
Diwali 2025 : रामनगरी अयोध्येत भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. सरयू नदीच्या ५६ घाटांवर (२६,१७,२१५) 26 लाखांहून अधिक दिवे प्रज्ज्वलित करीत विश्व रेकॉर्ड करण्यात आला. हा ऐतिहासिक क्षण दाखल करुन घेण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीम अयोध्येत उपस्थित होती. या आयोजनात डॉ. राममनोहर लोहिया अवध विश्वविद्यालयाच्या ३२,००० स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमामुळे रामनगरी दिव्यांनी उजळून निघाली.

विश्व रेकॉर्डची चमक
यंदा अयोध्येत दीपोत्सवात दोन विश्व रेकॉर्ड करण्यात आले. पहिला रेकॉर्ड २६,१७,२१५ दिव्यांनी प्रज्ज्वलित करण्याचा होता. यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन विभाग, अयोध्या जिल्हा प्रशासन आणि डॉ. राममनोहर लोहिया अवध विश्वविद्यालयाला गिनीज पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. तर २,१२८ लोकांनी एकत्रितपणे सरयू आरती करून दुसरा रेकॉर्ड केलाय. यासाठी पर्यटन विभाग, अयोध्या जिल्हा प्रशासन आणि सरयू आरती समितीला गिनीज प्रमाण पत्र देण्यात आला.

दिव्यांच्या आरास लावण्यामागील अर्थशास्त्र काय आहे?
दीपोत्सवादरम्यान २६ लाखांहून अधिक दिवे लावण्यामागे एक मजबूत आर्थिक आणि संदेशदेखील आहे. रामनगरीतील हे आयोजन लोकल फॉर वोकलची भावना दर्शवते. ज्यामध्ये स्थानिक उत्पादन, कामगार आणि संस्कृतीला खास महत्त्व देण्यात आलं. दीपोत्सवासाठी लाखो दिव्यांची व्यवस्था करण्यात आली होती. हे दिवे अयोध्या आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील उद्यमींद्वारे तयार करण्यात आले होते. यामुळे हजारो कुटुंबाला रोजगार मिळाला. माती आणि दिव्यांच्या मागणीमुळे पारंपरिक उद्योग पुनर्जीवित करण्यात आला. यामध्ये तेल, वात, पॅकेजिंगसारखे सहाय्यक उद्योगांचाही समावेश आहे.

स्वयंसेवकांची मेहनत
या भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यामागे डॉ. राममनोहर लोहिया अवध विद्यापीठाचे ३२ हजार स्वयंसेवकांची मेहनत आहे. त्यांनी सरयू नदीच्या ५६ घाटांवर साधारण २८ लाख दिव्यांची व्यवस्था केली. ज्यातील २६ लाख दिवे प्रज्ज्वलित करण्यात आले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world