- आयुर्वेदानुसार आवळा त्रिदोषांचे संतुलन राखण्यासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो
- आवळ्याचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्यास पित्त शांत होते तसेच रक्त शुद्धीकरणात मदत होते
- आवळ्याचे पाणी शरीरातील उष्णता कमी करुन रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयोगी ठरते आणि पचनक्रिया सुधारते
आयुर्वेदात आवळ्याला 'अमृत फळ' मानले जाते. शरीरातील वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांचे संतुलन राखण्यासाठी आवळा अत्यंत गुणकारी आहे. अनेकांना आवळ्याचा रस पिणे किंवा तो थेट खाणे चवीमुळे कठीण जाते, अशा लोकांसाठी 'आवळ्याचे पाणी' हा एक उत्तम आणि तितकाच प्रभावी पर्याय ठरत आहे. आवळ्याचे पाणी केवळ शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर काढत नाही, तर ते 'ओज' निर्माण करण्यास मदत करते.
पित्त शांत करण्यासाठी आणि रक्ताच्या शुद्धीकरणासाठी आवळ्याचे पाणी अत्यंत उपयुक्त ठरते. शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सलग 1 महिना सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. आवळा हा तसा थंड आहे, त्यामुळे ज्यांना कफाचा त्रास आहे किंवा सतत सर्दी-खोकला होतो, त्यांनी याचे सेवन टाळावे. तसेच पचनशक्ती खूप कमकुवत असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच याचा वापर करावा.
हिवाळ्यात मिळणारा आवळा आरोग्यासाठी एखाद्या औषधीपेक्षा कमी नाही. रक्ताच्या शुद्धीकरणापासून ते चेहरा आणि केसांच्या सौंदर्यापर्यंत आवळा सर्वगुणसंपन्न आहे. पण तुम्हाला माहित आहे का? आवळ्याचा रस पिण्यापेक्षा आवळ्याचे पाणी पिणे अधिक सोपे आणि फायदेशीर आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि पचनक्रिया सुधारते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
आवळ्याचे पाणी केस गळती थांबण्यास मदत होते. हे पाणी शरीरातील घाण बाहेर काढून रक्त स्वच्छ करते. साधारण 1 महिना हा प्रयोग केल्यास शरीरात सकारात्मक बदल दिसून येतात. रात्री एक ग्लास पाण्यात आवळ्याचे बारीक तुकडे किंवा किसलेला आवळा भिजत घाला. सकाळी हे पाणी थोडे उकळून घ्या आणि गाळून कोमट असतानाच प्या. चवीला तुरट वाटणारा आवळा या स्वरूपात घेणे अतिशय सोपे जाते. त्याचा फायदा नक्कीच होतो असं सांगितलं जातं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world