विमानाने प्रवास करणाऱ्यांना मोठा धक्का बसू शकतो. तेल कंपन्यांकडून विमानाच्या इंधनाच्या किंमतीत वाढीबाबतच्या घोषणेनंतर विमानाची तिकीट महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विमानन टर्बाइन इंधनाच्या (ATF) किमतीत 1,318 रुपये प्रति किलोलीटर वाढ झाली आहे. एक महिन्यापूर्वी यात 2,941.5 रुपये म्हणजेच 3.3 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. एटीएफच्या किमतीत आता दिल्लीत 91,856.84 रुपये प्रति किलोलीटर, कलकत्त्यात 94,551.63 रुपये, मुंबईत 85,861.02 रुपये आणि चेन्नईत 95,231.49 रुपये प्रति किलोलीटर आहे. नव्या किमती आजपासून लागू झाली आहे. ज्यामुळे विमानसेवांना मोठा धक्का बसला आहे.
नक्की वाचा - पुन्हा एकदा एलपीजी सिलेंडर महागला, महिन्याच्या सुरुवातीलाच ग्राहकांना महागाईचा झटका!
तिकिटांच्या किमतीत वाढ कशी होते?
इंधनाच्या खर्चावरुन विमानाच्या तिकिटांचा दर निश्चित केला जातो. वास्तविक पाहता श्रमिक खर्चानंतर विमान चालवण्याचा हा दुसरा सर्वात मोठा खर्च आहे. इंधन खर्चामुळे एअरलाइन्सच्या नफ्याचे प्रमाण कमी होते आणि तिकिटाची किंमत वाढते.
सरकारी तेल कंपन्या - भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) दर महिन्याच्या पहिल्या तारखेला विमानाचं इंधन आणि स्वयंपाक गॅसच्या किमती अपडेट केल्या जातात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तेल कंपन्यांनी यापूर्वी एटीएफच्या किमतीत 1 नोव्हेंबरला वाढ केली होती. तर 1 ऑक्टोबर 5,883 रुपये प्रति किलोलीटर आणि १ सप्टेंबरला 4,495.5 रुपए प्रति किलोलीटर इतकी मासिक कपात केली होती. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक एलपीजीच्या किंमतीत सातत्याने पाचव्यांदा वाढ झाली आहे. 19 किलोच्या सिलिंडरची किंमत आता 16.5 रुपयांनी वाढली आहे आणि दिल्लीत याची किंमत 1818.50 रुपये, मुंबईत 1771 रुपये, कलकत्त्यात 1,927 रुपये आणि चेन्नईत 1,980 रुपयांपर्यत वाढ झाली आहे.