
डीआरडीओचे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर (Former Director of DRDO Dr. Pradeep Kurulkar) यांचे हनीट्रॅप प्रकरण उघड झाले आहे. त्यामुळे देशात एक खळबळ उडाली. कुरलकर याने हनीट्रॅपमध्ये अडकवून पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एटीएएने या प्रकरणी आता धक्कादायक खुलासे केले आहेत. याच कुरुलकरने पाकिस्तानी हेरांना देशाच्या संरक्षणा विषयीची गुप्त माहिती पुरवल्याचे तपासातही उघड झाले आहे. त्याच्याविरोधात दोन हजार पानांचं आरोपपत्र सादर करण्यात आलं आहे. त्यानंतर हीनट्रॅपचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हनीट्रॅप म्हणजे काय? तो कोणासाठी असतो आणि त्यात कोण अडकतं याची माहिती आपण घेणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हनी ट्रॅप म्हणजे काय?
हनीट्रॅप हा एखादी गुप्त माहिती बाहेर काढण्याचा मार्ग समजला जातो. दुश्मन देशाची गुप्त माहिती बाहेर काढण्यासाठी संबधित देशाच्या मोठ्या पदावरील व्यक्तीला यात टार्गेत केले जाते. या शिवाय मोठ्या व्यक्तीच्या जवळच्या माणसाला ही या ट्रॅपमध्ये अडकवले जावू शकते. काही ड्रायव्हरही यात फसले असल्याची उदाहरणे आहे. खास करून या मिशनमध्ये सुंदर महिलांचा वापर अधिक होतो. तशी उदाहरण पाहायला ही मिळतात. या प्रकारात एखाद्या व्यक्तीशी प्रेम किंवा लैंगिक संबंध निर्माण केले जातात. त्यातून संबधीत व्यक्तीकडून गोपनिय माहिती काढून घेतली जाते.
ट्रेंडिंग बातमी - DRDO चे माजी संचालक हनीट्रॅप प्रकरण; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती उघड
गुप्त माहितीसाठी ट्रॅप
पुढे या माहितीचा वापर राजकीय, आर्थिक आणि हेरगिरीच्या उद्देशांसाठी केला जातो. हनीट्रॅप हा गुप्तचर ऑपरेशन्समध्ये वापरला जाणारा एक गुप्त तंत्र समजला जातो. यामध्ये दुश्मन देशाच्या व्यक्तीशी प्रेम संबध प्रस्तापीत करायचे. त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. पुढे त्याच्या बरोबर लैंगिक संबंध ही निर्माण करायचे. त्यातून त्या व्यक्तीचा विश्वास जिंकायचा. असा त्यांचा डाव असतो. त्या महिला ही अतिशय सुंदर असतात. त्यामुळे समोरची व्यक्ती अनेक वेळा भाळते. याचाच गैरफायदा घेवून महत्वाची माहिती गुप्तहेर काढून घेता. या साठी त्यांनी विशेष ट्रेनिंग दिले जाते. टार्गेट कोण आहे त्याची इंत्यभूत माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचवली जाते.
ट्रेंडिंग बातमी - Shocking VIDEO : नवरी वाट पाहत राहिली, नवरदेवाचा मंडपातच हार्ट अटॅकने मृत्यू
दबाव टाकण्याची पद्धत
एकदा का टार्गेट त्यांच्या जाळ्यात अडकला की ते आपला फास आवळायला सुरूवात करतात. आधी आवश्यक माहिती काढून घेतली जाते. संबधीतक व्यक्तीचे लक्ष्य कसे विचलीत होईल याची काळजी घेतली जाते. हनीट्रॅममध्ये अडकल्यानंतर त्या व्यक्ती बरोबर शरिरसंबध ठेवताना त्याचे खाजगी फोटो किंवा व्हिडीओ काढले जातात. त्या द्वारे पुढे ब्लॅकमेलही केले जाते. त्यातून गोपनिय माहिती तर मिळवलीच जाते पण त्याच बरोबर पैसेही उकळण्याचा उद्योग केला जातो. या हनीट्रॅममध्ये खास करून देशातील संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना अडकवले जाते. त्यांच्याकडून सुरक्षेची माहिती यातून मिळवली जाते. याचा वापर मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यासाठी, राजकीय लाभ उचलण्यासाठी आणि हरगिरीसाठी केला जातो.
भारतात या आधीही हनी ट्रॅप
डॉ. प्रदीप कुरुलकर याचा कारनामा समोर येण्या आधी भारतात अनेक अधिकारी हे हनीट्रॅपचे बळी ठरले आहेत. 1980 च्या दशकातील भारतात असेच एक हनीट्रॅपचे प्रकरण घडले होते. त्यावेळी रॉचे एक अधिकारी के.व्ही. उन्नीकृष्णन यांच्यावर अमेरिकेसाठी हेरगिरी करण्याचा आरोप होता. त्यावेळी ते एका हनीट्रॅपमध्ये अडकले होते असं ही बोललं जातं. त्यावेळी ते चेन्नईत कार्यरत होते. शिवाय त्यांच्यावर LTTE वर लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती. मात्र त्यांना 1987 साली त्यांना अटक करण्यात आली. या शिवाय पाकिस्तानमध्ये भारतीय परराष्ट्र सेवेतील असलेल्या माधुरी गुप्ता यांचं प्रकरण ही ताजं आहे. 2010 मध्ये त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर पाकिस्तानच्या ISI या संस्थेला जुप्त माहिती पुरवल्याचा आरोप होता. त्यांना या प्रकरणी शिक्षा ही झाली होती. संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांची पोस्टिंग आणि त्यांच्या कुटुंबांविषयीची माहिती त्यांनी लिक केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world