कर्नाटकची राजधानी बंगळुरमध्ये एक मोठी दुर्घटना ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे टळली. शहरातल्या गजबजलेल्या एमजी रोडवर एका बसला आग लागली होती. यावेळी ड्रायव्हरनं सतर्कतेनं सर्व 30 प्रवाशांना बसमधून बाहेर काढलं.
याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्या व्हिडिओनुसार ड्रायव्हरनं बसचं इंजिन सुरु करताच सार्वजनिक बसला आग लागली. बेंगळुरु मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉरपोरेशनची (बीएमटीसी) ही बस होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बस ड्रायव्हरनं तातडीनं पुढाकार घेत बस रिकामी केली. बसमधला एकही प्रवासी जखमी होणार नाही, याची त्यानं काळजी घेतली. ही आग का लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
बसला आग लागली त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या नागरिकांनी बनवलेल्या व्हिडिओनुसार बसला आग लागली होती. बसभोवती धुराचे लोळ दिसत आहेत. अग्निशमन दलाचे कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.
( नक्की वाचा : IRCTC नं तिकीट बुक करताना कधीही करु नका ही चूक, अन्यथा होईल जेल! )
बीएमटीसीनं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमजी रोडवर ड्रायव्हरनं इंजिन सुरु करताच त्याला आग लागली. बसचं इंजन जास्त गरम झालं होतं, असं सकृतदर्शनी दिसत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आग लागली त्यावेळी बसमध्ये 30 प्रवासी होती. पण, ड्रायव्हरनं तातडीनं सर्वांना बाहेर काढलं आणि अग्निशमन दलाला माहिती दिली.