जाहिरात

Covid 19 Cases: बापरे! देशातील कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू, या राज्यात 12 नवे रुग्ण आढळले; आरोग्य विभाग सतर्क

Corona Update: देशातील या राज्यात मागील 20 दिवसांत कोरोनाचे 12 नवे रुग्ण आढळले आहेत आणि चार जणांचा मृत्यू झाला आहे.

Covid 19 Cases: बापरे! देशातील कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू, या राज्यात 12 नवे रुग्ण आढळले; आरोग्य विभाग सतर्क
"Covid 19 Cases: देशात कोव्हिडमुळे चार जणांचा मृत्यू"
Canva

Corona Update: आंध्र प्रदेशात गेल्या 20 दिवसांत कोरोना व्हायरसचे काही नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशात 26 जून ते 16 जुलै 2026 दरम्यान कोविडचे 12 नवीन रुग्ण आढळले आहेत, ज्यांपैकी चार रुग्णांचा मृत्यू कोव्हिडमुळे झाल्याची पुष्टी झाली आहे. पण प्रशासनाने स्पष्ट केले आहे की राज्यातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून सामान्य जनतेने घाबरून जाण्याची गरज नाही. तसेच ज्या रुग्णांचा मृत्यू कोव्हिडमुळे झाला आहे, त्यांना आधीपासूनच अन्य काही जुने आजार होते. सध्या इतर रुग्णांना स्पेशल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.

कडप्पा जिल्ह्यात आढळली होती पहिली केस

आंध्र प्रदेशात या वर्षी करोनाची पहिली केस 26 जून रोजी कडप्पा जिल्ह्यात समोर आली होती. यानंतर 1 जुलै ते 16 जुलै दरम्यान आणखी 11 प्रकरणं समोर आली. संसर्ग झालेल्या लोकांपैकी दोघांची ओळख आधीपासूनच कन्फर्म असलेल्या कोरोना रुग्णांचे निकटवर्तीय (संपर्कातील व्यक्ती) म्हणून झाली आहे. सर्वात जास्त आठ प्रकरणं कडप्पा येथेच नोंदवल्या गेल्या आहेत. तर दोन प्रकरणं गुंटूर, एक विशाखापट्टणम आणि दुसरी काकीनाडा जिल्ह्यात आढळली आहे. आरोग्य विभागाचे प्रमुख सचिव वीरा पांडियन यांनी सांगितले की, ही प्रकरणं वेगवेगळ्या मंडळांमधून आणि ठिकाणांमधून समोर आल्या आहेत. 26 जून ते 15 जुलै दरम्यान राज्यभरात 67 कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये 11 जण पॉझिटिव्ह आढळले होते. काकीनाडा जिल्ह्यातील आणखी एका रुग्णाची टेस्ट तमिळनाडूच्या वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये झाली होती, ती देखील पॉझिटिव्ह आली होती.

(नक्की वाचा: Monsoon UTI: पावसाळ्यात मूत्रमार्गाच्या समस्या का वाढतात? डॉ. वसल यांच्याकडून जाणून घ्या कारणं आणि लक्षणं)

आंध्र प्रदेशात 4 रुग्णांचा मृत्यू

कोरोनामुळे आंध्र प्रदेशात ज्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी तीन रुग्ण कडप्पा जिल्ह्यातील होते, तर एक रुग्ण काकीनाडा जिल्ह्यातील होता. आरोग्य विभागाने सांगितले की, या चौघांनाही आधीपासूनच गंभीर आजार होते. व्हायरसच्या व्हेरियंटची ओळख पटवण्यासाठी 9 जुलै रोजी पाच सॅम्पल (नमुने) जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवण्यात आले होते. वीरा पांडियन यांनी लोकांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, राज्यभरातील डॉक्टर, रुग्णालये आणि हेल्थकेअर स्टाफला अलर्ट करण्यात आले असून ते परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

  • 3 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
  • 2 रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
  • 3 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

केरळमध्ये सर्वात जास्त रुग्ण

या वर्षी कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. 1 जुलैपासून आतापर्यंत संपूर्ण भारतात कोरोनाच्या 339 केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये सर्वात जास्त 115 रुग्ण केरळमध्ये मिळाले आहेत. याशिवाय कर्नाटकात 64, महाराष्ट्रात 43, तमिळनाडूमध्ये 39, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहात 18, दिल्लीत 18 आणि राजस्थानमध्ये 18 केसेस समोर आल्या आहेत.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com