2 hours ago

Breaking News : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत २०२५ मध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० सामना रंगणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाची उत्सुकता लागलेली आहे. मात्र जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडले आहेत. याच पार्श्वभूमीवर आशिया कप स्पर्धेत भारतानं पाकिस्तानशी क्रिकेट सामना खेळू नये अशी मागणी राजकीय वर्तुळातून होत आहे. महाराष्ट्रतही ठाकरेंच्या पक्षाकडून या सामन्याचा निषेध करण्यात येणार आहे.

Sep 14, 2025 17:00 (IST)

LIVE Update: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही - आनंद परांजपे

संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी संजय राऊत यांनी अजितदादा पवार यांच्यावर केलेल्या टिकेनंतर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर टिका करणार्‍या संजय राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

Sep 14, 2025 16:59 (IST)

LIVE Update: मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत राडा

- मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत राडा

- संस्थेच्या खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गोंधळ

- सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये थेट व्यासपीठावरच धक्काबुक्की आणि बाचाबाची

- खासगी विद्यापीठ हेच संस्थेसाठी फायदेशीर असल्याची सत्ताधाऱ्यांची भूमिका 

- तर क्लस्टर विद्यापीठ हेच संस्थेतील लोकशाही पद्धतीला जिवंत ठेवणार असल्याचा विरोधकांचा दावा 

- खासगी विद्यापीठ निर्मितीला विरोधकांचा पूर्णपणे विरोध

- याच मुद्द्यावरून वार्षिक सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा

Sep 14, 2025 16:59 (IST)

LIVE Update: भारत-पाकिस्तान सामनावरून इम्तियाज जलील यांची सत्ताधारी नेत्यांवर टीका

भारत-पाकिस्तान सामनावरून इम्तियाज जलील यांची सत्ताधारी नेत्यांवर टीका 

जलील यांनी शेअर केला सत्ताधारी नेत्यांचा 'पाकिस्तानची टीम' उल्लेख केलेला फोटो

रक्त आणि पाणी एकसोबत वाहू शकत नाही : जलील 

छत्रपती संभाजीनगरच्या सत्ताधारी नेत्यांचा जलील यांच्याकडून पाकिस्तानचा संघ म्हणून उल्लेख

Sep 14, 2025 14:34 (IST)

Live Update : भारताने पाकिस्तान सोबत मॅच खेळू नये- नाना पाटेकर

Live Update : भारताने पाकिस्तान सोबत मॅच खेळू नये असे स्पष्ट मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केले आहे. आशिया चषकासाठी आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नाना पाटेकर यांनी हे वक्तव्य केले आहे.  

Advertisement
Sep 14, 2025 14:09 (IST)

Live Update : पानिपतकार विश्वास पाटील 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

Live Update : विश्वास पाटील 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 

Sep 14, 2025 13:20 (IST)

Live Update : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं मुंबईत स्वागत

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांचं मुंबईत स्वागत

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत दाखल

Advertisement
Sep 14, 2025 13:00 (IST)

Live Update : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत आज महाराष्ट्रात येणार

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत आज महाराष्ट्रात येणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई सेंट्रल येथे त्यांचे स्वागत करतील

- C P राधाकृष्ण हे उपराष्ट्रपती झाल्याने गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची अतिरिक्त जबाबदारी

- गुजरातहून तेजस एक्सप्रेसने राज्यपाल देवव्रत मुंबई सेंट्रल स्थानकावर दाखल होतील

- महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार उद्या स्वीकारणार

- राज्यपालांच्या पत्नी दर्शना देवी देखील सोबत उपस्थित

- आचार्य देवव्रत उद्या सकाळी ११ वाजता राजभवनमधील दरबार हॉल येथे शपथ घेणार

Sep 14, 2025 12:21 (IST)

Live Update : मुसळधार पावसाने तेरणा नदीला पुराचा धोका, जीव धोक्यात घालून नदीकाठावर पर्यटकांची रीलबाजी

मुसळधार पावसाने तेरणा नदीला पुराचा धोका, जीव धोक्यात घालून नदीकाठावर पर्यटकांची रीलबाजी 

चिमुकल्याना घेऊन उत्साही पर्यटकांचा फोटो सेशन 

तेरणा धरण अगोदरच 100% क्षमतेने भरलं, रात्रभर झालेल्या पावसामुळे नदीत पाण्याचा विसर्ग वाढला 

प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, मात्र उत्साही पर्यटकांना रोखण्यासाठी नदीकाठी सुरक्षा व्यवस्था नाही

Live Update : मुसळधार पावसाने तेरणा नदीला पुराचा धोका, जीव धोक्यात घालून नदीकाठावर पर्यटकांची रीलबाजी 

Advertisement
Sep 14, 2025 12:20 (IST)

Live Update : मुसळधार पावसाने तेरणा नदीला पुराचा धोका, जीव धोक्यात घालून नदीकाठावर पर्यटकांची रीलबाजी

मुसळधार पावसाने तेरणा नदीला पुराचा धोका, जीव धोक्यात घालून नदीकाठावर पर्यटकांची रीलबाजी 

