गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. लंडनच्या दिशेने अनेक स्वप्न घेऊन निघालेल्या नागरिकांचा काही क्षणात स्वप्नभंग झाला आणि मागे केवळ आठवणी शिल्लक राहिल्या. कोणी आपला पती गमावला तर कोणी बायको. या दुर्घटनेच २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कित्येक कुटुंबच्या कुटुंब संपली आहेत.
विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या 40 ते 50 सेकंदात 265 जणांचे जीव गेला. अहमदाबादहून निघालेले बोईंग 787-8 विमान होतं. ज्यामध्ये 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. यापैकी 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिक प्रवास करीत होते. दरम्यान या विमान अपघातात पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी टाटा ग्रुपने मोठी घोषणा केली आहे.
नक्की वाचा - Air India Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील किती जण दगावले? मृतांची धक्कादायक यादी आली समोर
टाटा ग्रुपकडून दुर्घटनेबद्दल व्यक्त केला शोक...
टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करीत मोठी घोषणा केली आहे. एअर इंडिया फ्लाइट १७१ शी संबंधित दुर्घटनेबद्दल आम्ही अत्यंत दु:खी आहोत. आपला होणाऱ्या वेदना शब्दात व्यक्त करू शकत नाही. या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्याच्या नातेवाईकांप्रती आम्ही संवदेना व्यक्त करतो.
एक कोटी नुकसनाभरपाई...
टाटा सन्सकडून नुकसानभरपाईची घोषणा करण्यात आली आहे. टाटा समूहाकडून या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना एक कोटींची मदत निधी देण्यात येणार आहे. जखमींच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी टाटाकडून घेण्यात येईल आणि त्यांची आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येईल. याव्यतिरिक्त, आम्ही बीजे मेडिकलमध्ये वसतिगृह बांधण्यासाठी मदत करू. या दु:खद परिस्थितीत आम्ही बाधित कुटुंबे आणि समुदायांसोबत आहोत.