Ayodhya Mosque Project: अयोध्येत आता भव्य नाही, तर छोटी मशीद बनणार! वाचा का बदलला ट्रस्टने निर्णय?

Ayodhya Mosque Project: सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर अयोध्या येथील  धन्नीपुर गावात प्रस्तावित असलेल्या भव्य मशीद प्रकल्पाला मोठा धक्का बसला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Ayodhya Mosque Project: आता या संपूर्ण परिसरात केवळ एका छोट्या मशिदीचेच निर्माण केले जाणार आहे.
मुंबई:

Ayodhya Mosque Project: सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर अयोध्या येथील  धन्नीपुर गावात प्रस्तावित असलेल्या भव्य मशीद प्रकल्पाला मोठा धक्का बसला आहे. निधीची प्रचंड कमतरता आणि मुस्लिम समाजातून मिळालेला थंड प्रतिसाद यामुळे या प्रकल्पाचा मूळ आराखडा आता पूर्णपणे बदलावा लागला आहे. 

इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनने (IICF) दिलेल्या माहितीनुसार, जी मश कधीकाळी एका भव्य आणि विस्तीर्ण स्वरूपात साकारली जाणार होती, ती आता आर्थिक संकटामुळे अत्यंत मर्यादित आणि छोट्या भागात बांधली जाणार आहे. राम मंदिराच्या मुख्य जागेपासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या लखनौ-गोरखपुर राष्ट्रीय महामार्गावरील 5 एकर जमिनीवर हा प्रकल्प उभारला जात आहे.

Advertisement

महत्त्वाच्या योजना बासनात

या प्रकल्पाच्या मूळ आराखड्यानुसार, 5 एकरच्या या विस्तीर्ण भूखंडावर केवळ एक पारंपारिक मशीद नाही, तर संपूर्ण समाजासाठी उपयुक्त ठरेल असा एक भव्य लोककल्याणकारी कॅम्पस तयार केला जाणार होता. यामध्ये स्थानिक लोकांच्या आरोग्यासाठी 300 बेडचे सुसज्ज मल्टी-स्पेशियलिटी रुग्णालय, एक समृद्ध मध्यवर्ती वाचनालय, कम्युनिटी किचन (सामुदायिक स्वयंपाकघर) आणि भारत-इस्लामिक सांस्कृतिक संशोधन केंद्र स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. 

या वादाच्या समाप्तीनंतर या परिसराला एक मोठे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य केंद्र बनवण्याचा ट्रस्टचा मानस होता, मात्र आता निधीअभावी या सर्व मोठ्या योजना अधरात लटकल्या आहेत.

( नक्की वाचा : '1000 खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले असतील'! Missing Link वरील प्रत्येक आरोपाला मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर )

कोट्यवधींच्या बजेटची गरज, पण निधी मिळेना

फाउंडेशनचे सचिव अतहर हुसैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता या संपूर्ण परिसरात केवळ एका छोट्या मशिदीचेच निर्माण केले जाणार आहे. या सुधारित आणि छोट्या योजनेसाठी देखील साधारण 3 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. धक्कादायक बाब म्हणजे, फाउंडेशनला आतापर्यंत देशभरातून केवळ 1.5 कोटी रुपयांचाच निधी गोळा करता आला आहे.

ही जमा झालेली रक्कम मूळ भव्य प्रकल्पाच्या तुलनेत अत्यंत नगण्य असल्याने ट्रस्टला अखेर आपले पाऊल मागे घ्यावे लागले आहे. समाजाकडून अपेक्षेप्रमाणे आर्थिक मदत न मिळाल्यानेच हा निर्णय घ्यावा लागल्याचे आयआयसीएफचे अध्यक्ष जुफर अहमद फारूकी यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Palghar : हसता हसता रडू आलं! पालघरमधल्या धबधब्यावर अवघ्या 2 मिनिटांत बदललं चित्र, पर्यटकांचा जीव... पाहा VIDEO )

प्रशासकीय अड़चणी आणि नकाशा मंजुरीचा अडथळा

हा प्रकल्प वेळेत सुरू न होण्यामागे केवळ निधीची चणचण हे एकमेव कारण नव्हते, तर अनेक प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणींचाही सामना करावा लागला. अयोध्या विकास प्राधिकरणाकडून (ADA) या मशिदीच्या आणि संपूर्ण परिसराच्या नकाशाची मंजुरी मिळवण्यासाठी खूप मोठा कालावधी गेला. 

सुरुवातीला या 5 एकर जमिनीचा वापर बदलणे (लँड युज चेंज) आणि त्यानंतर विकास शुल्क (डेव्हलपमेंट चार्ज) म्हणून एक मोठी रक्कम जमा करण्याची तांत्रिक अट ट्रस्टसमोर होती. प्राधिकरणाने नकाशा मंजूर केला खरा, पण तोपर्यंत निधीचे संकट गडद झाल्याने प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकले नाही. आता नव्या आणि अत्यंत छोट्या स्वरूपासाठी ट्रस्टला आपल्या नियोजनात मोठे फेरबदल करावे लागत आहेत.
 

Advertisement

Topics mentioned in this article