जाहिरात

ISKCON Temple : आशियातील सर्वात मोठं इस्कॉन मंदिर, नवी मुंबईत मोदींच्या हस्ते उद्घाटन; मंदिरातील 10 खास गोष्टी

गेल्या 12 वर्षांपासून बांधकाम सुरू असलेल्या इस्कॉन मंदिर अखेर पूर्णपणे तयार झालं आहे. 

ISKCON Temple : आशियातील सर्वात मोठं इस्कॉन मंदिर, नवी मुंबईत मोदींच्या हस्ते उद्घाटन; मंदिरातील 10 खास गोष्टी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 15 जानेवारी 2025 रोजी नवी मुंबईतील भव्य इस्कॉन मंदिराचं उद्घाटन करण्यात येणार आहे. गेल्या 12 वर्षांपासून या मंदिराचं बांधकाम सुरू होतं. आशियातील सर्वात मोठ्या मंदिरात वैदीक शिक्षणाचं केंद्रही असणार आहे.  
 

  1. नवी मुंबईतील खारघरमध्ये 9 एकरात पसरलेल्या आशियातील सर्वात मोठं आणि जगातील दुसऱ्या क्रमांकवरील सर्वात मोठं इस्कॉन मंदिराची निर्मिती पूर्ण झाली आहे. 
  2. नवी मुंबईतील खारघरमध्ये गेल्या 12 वर्षांपासून बांधकाम सुरू असलेल्या इस्कॉन मंदिर अखेर पूर्णपणे तयार झालं आहे. 
  3. भगवान कृष्णाला समर्पित या भव्य मंदिराचं नाव 'श्री श्री राधा मदन मोहन जी मंदिर' असं आहे.  
  4. इस्कॉन मंदिरात जवळपास 3 हजार भाविकांसाठी एकत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे
  5. रविवारी भाविकांसाठी मोफत प्रसादाचीही व्यवस्था असेल. पांढऱ्या आणि तपकिरी संगमरवराच्या खास दगडांनी बांधलेले हे भव्य मंदिर आहे
  6. मंदिराचा गाभा भगवान कृष्णाच्या अनेक मनोरंजक 3D चित्रांची प्रदर्शनी लावण्यात आले आहे.
  7. या मंदिरात वैदीक शिक्षणाचं केंद्रही आहे. परदेशी भक्तही येथे येऊन अध्ययन करू शकतील.  
  8. इस्कॉन मंदिर उभारणीसाठी आतापर्यंत जवळपास 200 कोटींचा खर्च करण्यात आला असून भक्तांनी दान केलेल्या पैशातून मंदिराची उभारणी करण्यात आली. 
  9. मंदिराचा मुख्य भाग भगवान श्रीकृष्णाच्या थ्रीडी पेंटिंगने सजवण्यात आलाय आहे. त्याचबरोबर दशावतार मंदिराचे दरवाजे चांदीचे आहेत. ज्यावर गदा, शंख, चक्र आणि ध्वजाच्या सुवर्ण प्रतिमा कोरल्या आहेत. 
  10. जगभरात इस्कॉनची सुमारे 800 मंदिरे आहेत. मात्र नवी मुंबईतील हे मंदिर असे एकमेव मंदिर असेल जिथे इस्कॉनचे संस्थापक स्वामी प्रभुपाद यांचे स्मारक आहे. इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभूपाद यांचे स्मारक असेलेले पहिले मंदिर असणार

Listen to the latest songs, only on JioSaavn.com