एक किलो मिठाची किंमत 20 ते 30 हजार रुपये आहे, असं जर तुम्हाला कुणी सांगितलं तर? तुमचा पहिले तर विश्वासच बसणार नाही. पण हे खरं आहे. उत्तराखंडमध्ये एक खास प्रकारचे मिठ तयार केले जात आहे. ते लवकरच बाजारात विक्रीसाठी आणले जाईल. या मिठाला बांबू मिठ म्हणून बोललं जातं. जगभरात हेच मिठ कोरियन मिठ या नावाने ओळखलं जातं. हे मिठ सर्वात आधी कोरियामध्येच तयार केले होते. हे मिठ पोष्टीक समजले जाते. उत्तराखंडच्या वन विभागाकडून हे मिठ तयार केले जात आहे. जगातील सर्वात महागडं मिठ म्हणून या बांबू मिठाकडे पाहीले जाते. उत्तराखंडचा वन विभाग या मिठाचा अभ्यास करत आहे. हे मिठ तयार करण्याची ट्रायल जवळपास 6 वेळा केली गेली आहे. हे मिठ तयार करण्याची प्रक्रीया ही मोठी आणि गुंतागुंतीची आहे. त्याला वैज्ञानिक आधार ही आहे. जसं सर्व सामान्य मिठ असतं तसेच हे मिठ असते. पण हे बनवताना बांबूचा विशिष्ठ पद्धतीने वापर केला जातो.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिठ बनवताना एक बांबू घेतला जातो. त्याच्या मोकळ्या जागे मिठ भरले जाते. त्यानंतर बांबूच्या दोन्ही टोकांकडे माती लावून त्याचे तोंड बंद केले जाते. त्यानंतर एका भट्टीत ते टाकले जाते. पुढे 400 डिग्रीवर ते शिजवले जाते. त्यानंतर ते बाहेर काढले जाते. त्याची पाऊडर तयार केली जाते. हे जवळपास नऊ वेळा करावं लागतं. त्यानंतर बांबू मिठ तयार होते. एक किलो बांबू सॉल्ट बनवण्यासाठी 20 दिवस लागतात. हे मिठ बांबूमध्ये टाकून शिजवल्यामुळे बांबूमधील सत्वही या मिठात मिसळतात.
ट्रेंडिंग बातमी - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...
बांबू सॉल्ट म्हणजे हे कोरियन मिठाचाच एक प्रकार आहे. या प्रकारचे मिठ सर्वात आधी कोरियामध्येच तयार केले गेले. या मिठात अनेक प्रकारचे जीवनसत्व असतात. कैल्शियम, मैग्नीशियम, आयरन, कॉपर, जिंक हे या मिठात सापडतात. या मिठाचा रंग ही पर्पल असतो. विशेष पद्धतीने हे मिठ बनवले जात असल्याने त्याचा रंग हा पर्पल होतो. याला बाजारात पर्पल बांबू सॉल्ट म्हणून ओळखले जाते. या मिठाला बाजारात मोठी मागणी आहे. त्यात असलेल्या जीवनसत्वामुळे त्याला अधिक मागणी आहे. शिवाय त्याची किंमतही जवळपास 20 ते 30 हजार रुपये किलो इतकी आहे.
ट्रेंडिंग बातमी - HoneyTrap: हनी ट्रॅप म्हणजे काय? तो कोणासाठी असतो? या ट्रॅपमध्ये 'ते' कसे अडकतात?
उत्तराखंड सरकार हे मिठ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहे. यातून उत्तराखंडमधील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. याचा थेट फायदा राज्यालाही होईल. त्यामुळे कोरियन मिठ म्हणजेच बांबू सॉल्ट सध्या उत्तराखंडमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. लवकरच ते बाजारात येणार आहे. त्याची किंमत ही जरी जास्त असली तरी त्याचे महत्व लक्षात घेता जास्त पैसे देण्यासही ग्राहक तयार असतात.