जाहिरात

AP News: 4 चिमुकली लेकरं, खेळता खेळता कारमध्ये बसली, पुढे भयंकर घडलं, गावावर शोककळा!

AP News: 4 चिमुकली लेकरं, खेळता खेळता कारमध्ये बसली, पुढे भयंकर घडलं, गावावर शोककळा!

आंध्रप्रदेश: आंध्र प्रदेशमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आंध्रप्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यात बंद कारमध्ये गुदमरून चार चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला.  विजयनगरम कॅन्टोन्मेंट अंतर्गत येणाऱ्या द्वारपुडी गावात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून मुलांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  द्वारपुडी गावात चार मुले घराजवळच असलेल्या पार्कमध्ये खेळत होती. खेळता खेळता चिमुकल्यांना काही गाड्या उभ्या असलेल्या दिसल्या. गाड्यांचे दरवाजे लॉक नसल्यामुळे, मुलांनी ते उघडले आणि गाडीत चढले. मात्र मुलांकडून चुकून गाडीचे दरवाजे लॉक झाले जे त्यांना उघडता आले नाहीत. त्यामुळे या चारही चिमुकल्यांचा गाडीमध्येच गुदमरुन दुर्दैवी अंत झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार,  उदय (वय, 8), चारुमती (वय 8), करिश्मा (वय 6) आणि मनस्वी (वय 6) अशी या चिमुकल्यांची नावे आहेत. ही चारही लहान मुले रविवारी सकाळी खेळण्यासाठी बाहेर गेले होते. यांपैकी चारुमती आणि करिश्मा बहिणी होत्या, तर इतर दोन मुले त्यांचे मित्र होते. खेळता खेळता चिमुकल्यांना काही गाड्या उभ्या असलेल्या दिसल्या.

नक्की वाचा-  Pune News : सुनेची आत्महत्या, छळ केल्याचा आरोप; राष्ट्रवादीच्या नेत्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल)

गाड्यांचे दरवाजे लॉक नसल्यामुळे, मुलांनी ते उघडले आणि गाडीत चढले. मात्र मुलांकडून चुकून गाडीचे दरवाजे लॉक झाले जे त्यांना उघडता आले नाहीत.  सकाळपासून मुलांचे पालक न दिसल्याने त्यांचा शोध सुरू केला तेव्हा ही घटना उघडकीस आली. यानंतर, स्थानिक महिला मंडळाच्या कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये मुलांचे मृतदेह आढळले. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

दरम्यान, रविवारी आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आणखी एक दुःखद घटना घडली, ज्यामध्ये तीन मुले पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडाली. कुप्पम मंडलच्या देवराजपुरममध्ये ही घटना घडली. पाच वर्षांची शालिनी, सहा वर्षांचा अश्विन आणि आठ वर्षांची गौतमी अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. 

नक्की वाचा-  Joe Biden : अमेरिकेच माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सरची लागण, हाडांमध्ये पसरल्याने चिंता)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com