चिमुकल्याना घेऊन उत्साही पर्यटकांचा फोटो सेशन 

तेरणा धरण अगोदरच 100% क्षमतेने भरलं, रात्रभर झालेल्या पावसामुळे नदीत पाण्याचा विसर्ग वाढला 

प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, मात्र उत्साही पर्यटकांना रोखण्यासाठी नदीकाठी सुरक्षा व्यवस्था नाही

Sep 14, 2025 11:48 (IST)

Live Update : मुंबईची धरणसाखळी अद्याप थोड्या पावसाच्या प्रतीक्षेत

मुंबईची धरणसाखळी अद्याप थोड्या पावसाच्या प्रतीक्षेत

वर्षभरासाठी मुंबईकरांना लागणाऱ्या पाणी साठ्याच्या ९८.४० पाणी साठा जमा 

मुंबईला पाणीपुरवठा अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी यास धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो

मुंबईत सध्या १४ लाख २४ हजार १४६ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा 

तर मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आवश्यक 

येणाऱ्या १७ दिवसांमध्ये तलाव तथा धरण क्षेत्रात पाऊस पडल्यास मुंबईचा पाणी साठा १०० टक्के जमा होईल.

Sep 14, 2025 11:26 (IST)

Live Update : हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाची हजेरी..

 हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, काल मध्यरात्रीपासून वसमत आणि औंढा तालुक्यातील टेंभुर्णी, कुडाळ, वळद, नागापूर, नहाद यासारख्या पाच ते सहा गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने या गावात पावसाचं पाणी शिरल असून संसार उपयोगी साहित्याची नासाडी झाली आहे, तर या पावसाचं पाणी अनेक शेतामध्ये सुद्धा शिरल असल्याने खरीप हंगामातील सोयाबीन कापूस यासारख्या पिकांचं मोठं नुकसान झाला आहे.

Sep 14, 2025 10:22 (IST)

Live Update : मराठवाड्यात गेल्या 24 तासांत 33 मंडळात अतिवृष्टीची नोंद

मराठवाड्यात गेल्या 24 तासांत 33 मंडळात अतिवृष्टीची नोंद 

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड ,हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद 

गेल्या 24 तासात सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 10 मंडळात अतिवृष्टीची नोंद

छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील दहा मंडळात अतिवृष्टी

मराठवाड्यात सर्वाधिक पैठणच्या नांदर मंडळात 208 मिमी पावसाची नोंद

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 10, जालना 5, बीड जिल्ह्यातील 7, लातूर 7, धाराशिव 1, नांदेड 2 आणि हिंगोली जिल्ह्यातील 1 मंडळात अतिवृष्टीची नोंद

Sep 14, 2025 10:21 (IST)

Live Update : शेअर मार्केटच्या नावाखाली तब्बल 20 लाखांची फसवणूक

अकोल्यात शेअर मार्केटच्या नावाखाली ऑनलाइन लाखों रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला सायबर पोलिसांनी संभाजीनगर येथून अटक केली आहे. योगेश अर्जुन जवंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने त्यांना शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या प्रकरणी सायबर पोलिसांनी आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याखाली कारवाई केली आहे.

Sep 14, 2025 10:14 (IST)

Live Update : अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनचा दशकपूर्ती सोहळा

अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनचा दशकपूर्ती सोहळा 

पुण्यात नाम फाउंडेशनचा सोहळा 

गणेश कला क्रीडा मंच येथे हा सोहळा पार पडतोय 

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडणार सोहळा 

२०१५ साली नाम फाउंडेशनची स्थापना झाली आणि आज फाउंडेशनची दशकपूर्ती होत आहे

यानिमित्ताने पुण्यात कार्यक्रमाचा आयोजन

Sep 14, 2025 10:13 (IST)

Live Update : पैठणच्या हर्षी शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस

पैठणच्या हर्षी शिवारात ढगफुटी दृश्य 

जोरदार पावसामुळे हर्षी परिसरातील नदी नाल्यांना आलापुर 

हर्षी परिसरातील तूर ,मका ,कापूस ,सोयाबीन ही पिके पाण्याखाली

शेतकऱ्याचा मोठा नुकसान, रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टरवरील पिकात शिरले पाणी

काही ठिकाणी पाण्यात अतिधाडस करत वाहन टाकत आहे

Sep 14, 2025 10:12 (IST)

Live Update : नाशिकमध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एक दिवसीय कार्यकर्ता शिबीर

नाशिकमध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एक दिवसीय कार्यकर्ता शिबीर होते आहे. राज्यभरातून नेतेमंडळी आणि कार्यकर्ते या अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत. यासोबतच उद्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रोश मोर्चाही नाशकात काढण्यात येणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज वृत्तपत्रांमध्ये शरद पवारांच्या पक्षाकडून जाहिराती देण्यात आले असून 'देवा तूच सांग ना' या शीर्षकाखाली असलेल्या या जाहिराती सध्या चर्चेत ठरतायत. देवा भाऊंच्या जाहिरातीला हे उत्तर आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित होत असून आम्ही निनावी जाहिराती देत नाहीत, आमचा देव विट्ठल असून देवा भाऊंची जाहिरात ही मित्रपक्ष, ठेकेदार की मेघा इंजीनियरिंगनी दिली ? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला असून राज्यात जाती जातीवरून राज्य सरकार वाद निर्माण करत असल्याचा आरोपही पवारांनी केला आहे..

