जाहिरात

Pune News : सुनेची आत्महत्या, छळ केल्याचा आरोप; राष्ट्रवादीच्या नेत्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

वैष्णवी यांच्या वडिलांनी याप्रकरणी बावधन पोलिसांत फिर्याद दिली होती. हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करत तिची मारहाण करत तिला क्रूरतेची वागणूक देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Pune News : सुनेची आत्महत्या, छळ केल्याचा आरोप; राष्ट्रवादीच्या नेत्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

सूरज कसबे, पुणे

Pune Crime News : सुनेच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यासह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप सर्वांवर आहे. पुण्यातील मुळशी तालुक्यातील ही घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची 23 वर्षीय सून वैष्णवी शशांक हगवणे यांनी 16 मे रोजी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी बावधन पोलिसांत हगवणे कुटुंबातील 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वैष्णवी यांच्या सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याने तिने आत्महत्या केल्याचं वैष्णवीचे वडील आनंद उर्फ अनिल साहेबराव कस्पटे यांनी शनिवारी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे . या प्रकरणी बावधन पोलिसांनी पती शशांक हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, सासू आणि नणंद अशा पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय, यात पती शशांक आणि सासू व नणंद यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

(नक्की वाचा- Rain Forecast : राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज; पुण्यासह 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट)

नेमकं काय घडलं ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास मुळशी तालुक्यातील भूकुम या गावात राहत्या घरी वैष्णवी यांनी बेडरूममध्ये गळफास घेतला. काही वेळानंतर पती शशांक यांनी दरवाजा ठोठावला मात्र काही प्रतिसाद न आल्याने त्यांनी दरवाजा तोडला. त्यानंतर गळफास घेतलेल्या वैष्णवी यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी वैष्णवी यांना मृत घोषित केले. वैष्णवी यांच्या अंगावर मारहाण केल्याचे काही व्रण ही आढळले आहेत. वैष्णवी यांच्या वडिलांनी शनिवारी या प्रकरणी फिर्याद दिली असून पती शशांक आणि सासू व नणंद यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आहे. अधिक तपास बावधन पोलीस करत आहेत. 

फिर्यादीमध्ये नेमकं काय म्हटलं आहे ?

2023 साली वैष्णवी आणि शशांक यांचा विवाह झाला होता. लग्नात 51 तोळे सोने, एक आलिशान चारचाकी, चांदीची भांडी मुळशीतील महागड्या मंगल कार्यालयात लग्न लावून देण्याची बोली झाली होती. लग्नात चांदीची भांडी दिली नाहीत म्हणून लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच वैष्णवी यांना त्रास देण्यास सुरुवात झाली. यापूर्वी देखील 2023 मध्ये वैष्णवी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. 

(नक्की वाचा- देशद्रोही ज्योतीसोबत पाकिस्तानची सफर, आणखी एक युट्यूबर तपास यंत्रणांच्या रडारवर)

जमीन खरेदी करण्यासाठी वैष्णवी यांच्या वडिलांकडे शशांक यांनी 2 कोटी रुपये मागितले असल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे. 2025 मध्ये सासू आणि नणंद यांनी वैष्णवी यांस मारहाण करून माहेरी सोडले होते. अखेर सतत सासरच्या मंडळींकडून होत असलेला शारीरिक आणि मानसिक छळ वैष्णवीला सहन न झाल्याने तिने आत्महत्या केल्याचं या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास बावधन पोलीस करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com