Air India Plane Crash : 265 जळालेल्या मृतदेहांमध्ये भगवत गीता सुरक्षित; अहमदाबाद विमान दुर्घटनेत चमत्कार, पाहा Video

हा अपघात इतका भीषण होता की, प्रवाशाच्या मृतदेहाची ओळख पटवणं कठीण झालं आहे. मृतदेह १०० टक्के जळाले आहेत. या भीषण अपघातादरम्यान अनेक चमत्कारिक गोष्ट आढळून आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. लंडनच्या दिशेने अनेक स्वप्न घेऊन निघालेल्या नागरिकांचा काही क्षणात स्वप्नभंग झाला आणि मागे केवळ आठवणी शिल्लक राहिल्या. कोणी आपला पती गमावला तर कोणी बायको. या दुर्घटनेच 242 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कित्येक कुटुंबच्या कुटुंब संपली आहेत. 

विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या 40 ते 50  सेकंदात 265 जणांचे जीव गेला.  अहमदाबादहून निघालेले बोईंग 787-8 विमान होतं.  ज्यामध्ये 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. यापैकी 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिक प्रवास करीत होते.

नक्की वाचा - Air India Plane Crash : झेप घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं पण...; डोंबिवलीच्या रोशनी सोनघरेची कहाणी अपूर्णच राहिली
 

Advertisement

हा अपघात इतका भीषण होता की, प्रवाशाच्या मृतदेहाची ओळख पटवणं कठीण झालं आहे. मृतदेह १०० टक्के जळाले आहेत. या भीषण अपघातादरम्यान अनेक चमत्कारिक गोष्ट आढळून आली आहे. दरम्यान रेस्क्यूदरम्यान घटनास्थळावरील भगवत गीता सापडली आहे. जी कोणा प्रवाशाची असल्याची शक्यता आहे. हिंदूंचा धार्मिक ग्रंथ भगवत गीतेला अजिबात धक्काही लागला नाही. तेथील लोक याला चमत्कार मानत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडिया एक्सवर हा व्हिडिओ सहा लाखांहून अधिक जणांनी पाहिली आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुर्घटनास्थळावरील ढिगाऱ्याखालून काढलेली  गीतेची पानं दाखवत आहे. 

नहीं जली भगवद्गीता...

अहमदाबाद विमान हादसे के मलबे से भगवद गीता की एक किताब मिली. हैरानी की बात ये है कि इतनी भयंकर आग के बीच भी किताब जली नहीं. वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है. जहां इतने लोगों की आग में जलकर दर्दनाक मौत हो गई, वहां यह किताब कैसे सुरक्षित रही, यह… pic.twitter.com/je8s02mbzH

— NDTV India (@ndtvindia) June 13, 2025
Advertisement

या ढिगाऱ्यात जळालेल्या अवस्थेतील विमानाचे भाग दिसत आहे. अशा भीषण अपघातात गीता सुरक्षित असणं चमत्कार मानला जात आहे. हा लोकांच्या आस्था आणि श्रद्धेचा विषय ठरला आहे.