जाहिरात

पुन्हा एकदा एलपीजी सिलेंडर महागला, महिन्याच्या सुरुवातीलाच ग्राहकांना महागाईचा झटका!

आज 1 डिसेंबर, महिन्याच्या सुरुवातीलाच तेल वितरक कंपन्यांनी पुन्हा एकदा गॅस सिलेंडरचया वापराच्या सिलेंडरचे दर वाढवले आहेत.

पुन्हा एकदा एलपीजी सिलेंडर महागला, महिन्याच्या सुरुवातीलाच ग्राहकांना महागाईचा झटका!
मुंबई:

LPG Gas Price Hiked: डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच ग्राहकांना महागाईचा झटका बसला आहे. तेल वितरक कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे. यापूर्वी, नोव्हेंबर महिन्यामध्येही व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरचे दर वाढले होते. आता पुन्हा एकदा एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर करण्यात आलेत. 19 किलोचा सिलेंडर 18 रुपयांनी महागला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या आघाडीवर सरकारने भाव स्थिर ठेवले आहेत. तर काही महिन्यांपूर्वी त्यावर सबसिडी जाहीर केली होती. त्यामुळे मध्यंतरी 1100 रुपयांच्या दरात मिळणारा सिलेंडर आता 800 ते 900 रुपयांदरम्यान मिळत आहे. तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली असून, 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. 

F&O वाल्यांनो इकडे लक्ष द्या, 1 जानेवारीपासून होतोय मोठा बदल

(नक्की वाचा: F&O वाल्यांनो इकडे लक्ष द्या, 1 जानेवारीपासून होतोय मोठा बदल)

ऑक्टोबर- नोव्हेंबरपासून इंडीयन ऑइलने व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 62 रुपयांची वाढ झाली. मुंबईत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1692.50 रुपयांऐवजी 1754 रुपयांपर्यंत वाढली होती. दिल्लीत सिलिंडरची किंमत 1740 रुपयांवरून थेट 1802 रुपयांवर पोहोचली होती. कोलकात्यात 1850.50 रुपयांवरून 1911.50 रुपये. त्याचबरोबर, चेन्नईमध्ये या सिलेंडरची किंमत 1903 रुपयांवरून 1964 रुपये करण्यात आली आहे.

डिजिटल अटकेची धमकी, Video Call वर कपडे काढायला लावले अन्... मुंबईतील तरुणीला लुटले

(नक्की वाचा: डिजिटल अटकेची धमकी, Video Call वर कपडे काढायला लावले अन्... मुंबईतील तरुणीला लुटले)

अहवालानुसार, दिल्लीत आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी किंमतीत 16.50 रुपयांनी वाढ झाली आहे त्यामुळे आता एका सिलेंडरसाठी 1818.50 रुपये मोजावे लागतील. तर, मुंबईत   16.50 रुपयांनी वाढ करण्यात आली असून आता, 1771 रुपये एका सिलेंडरसाठी मोजावे लागतील. कोलकाता मध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी किंमतीत  15.50 रुपयांनी वाढ झाली असल्याकारणाने प्रति सिलेंडरसाठी 1927 रुपये मोजावे लागतील. तर, चेन्नईमध्ये सिलेंडरची किंमत 16 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रति सिलेंडर 1980.50 रुपये मोजावे लागणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com