जाहिरात

अयोध्यातील राम मंदिर सोन्यानं झळाळलं, वाचा देशातील 6 प्रमुख मंदिरामध्ये किती आहे सोनं?

अयोध्यातील राम मंदिर सोन्यानं झळाळलं, वाचा देशातील 6 प्रमुख मंदिरामध्ये किती आहे सोनं?
Ram Mandir Ayodhya : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखराला सोन्याने मढवण्यात आले आहे.
मुंबई:


Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदिर आता सोन्याने उजळून निघाले आहे. 5 जून रोजी होणाऱ्या दुसऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मंदिराच्या शिखरावर सोन्याचा थर चढवण्यात आला आहे. हे शिखर दूरूनच या मंदिराची भव्यता भाविकांना आकर्षित करत आहे. त्यामुळे  मंदिर अधिक दर्शनीय आणि भव्य दिसत आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रविवारी (1 जून 2025) मंदिराच्या सोन्याने मढवलेल्या भव्य आणि चमकदार शिखराची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या निमित्तानं आम्ही तुम्हाला देशातील 6 प्रमुख मंदिरांची माहिती देणार आहोत जी सोन्यानं मढवली आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ही माहिती वाचण्यापूर्वी अयोध्येतील राम मंदिराच्या शिखराचा फोटो पाहा

Latest and Breaking News on NDTV

लक्ष्मी नारायण मंदिर, वेल्लोर (Laxmi Narayan Temple Vellore )

तमिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यात महालक्ष्मी किंवा लक्ष्मी नारायण मंदिर आहे. हे मंदिर 1500 किलो सोन्याच्या थराने मढवलेले आहे. श्रीपूरम सुवर्ण मंदिर म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात वापरलेल्या सोन्याच्या प्रमाणाची माहिती वेल्लोर जिल्हा प्रशासनाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. यामध्ये सोन्याच्या सळ्यांना सोन्याच्या पन्नीमध्ये बदलून तांब्याच्या प्लेट्सवर लावले आहे.

Latest and Breaking News on NDTV

कालीघाट मंदिर, कोलकाता

एप्रिल 2024 मध्ये कोलकाता येथील कालीघाट मंदिराच्या 3 शिखरांवरील सोन्याचे काम पूर्ण झाले. यापैकी मधल्या शिखरावर सोन्याचा ध्वज लावण्यात आला आहे. 24 कॅरेटच्या 50 किलो सोन्यापासून तयार केलेले हे शिखर आता पवित्र गर्भगृहाच्या शिखराला सुशोभित करत आहे.

Latest and Breaking News on NDTV

कामाख्या मंदिर, आसाम (Kamakhya Temple)

2020 मध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आसामच्या कामाख्या मंदिराच्या मुख्य मंदिराच्या वरील घुमटावर सोन्याचा थर चढवण्यासाठी 19 किलो सोने दान केले होते. त्याच वर्षी हे काम पूर्ण झाले.

Latest and Breaking News on NDTV

काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी (Kashi Vishwanath Temple)

काशी विश्वनाथ मंदिर 1777 मध्ये इंदूरच्या राणी, महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले होते. यावर प्रथम महाराजा रणजीत सिंह यांनी दान केलेल्या सुमारे 1 टन सोन्याने आपले दोन घुमट सोन्याने मढवले होते. 2021 मध्ये एका दानशूराने ६० किलो सोने दान केले. यापैकी 37 किलो सोन्याने गर्भगृहाच्या आतील भिंती झाकल्या आहेत. तर 23 किलो सोन्याचा थर घुमटाच्या आणि चौकटीच्या खालच्या भागावर चढवण्यात आला.

Latest and Breaking News on NDTV

सोमनाथ मंदिर, गुजरात (Somnath Temple)

गुजरातच्या सोमनाथ मंदिराच्या शिखराचे अनेक भागही सोन्याने मढवलेले आहेत. मंदिराचे गर्भगृह, दोन दरवाजे, त्रिशूळ आणि भगवान शिवाचे डमरू सोन्याने मढवलेले आहे. पण, यात किती सोने वापरले आहे, याची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

( नक्की वाचा : अहिल्यादेवींनी सोमनाथाचं मंदिर बाजूला का उभारलं? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला तो इतिहास )

Latest and Breaking News on NDTV

व्यंकटेश्वर मंदिर, तिरुपती ( Venkateswara Temple Tirupati)

तिरुपती येथील व्यंकटेश्वर मंदिरात सोन्याच्या घुमटापासून (ज्याला आनंद निलय दिव्य विमान म्हणतात) ते देवाच्या मूर्तीपर्यंत, विहिरीपर्यंत सोन्याचा मुलामा चढवलेला आहे.

Latest and Breaking News on NDTV

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com