Bank Holiday Today January 1 2026 : नव्या वर्षाची सुरुवात होताच सर्वात आधी हाच प्रश्न डोक्यात येतो की आज बँक खुली असेल की नाही? १ जानेवारीबाबत लोकांमध्ये गोंधळ असतो. कारण १ जानेवारीची सुट्टी संपूर्ण देशभरात लागू नसते. १ जानेवारीला वर्षाच्या पहिल्याच दिवशी बँकेत जाऊन कामं संपवण्याचा लोक विचार करतात. अशात तुम्हीही बँकेत जाण्याचं प्लानिंग करीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण माहितीशिवाय बँकेत गेलात तर तुमचा वेळ वाया जाऊ शकतो. यासाठी घरातून निघण्यापूर्वी कुठे-कुठे बँका बंद असतील हे जाणून घेऊया.
भारतीय रिझर्व्ह बँक दरवर्षी संपूर्ण देशातील सुट्ट्यांची यादी जाहीर करतो. यामध्ये प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळ्या सुट्ट्यांचा समावेश असतो. यामध्ये राज्यातील खास दिवस, सण, उत्सव यानुसार सुट्ट्या दिल्या जातात. याशिवाय दर रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी संपूर्ण देशातील बँका बंद असतात.
१ जानेवारी २०२६ रोजी बँका सुरू असतील की बंद?
RBI च्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, १ जानेवारी २०२६ गुरुवारी, संपूर्ण देशातील बँक बंद राहणार नाहीत. अधिकांश राज्यांमध्ये नेहमीप्रमाणे बँका खुल्या असतील. मात्र काही राज्यात नववर्ष आणि स्थानिक सणांमुळे बँका बंद असतील.
या राज्यांमधील बँका बंद असतील...
आज १ जानेवारी, २०२६ रोजी मिझोराम, तामिळनाडू, सिक्कीम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, पश्चिम बंगाल आणि मेघालय या भागात बँका बंद असतील. या राज्यांमध्ये नववर्षे आणि स्थानिक उत्सवांमुळे बँकेचं कामकाज बंद राहील. जर तु्म्ही या भागात राहता तर बँकेत जाण्यापूर्वी लक्ष द्याल.
या राज्यांव्यतिरिक्त देशातील इतर भागात बँका खुल्या राहतील आणि दररोजचं काम नियमित होईल. महाराष्ट्रातील बँकाही सुरू राहतील. मात्र तरीही काही महत्त्वाच्या कामासाठी आपल्या जवळच्या ब्रांचला फोन करून माहिती घ्या.
डिजिटल बँकीग सुरू...
तुमच्या राज्यातील बँका बंद असतील तर घाबरुन जाण्याचं कारण नाही. युपीआय, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि एटीएम सेवा सुरू राहतील. तुम्ही पैसे पाठवू शकता, बॅलेन्स चेक करू शकता आणि बिलदेखील भरू शकता. केवळ बँकेच्या ब्रान्चशी संबंधित कामं आणि चेक क्लिअरन्स आज होणार नाहीत.