अहमदाबाद विमान अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला आहे. इंग्लंडला जाणारं एअर इंडियाचं विमान उड्डाण घेतल्याच्या काही क्षणात खाली कोसळलं. यावेळी विमानातून 242 जण होतं. ज्यामध्ये दोन पायलट, दहा केबिन क्रू सदस्यांचा समावेश आहे. या अपघातानंतर नागरिकांमध्ये पुन्हा एकदा विमान प्रवासाबद्दल भीती निर्माण झाली आहे.
कोणत्याही विमान अपघातात जास्त लोकांना वाचवणं कठीण असतं. परंतु विमानात काही जागा अशा असतात ज्या इतर जागांपेक्षा सुरक्षित मानल्या जातात. अशा परिस्थितीत, FAA डेटानुसार निवडता येणारी सर्वात सुरक्षित फ्लाइट सीट कोणती आहे ते जाणून घ्या.
विमानातील कोणती सीट सर्वात सुरक्षित?
फेडरल एव्हिएशन एडमिनिस्टर म्हणजेच FAA च्या डेटानुसार, विमानाच्या मागच्या बाजूला बसणाऱ्या प्रवाशांना कमी धोका असतो.
पंख्याजवळील जागांचं काय?
डेटानुसार, विमानाच्या पंख्यांजवळील जागा फायदेशीर असतात. एअरक्राफ्टचा हा भाग स्टेबिलिटीसाठी तयार केला जातो. पंख्यांजवळील सीट सर्वसाधारणपणे आपत्कालिन एग्झिटच्या जवळ असतात. ज्यामुळे कोणत्याही अपघातावेळी बाहेर पडणं सोपं होतं.
विश्वास कुमार विमानाच्या मधल्या भागातून काही जागा पुढे बसला होता. मात्र त्याच्या समोर सीट नव्हत्या. त्याशिवाय सेफ्टी डोअर लागूनच होता. त्यामुळे त्याला बाहेर पडणं सोपं झालं.
एग्जिट रो..
एक्झिट रोमध्ये बसलेले प्रवासीही वाचू शकतात. या विभागात बसलेल्या लोकांना त्यांचे पाय ठेवण्यासाठी जास्त जागा असते आणि ते एक्झिटकडे वेगाने धावू शकतात. या आसनव्यवस्थेतील प्रवासी स्वतःला आणि इतरांनाही धोक्यातून बाहेर काढू शकतात.
विंडो, आइल (बाहेरच्या बाजूची) आणि मध्य भागातील आसनव्यवस्था...
कोणत्याही वादळादरम्यान अपघाताची शक्यता असते तेव्हा मध्य भागातील सीट अधिक सुरक्षित असते. आयल सीटवरून बाहेर पडणं सोपं आहे. खिडकीच्या सीटवरून एखादी व्यक्ती हळूहळू बाहेर पडू शकते.
इंधन टँक...
इंधनाच्या टँकजवळ असलेल्या सीटमध्ये अधिक धोका असतो. अपघात झाल्यास आपत्कालीन लँडिंग दरम्यान उर्वरित इंधन पेट घेऊ शकतं. अशा परिस्थितीत, प्रवाशांनी संयम राखणे आणि सतर्क राहणे आवश्यक आहे. अशा वेळी सेफ्टी ब्रीफिंग नीट लक्ष देऊन ऐका, आपत्कालीन कार्ड वाचा आणि गोंधळून जाऊ नका.
विमानात इंधन टँक कुठे असतं?
विमानात इंधन मुख्यबॉडीमध्ये स्टोअर केलं जात नाही. तर विमानाच्या दोन्ही पंख्यांमध्ये इंधन साठवून ठेवलं जातं. विमानाचं इंजिनदेखील त्याच्या पंख्यांमध्ये असतात. त्यामुळे इंधन इंजिनपर्यंत पोहोचवणं सोपं जातं. याशिवाय विमानाचं वजनही कमी होतं.
विमानाचा समोरील भाग सर्वात धोकादायक...
बहुतेक विमान अपघातांत पुढील भागावर जास्त परिणाम होतो. टेक-ऑफ किंवा लँडिंग दरम्यान, विमानाचा पुढचा भाग प्रथम जमिनीवर आदळतो, ज्यामुळे त्याचे जास्त नुकसान होते. दुसरीकडे, मागच्या भागावर धडक कमी होते. त्यामुळे तेथील सीट अधिक सुरक्षित मानल्या जातात.