VIDEO: भयंकर! धावत्या स्कूल व्हॅनमधून 4 मुले रस्त्यावर पडली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Viral VIDEO: बंगळुरूमधील के. आर. पुरम भागातील गायत्री लेआउटमध्ये एका चालत्या शालेय ओम्नी व्हॅनचा मागचा दरवाजा अचानक उघडल्याने 4 विद्यार्थी रस्त्यावर चालत्या गाडीतून खाली पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

शालेय विद्यार्थ्यांची खाजगी वाहनांमधून होणारी वाहतूक आणि त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बंगळुरूमध्ये एक थरारक घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन घरी जाणाऱ्या एका मारुती ओम्नी व्हॅनचा मागचा दरवाजा चालत्या गाडीत अचानक उघडला. दरवाजा उघडताच व्हॅनच्या मागील भागात बसलेले चार विद्यार्थी थेट धावत्या गाडीतून पाठीमागे रस्त्यावर फेकले गेले.

खड्ड्यामुळे अपघात की चालकाचा निष्काळजीपणा?

धावत्या व्हॅनचा मागचा दरवाजा नेमका कोणत्या कारणामुळे उघडला, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र, स्थानिक पातळीवर दोन शक्यता वर्तविल्या जात आहेत की,  रस्त्यावरून जात असताना व्हॅन एका मोठ्या खड्ड्यावर आदळली आणि त्या धक्क्याने मागचा लॉक तुटून दरवाजा उघडला. व्हॅन चालवण्यापूर्वी पाठीमागील दरवाजा व्यवस्थित लॉक केला गेला नव्हता, ज्यामुळे चालत्या गाडीत तो अचानक उघडला.

Advertisement

(नक्की वाचा-  Mysterious Blue Hole: खोल समुद्रात सापडलं 3200 वर्ष जुनं अनोखं विश्व; शास्त्रज्ञही झाले चकीत!)

सुदैवाने मोठा अनर्थ टळला

व्हॅनमधून मुले खाली पडताच चालकाने तात्काळ गाडी थांबवली. व्हॅनच्या पुढच्या सीटवर बसलेल्या इतर विद्यार्थ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने रस्त्यावर पडलेल्या मुलांच्या मदतीसाठी धाव घेतली. ज्या गल्लीमध्ये ही घटना घडली तो रस्ता अत्यंत अरुंद होता आणि सुदैवाने त्या वेळी मागून कोणतेही मोठे वाहन वेगात येत नव्हते. कमी वाहतुकीमुळे या ठिकाणी एक अत्यंत भीषण अपघात टळला आहे. या अपघातात खाली पडलेल्या मुलांना सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत झालेली नसून ते केवळ किरकोळ जखमी झाले आहेत.

Topics mentioned in this article