जाहिरात

Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमधील विमान ज्या इमारतीवर पडले, त्या डॉक्टर हॉस्टलेचे भयानक Photo

Air India Plane Crash : अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील मेघानी नगर येथे एका इमारतीवर कोसळले आहे. ही इमारत डॉक्टरांचे हॉस्टेल आहे.

Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमधील विमान ज्या इमारतीवर पडले, त्या डॉक्टर हॉस्टलेचे भयानक Photo
Ahmedabad Plane Crash : या इमारतीमधील काही जणांचा विमान कोसळल्याने मृत्यू झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 
मुंबई:

Air India Plane Crash : अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील मेघानी नगर येथे एका इमारतीवर कोसळले आहे. ही इमारत डॉक्टरांचे हॉस्टेल आहे. या इमारतीमधील काही जणांचा विमान कोसळल्याने मृत्यू झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बचावकार्य अजूनही सुरू आहे. अनेक एजन्सी बचावकार्यात गुंतल्या आहेत. जखमींना लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला आहे. 

बचावकार्य वेगाने सुरू

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, 'आम्हाला सुरुवातीला  माहिती मिळाली की लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या वसतिगृहात कोसळले आहे. 2-3 मिनिटांच्या आतच पोलीस आणि इतर बचावपथक घटनास्थळी दाखल झाले. जवळपास 70-80% क्षेत्र स्वच्छ झाले आहे. सर्व एजन्सी इथं काम करत आहेत. जखमींना लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला आहे. आमची प्राथमिकता सध्या जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याची आहे. माध्यमांनाही आमचे आवाहन आहे की त्यांनी आम्हाला सहकार्य करावे."

विमानातील प्रवासी आणि तांत्रिक माहिती

हे विमान लंडनसाठी उड्डाण केल्यानंतर लगेचच कोसळले. दुर्घटनेच्या वेळी विमानात क्रू मेंबर्ससह 242 जण होते, ज्यात सुमारे 232 प्रवासी होते. एअर इंडियाचे हे विमान 'बोइंग 787-8 ड्रीमलाइनर' प्रकारचे आहे, जे सुमारे 11 वर्षे जुने असल्याचे सांगितले जात आहे.

Latest and Breaking News on NDTV

अपघातानंतर काय घडलं?

क्रू मेंबर्ससह 242 हून अधिक लोकांना घेऊन लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळले. हा अपघात अहमदाबादमधील मेघानीनगर परिसराजवळ झाला. विमान टेक-ऑफनंतर लगेचच कोसळले.

विमान कोसळल्यानंतर घटनास्थळावरून आकाशात काळा धूर दिसला. अग्निशमन दलाची अनेक वाहनं घटनास्थळी पोहोचले. मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मात्र, या अपघातात किती जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Latest and Breaking News on NDTV

पायलटचा शेवटचा संपर्क

अहमदाबादमध्ये विमान कोसळण्यापूर्वी पायलटनी सिग्नल दिला होता. परंतु, जेव्हा एअर ट्रॅफिक सर्व्हिस (ATS) ने विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कोणताच प्रतिसाद मिळाला नाही आणि काही क्षणांतच विमान कोसळले.

Latest and Breaking News on NDTV

उड्डाण करताच पायलटनी जवळच्या एटीसीला 'मेडे (MAYDAY) कॉल' दिला होता, परंतु त्यानंतर विमानाकडून एटीसीला कोणताही सिग्नल मिळाला नाही. उड्डाणाच्या काही सेकंदांनंतरच विमान कोसळले.

( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash: मेडे, मेडे, मेडे...विमान कोसळण्यापूर्वी पायलटनं दिलेल्या सिग्नलचा अर्थ काय? )
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com