Rapido driver Viral Video : ऑनलाइन अॅपवरुन गाडी बोलावल्यानंतर ताकडीने पिकअप पॉइंटवर जाणं अपेक्षित असतं. मात्र कधी धोडा उशीर झाला तर ड्रायव्हरकडून मदतीची अपेक्षा केली जाते. कारण अनेकदा पाच मिनिटात येतो असं सांगून कॅब ड्रायव्हर १० ते १५ मिनिटं उशीराने येत असल्याचं अनेकदा पाहण्यात आलं आहे. त्यामुळे ग्राहक आणि चालक या दोघांनी एकमेकांना सहकार्य करणं आवश्यक आहे. मात्र बंगळुरूमध्ये रॅपिडो ड्रायव्हरने ज्या पद्धतीने महिलेला वागणूक दिली त्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
महिला रॅपिडोवरुन रिक्षा बुक करते. त्यानंतर रिक्षावाला तेथे येतो. मात्र तरुणीला थोडा वेळ लागणार असल्याचं ती त्याला फोन करून सांगते. तरुणी खाली आल्यानंतर चालक तिच्यावर संतापतो. दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागल्यामुळे तो महिलेवर संतापतो. आता माझा वेटिंग चार्ज कोण देणार, माझ्याकडे दुसरं काम नाहीये का? असं विचारतो. यावर तरुणी म्हणते तुम्हाला उशीर होत होता तर तुम्ही निघून जायचं होतं. यावेळी दोघांमध्ये वाद झाला.
नक्की वाचा - VIDEO : खा खा खाल्लं अन् बिल भरायच्या वेळी पळ काढला; हॉटेल मालकाने चांगली अद्दल घडवली
आता माझा वेटिंग चार्ज कोण देणार?
रॅपिडोच्या ऑटो रिक्षा चालकाने महिलेसोबत वाद सुरू केला. महिलेला रिक्षात बसायला दोन मिनिटांहून अधिक वेळ लागला असल्याने तो संतापला. यावर चालक म्हणाला, आता माझा वेटिंग चार्ज कोण देणार? माझ्याकडे दुसरं काम नाही का.. महिलेने पैसे देण्यास नकार दिला. तुम्हाला उशीर होत होता तर बुकिंग रद्द का केलं नाही असा सवाल तरुणीने उपस्थित केला. तरुणीने बुकिंग रद्द केली आणि चालकाला जाण्यास सांगितलं. यानंतर चालक भांडण करीत होता. तो कॅन्सलेशन चार्ज मागू लागला. मात्र महिलेने त्याला एकही रुपय देण्यास नकार दिला.
त्याने धक्का दिला...
श्रेया (@miless_15) नावाच्या एका X युजरने व्हिडिओ पोस्ट करीत तिच्यासोबत घडलेला प्रकार कथन केला. चालक अरेरावीची भाषा करीत होता. याशिवाय त्याने धक्का दिल्याचंही तरुणीने म्हटलं आहे.