- अनिल अंबानी को 17000 करोड़ रुपये के बैंक लोन फ्रॉड मामले में ED के सामने पेश होना है
- अनिल अंबानी अपने आवास से दिल्ली के लिए निकल चुके हैं, जहां उनसे ईडी दफ्तर में पूछताछ होगी
- लोन की रकम शेल कंपनियों में ट्रांसफर की गई और फर्जी बैंक गारंटी का भी उपयोग किया गया था
Anil Ambani yes bank loan fraud case : अनिल अंबानी यांना आज सकाळी 11 वाजता अंमलबजावणी संचालनालय (ED) समोर हजर राहावं लागणार आहे. ही चौकशी 17 हजार कोटींच्या बँक लोन फ्रॉड प्रकरणात करण्यात येणार आहे. अनिल अंबानी यांच्या अनेक कंपन्यांवर बनावट बँक गॅरेंटी, शेल कंपन्यांद्वारे निधी हस्तांतरण आणि कर्जाची चुकीची मंजुरी असे गंभीर आरोप आहेत. यापूर्वी ईडी या प्रकरणात 35 हून अधिक ठिकाणी, 50 कंपन्या आणि 25 हून अधिक जणांकडे तीन दिवसांपर्यंत छापेमारी केली होती. यादरम्यान मोठ्या संख्येत कागदपत्र आणि डिजिटल पुरावे सापडले होते.
Yes बँकेकडून तीन हजार कोटींचं कर्ज, पैसे आधीच वितरित...
ईडीच्या तपासानुसार, 2017 ते 2019 या कालावधीत येस बँकेकडून अनिल अंबानी ग्रुपच्या कंपन्यांना तब्बल तीन हजार कोटींचं कर्ज देण्यात आलं होतं. कर्ज मंजूर होण्यापूर्वीच बँक प्रमोटरांना पैसे पाठवण्यात आले, म्हणजेच घोटाळ्याच्या तयारी आधीच करण्यात आली होती. ज्या कंपन्यांना कर्ज देण्यात आलं, त्यांची कागदपत्र नंतर तयार करण्यात आली. अनेक ठिकाणी तर कर्ज त्याच दिवशी मंजूर आणि ज्या दिवशी अर्ज करण्यात आला त्याच दिवशी कर्ज वितरित करण्यात आलं. काही प्रकरणांमध्ये कर्जाची रक्कम मंजुरीपूर्वीच हस्तांतरित करण्यात आली.
शेल कंपन्यांमध्ये फंड ट्रान्सफर, बनावट हमी
कर्जाची रक्कम त्यांच्या ग्रुपची दुसरी कंपनी आणि शेल कंपन्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आल्याचं ईडीच्या चौकशीत समोर आलं आहे. अनेक कंपन्यांचे पत्ते, संचालक आणि कादगपत्र जुळत नाही. केवळ इतकच नाही तर बनावटी बँक गॅरेंटीचाही वापर करण्यात आला. ओडिसातील एक कंपनी बिस्वाल ट्रेडलिंक प्रायव्हेट लिमिटेडनेही अनिल अंबानींच्या तीन कंपन्यांना 68 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या बनावट हमी दिल्या होत्या, ज्यांचे संचालक पार्थ सारथी बिस्वाल यांना ईडीने अटक केली आहे.
नक्की वाचा - Chanda Kochhar Guilty: Videocon ला 300 कोटींचे कर्ज देण्यासाठी 64 कोटींची लाच घेतली, चंदा कोचर दोषी
रिलायन्स कम्युनिकेशनवर 14 हजार कोटींहून अधिक फसवणूक
अनिल अंबानी यांच्या विरोधात दुसरं मोठं प्रकरण रिलायन्स कम्युनिकेशनचं आहे. ज्यामध्ये 14 हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज फसवणुकीचा आरोप आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने या कंपनीला फ्रॉडच्या यादीत टाकलं आहे आणि सीबीआयमध्ये गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे.
लुक आऊट सर्क्युलर जारी, परदेशातील संपत्तींचाही तपास..
अनिल अंबानींनी देश सोडून जाऊ नये यासाठी त्यांच्याविरोधात ईडीने लुक आऊट सर्क्युलर जारी केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या परदेशातील बँक अकाऊंट आणि संपत्तीचा तपास सुरू आहे. सोबतच सहा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी त्यांना समन्स पाठविण्यात आला आहे आणि 35 बँकांना नोटीस जारी करण्यात आली आहे. कर्जे एनपीएमध्ये रूपांतरित झाली तेव्हा वेळेवर माहिती का दिली नाही, हा प्रश्न नोटीसीत विचारण्यात आला आहे.