Bakri Eid 2026: बकरी ईदसाठी अलिशान कारच्या किंमतीत विकला गेला बोकड, किंमत ऐकून तोंडात बोट घालाल

या काळात त्याच्या किंमती ही गगनाला भिडलेल्या असतात हे बोकड बाजारातील खरेदी विक्री वरून स्पष्ट होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बकऱ्यांच्या विक्रीसाठी बाजारात व्यापाऱ्यांची आणि ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या बाजारात यंदा विविध वैशिष्ट्यपूर्ण आणि उच्च जातीच्या बकऱ्यांची मोठी आवक झाली आहे. त्यांची किंमत पाहून तुम्ही ही आश्चर्यचकीच व्हाल. या किंमती लाखांच्या घरात आहेत. आतापर्यंत बकरा बाजारात सर्वाधिक 3,00,000 रुपयांच्या बकऱ्याची विक्री झाली आहे. बकरी ईद दोन दिवसांवर आहे. त्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी सकाळपासूनच नागरिकांची लगबग सुरू आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील हा प्रसिद्ध बकरा बाजार आहे.

मुरादाबाद येथील प्रसिद्ध व्यापारी मोहम्मद अयान यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारात 75,000 रुपयांपासून ते थेट 6,50,000 रुपये प्रति जोडी या दराने बकरे उपलब्ध आहेत. यामध्ये 'बरबरी' जातीच्या जोडीची किंमत 6,50,000 रुपये, तर 'तोतापरी' आणि 'पंजाबी' जातीच्या बकऱ्यांची किंमत 4,00,000 रुपये प्रति जोडी इतकी आहे. कडक उन्हाळ्याचा त्रास या महागड्या बकऱ्यांना होऊ नये, यासाठी व्यापाऱ्यांनी मंडीत खास कुलरची व्यवस्था केली आहे. या बकऱ्यांना मोठी मागणी ही आहे. ते खरेदी करताना किंमतीत कोणती ही तडजोड केली जात नाही. 

Advertisement

नक्की वाचा - Why is Bakri Eid celebrated? : बकरी ईद का साजरी केली जाते? प्राण्यांची कुर्बानी देण्यामागे काय आहे कारण?

या उच्चभ्रू जातीच्या बकऱ्यांचा आहार सर्वसामान्य बकऱ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्यांना रोजच्या आहारात सुका मेवा (ड्राई फ्रूट्स), शुद्ध देशी तूप, देशी चणे, गूळ आणि ताज्या फळांचे सेवन दिले जाते. या विशेष आहारामुळे 'बरबरी' जातीच्या बकऱ्याचे वजन तब्बल 130 किलो, तर 'तोतापरी' व 'पंजाबी' बकऱ्यांचे वजन 110 किलोपेक्षा जास्त आहे. या बकऱ्यांचे वय साधारणपणे 2.5 ते 3 वर्षे दरम्यान आहे.

नक्की वाचा - Buldhana News: एका प्रश्नाने आयुष्य उद्धवस्त! 4 पोटच्या मुलांना संपवलं, स्वत: ही मेला, बापानं असं का केलं?

या बकऱ्यांची किंमत एका अलिशान गाडी पेक्षा ही जास्त असल्याचं स्पष्ट झालं आहे. ईदसाठी हे बकरे खरेदी करताना खरेदी करणारी व्यक्ती ही हात तोकडा घेत नाही. बकरी ईदला प्राण्याचा बळी देण्याची जूनी परंपरा आहे. मुस्लिम धर्मात या दिवशी बळी देणे हे पवित्र समजले जाते. त्यामुळे बकरी ईदला मोठ्या प्रमाणात बोकडांची खरेदी होत असते. या काळात त्याच्या किंमती ही गगनाला भिडलेल्या असतात हे बोकड बाजारातील खरेदी विक्री वरून स्पष्ट होत आहे.