Sep 14, 2025 08:40 (IST)

Live Update : आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आणखी 4 आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक

आयुष कोमकर हत्या प्रकरण

आयुष कोमकर हत्या प्रकरणातील अजून ४ आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक

आंदेकर परिवारातल्या चौघांना पुणे पोलिसांकडून गुजरात मधून अटक

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई 

शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंबेकर या चारही आरोपींना अटक

Sep 14, 2025 07:15 (IST)

Live Update : धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची हजेरी

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची हजेरी

जिल्ह्यात रात्रभर सर्वदूर जोरदार पावसाने लावली हजेरी 

मुसळधार पावसामुळे शेती पिकांमध्ये  पाणीच पाणी

तेरणा नदीला पूर, ढोकी धाराशिव वाहतूक खोळंबली

नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

Sep 14, 2025 06:50 (IST)

Live Update : जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण संवर्गासाठी राखीव झाल्याने 68 सदस्यांना अध्यक्षपदाचे दरवाजे खुले

राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने  जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी जाहीर केलेल्या आरक्षण सोडतीनुसार जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद पुढील अडीच वर्षासाठी सर्वसाधारण संवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले असून या निर्णयामुळे जिल्हा परिषदेतील निवड होणाऱ्या सर्व 68 सदस्यांसाठी अध्यक्षपदाचे दरवाजे खुले झाले आहेत. 2012 नंतर सर्वसाधारण संवर्गासाठी अध्यक्षपद खुले झाले असून त्यामुळे कोणत्याही गट किंवा जात प्रवर्गाचा सदस्य अध्यक्षपदासाठी दावेदार ठरू शकणार आहे मात्र आता अध्यक्षपदाचे निवडीनंतर गट व गणांच्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sep 14, 2025 06:50 (IST)

Live Update : जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण संवर्गासाठी राखीव झाल्याने 68 सदस्यांना अध्यक्षपदाचे दरवाजे खुले

राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने  जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी जाहीर केलेल्या आरक्षण सोडतीनुसार जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद पुढील अडीच वर्षासाठी सर्वसाधारण संवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले असून या निर्णयामुळे जिल्हा परिषदेतील निवड होणाऱ्या सर्व 68 सदस्यांसाठी अध्यक्षपदाचे दरवाजे खुले झाले आहेत. 2012 नंतर सर्वसाधारण संवर्गासाठी अध्यक्षपद खुले झाले असून त्यामुळे कोणत्याही गट किंवा जात प्रवर्गाचा सदस्य अध्यक्षपदासाठी दावेदार ठरू शकणार आहे मात्र आता अध्यक्षपदाचे निवडीनंतर गट व गणांच्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sep 14, 2025 06:48 (IST)

Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पहाटेपासून पुणे दौरा सुरू

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पहाटेपासून पुणे दौरा सुरू

6 वाजता अजित पवारांच्या दौऱ्याला सुरुवात 

शहरात सुरू असलेल्या उड्डाणपूलांच्या आणि विविध त्यांच्या कामांची अजित पवार यांच्याकडून पाहणी

पुण्यातील मुंडवा केशवनगर मधील रखडलेल्या उड्डाणपुलाची  अजित पवार यांनी केली पाहणी 

केशवनगर परिसरात होत असलेला उड्डाणपूल, मुंढवा सिग्नल परिसर आणि गाडीतळ भागातील रस्त्यांची देखील अजित पवार यांच्याकडून करण्यात येणार पाहणी 

अजित पवार यांच्यासह महापालिकेचे अधिकारी देखील उपस्थित

Sep 14, 2025 06:47 (IST)

Live Update : जायकवाडी धरणाचे संपूर्ण 27 दरवाजे उघडले

जायकवाडी धरणाचे संपूर्ण 27 दरवाजे उघडले 

या वर्षात पहिल्यांदाच 27 दरवाजे उघडले 

जायकवाडी धरणातून 1 लाख 13 हजार 184 क्युसेकने विसर्ग सुरू 

जायकवाडीचे 9 आपत्कालीन दरवाजे देखील उघडले

दरवाजे 0.5 फूट उचलून 4.5 फूट पर्यंत उघडण्यात आले

Sep 14, 2025 06:47 (IST)

Live Update : पुण्यातील बिल्डर लोकांना अजित पवारांचा इशारा

पुण्यातील बिल्डर लोकांना अजित पवारांचा इशारा

नागरिकांना समस्या येत असतील तर बिल्डरांचं काम थांबवा

नागरिकांनी फ्लॅट घेऊन जर बिल्डर लोकांना मस्ती आली असेल तर जे आपल्या हातात आहे ती ॲक्शन घ्या

केशवनगर भागातील काही सोसायटीमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही ही तक्रार नागरिकांनी आज सकाळी अजित पवारांकडे केली 

यानंतर अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना देखील फोन लावत केली चौकशी