त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर होते. कॅप्टन सुमित सभरवाल हे एलटीसीमध्ये ८२०० तासांचा अनुभव असलेले आहेत. सह-वैमानिकाला ११०० तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. 

एटीसीनुसार, विमानाने अहमदाबादहून १.३९ वाजता भारतीय वेळेनुसार धावपट्टी २३ वरून उड्डाण केले. एटीसीने केलेल्या कॉलला विमानाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. रनवे २३ वरून निघाल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या परिघाबाहेर जमिनीवर कोसळले.

अहमदाबाद विमान दुर्घटनेचा व्हिडीओ आला समोर

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com