Viral News: भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरू शहरातील एक रिक्षाचालक सध्या चर्चेत आहे. एका ऑटो रिक्षा चालकाने प्रवाशाकडून भाडे स्वीकारण्यासाठी थेट आपल्या स्मार्टवॉचचा वापर केल्याने तो सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. इंदिरानगर ते कोरमंगला असा प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने हा थक्क करणारा अनुभव सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर शेअर केला असून, हा व्हिडिओ आणि पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे.
हेमंत नावाच्या एका युजरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "मी आज इंदिरानगर ते कोरमंगला जाण्यासाठी ऑटो केली. प्रवास पूर्ण झाल्यावर मी ड्रायव्हरला ऑनलाईन पेमेंटसाठी QR कोड मागितला. त्यावर त्या भावाने थेट आपला हात पुढे केला. त्याच्या स्मार्टवॉचच्या स्क्रीनवर यूपीआय (UPI) चा QR कोड सेट होता.
(नक्की वाचा- Pune-Shirdi Railway: साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-शिर्डी पहिली थेट रेल्वे सेवा 17 जूनपासून सुरू सोशल मीडियावर चर्चा ही पोस्ट सोशल मीडियावर येताच काही तासांतच लाखो लोकांनी ती पाहिली आणि त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. बंगळुरू शहरात तंत्रज्ञान सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात किती खोलवर रुजले आहे, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. भारतातील डिजिटल पेमेंट व्यवस्थेने अगदी तळागाळातील घटकांपर्यंत कशी क्रांती घडवून आणली आहे, यावर या निमित्ताने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. (नक्की वाचा- School Time: राज्यातील शाळांची वेळ बदलणार? ॲक्टिव्ह टीचर्स फोरमने शिक्षणमंत्र्यांकडे काय केली मागणी?) एका युजरने गमतीने लिहिले, "माझ्या मते कोरमंगला आणि इंदिरानगरमधील ऑटो चालक तिथल्या आयटी (IT) इंजिनिअर्स इतकेच कमावत असावेत, म्हणूनच त्यांच्याकडे असे गॅजेट्स आहेत." दुसऱ्या एका युजरने लिहिले, "ज्यांचे दोन्ही हात कामात व्यग्र असतात, त्यांना एखाद्या टेक कंपनीच्या सीईओपेक्षा स्मार्टवॉचची जास्त गरज असते आणि हा त्याचा योग्य वापर आहे." भारतात डिजिटल इंडिया मोहीम आणि UPI मुळे सुट्या पैशांची कटकट कशी मिटली आहे आणि ऑटो चालकासारखा सामान्य घटकही तंत्रज्ञानाचा किती स्मार्टपणे वापर करत आहे, याचे कौतुक सध्या देशभरातून होत आहे.नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स