Anaya Bangar: अनया बांगर लिंग बदल शस्त्रक्रिया करणार, व्हॅजिनोप्लास्टी म्हणजे असतं तरी काय?

What Is Vaginoplasty?: सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो अनेकदा विचारला जातो तो म्हणजे, लिंग बदल शस्त्रक्रियेनंतर संबंधित व्यक्ती गर्भधारणा करू शकते का?

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू संजय बांगर याची मुलगी अनाया बांगर सध्या तिच्या आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर उभी आहे. अनायाने नुकतीच घोषणा केली आहे की, ती येत्या मार्च महिन्यात थायलंडमध्ये 'जेंडर अफर्मिंग सर्जरी' म्हणजेच लिंग बदल शस्त्रक्रिया करणार आहे. अनायाचे कुटुंब तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच अनायाने लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. संजय बांगर यांनी तिच्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. या निमित्ताने लिंग बदल शस्त्रक्रियेमधील अत्यंत महत्त्वाचा भाग असलेली 'व्हॅजिनोप्लास्टी' नेमकी काय आहे आणि ती कशी केली जाते, याबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांनी सविस्तर माहिती दिली आहे.

नक्की वाचा: भूक लागत नाही? आजाराचं कारण तर नाही ना? चांगल्या पचनशक्तीसाठी काय कराल?

व्हॅजिनोप्लास्टी म्हणजे काय?

एका इंग्रजी वर्तमानपत्राने अनाया बांगरची मुलाखत प्रसिद्ध केली असून यात तिने म्हटले आहे की तिने फॅशन डिझायनर सायशा शिंदे आणि अभिनेत्री त्रिनेत्रा हलदर गुम्माराजू यांच्याशी सल्लामसलत केली होती. यानंतर तिने व्हॅजिनोप्लास्टीसाठी थायलंडला जाण्याचा निर्णय घेतला आहे. या शस्त्रक्रियेसाठी तिला किमान एक महिना तिथे राहावे लागेल आणि त्यानंतर दीर्घकाळ विश्रांती घ्यावी लागेल आणि या शस्त्रक्रियेनंतर किमान 6 महिने तिला क्रिकेट खेळता येणार नाही. ही शस्त्रक्रिया नेमकी असते तरी काय हे आम्ही जाणून घेण्यासाठी स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. रितू अग्रवाल यांच्याकडून माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, व्हॅजिनोप्लास्टी ही एक गुंतागुंतीची पण आधुनिक शस्त्रक्रिया आहे, ज्यामध्ये योनीची (vagina) निर्मिती केली जाते किंवा तिची पुनर्रचना केली जाते. ट्रान्सजेंडर महिलांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, ही शस्त्रक्रिया त्यांना स्त्रियांना असलेले जननेंद्रिय मिळवून देण्यासाठी केली जाते.  

व्हॅजिनोप्लास्टी शस्त्रक्रिया नेमकी कशासाठी केली जाते ?

डॉ. रितू अग्रवाल यांनी सांगितले की,  लिंग बदलाशिवाय इतरही काही कारणांसाठी ही शस्त्रक्रिया केली जाते. प्रसूतीनंतर योनीमार्गात येणारी शिथिलता दूर करण्यासाठी किंवा जन्मतः असलेल्या काही विकृती सुधारण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत प्रभावी ठरते. अपघात किंवा कर्करोगाच्या शस्त्रक्रियेमुळे योनीचे नुकसान झाले असल्यास, ती पुन्हा कार्यक्षम करण्यासाठी प्लास्टिक सर्जन आणि स्त्रीरोगतज्ज्ञ एकत्र येऊन ही शस्त्रक्रिया करतात. अनाया बांगरच्या प्रकरणात, ही शस्त्रक्रिया तिच्या लिंग बदल प्रक्रियेचा अंतिम आणि महत्त्वाचा टप्पा आहे.

नक्की वाचा: रोज 1 महीना रिकाम्या पोटी आवळ्याचे पाणी प्यायल्याने काय होतं? जाणून घ्या फायदे तोटे

लिंग बदलासाठीच्या या शस्त्रक्रियेसाठी किती खर्च येतो?

शस्त्रक्रियेच्या खर्चाबाबत माहिती देताना डॉ. अग्रवाल यांनी सांगितले की, भारतात मुंबई, पुणे, दिल्ली यांसारख्या शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. भारतात या शस्त्रक्रियेचा खर्च साधारणपणे 40,000 ते 1,50,000 रुपयांच्या दरम्यान असू शकतो. मात्र, लिंग बदलासारख्या गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये हा खर्च 2 लाखांच्या पुढेही जाऊ शकतो. अनाया थायलंडला जात असल्यामुळे तिथला खर्च आणि राहण्याचा खर्च अधिक असू शकतो. 

Advertisement

लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेचा नेमका फायदा काय?

सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो अनेकदा विचारला जातो तो म्हणजे, लिंग बदल शस्त्रक्रियेनंतर संबंधित व्यक्ती गर्भधारणा करू शकते का? यावर डॉ. रितू अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, व्हॅजिनोप्लास्टीमध्ये केवळ योनी मार्ग तयार केला जातो. गर्भधारणेसाठी आवश्यक असलेले गर्भाशय (uterus) आणि अंडाशय (ovaries) या शस्त्रक्रियेत तयार करता येत नाहीत. त्यामुळे, पूर्वाश्रमीची पुरुष असलेली व्यक्ती शस्त्रक्रियेनंतर महिला झाली तरी ती नैसर्गिकरीत्या गर्भधारणा करू शकत नाही. ही शस्त्रक्रिया केवळ शारीरिक स्वरूप बदलण्यासाठी आणि लैंगिक कार्यासाठी मदत करते.
 

Topics mentioned in this article