जाहिरात

VIDEO : खा खा खाल्लं अन् बिल भरायच्या वेळी पळ काढला; हॉटेल मालकाने चांगली अद्दल घडवली

Viral Video: पर्यटकांच्या या ग्रुपने हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची ऑर्डर दिली आणि मनसोक्त जेवण केले. बिल भरण्याची वेळ येताच पळून गेले.

VIDEO : खा खा खाल्लं अन् बिल भरायच्या वेळी पळ काढला; हॉटेल मालकाने चांगली अद्दल घडवली

Viral News: राजस्थानच्या माउंट अबूजवळ असलेल्या सियावा येथील हॅप्पी डे हॉटेलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गुजरातचे पाच पर्यटक, ज्यात एका महिलेचा समावेश होता, त्यांनी 10,900 रुपयांचे जेवणाचे बिल न भरता पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहतूक कोंडीमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला.

नेमकं काय घडलं?

पर्यटकांच्या या ग्रुपने हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची ऑर्डर दिली आणि मनसोक्त जेवण केले. बिल भरण्याची वेळ येताच, त्यांनी जुनी युक्ती वापरली. एकामागून एक, हे पाचही जण बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने हॉटेलमधून बाहेर पडले. बाहेर येताच ते थेट गाडीत बसले आणि गुजरात सीमेकडे पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले.

(नक्की वाचा- Air India Viral : 'त्या' झुरळाला मरेपर्यंत फाशी! एअर इंडियाचं विमान पुन्हा एकदा चर्चेत)

हॉटेलच्या मालक आणि वेटरला लगेचच हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी तातडीने त्यांचा पाठलाग सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांची कार अंबाजीमार्गे गुजरातकडे जात असल्याचे दिसले. हॉटेल मालकाने वाहतुकीतून वाट काढत गुजरात सीमेपर्यंत त्या पर्यटकांचा पाठलाग केला. सुदैवाने, हे पर्यटक पळून जाण्याच्या प्रयत्नात ट्रॅफिक जॅममध्ये अडकले. हॉटेल मालकाने त्वरित पोलिसांची मदत घेतली.

पोलिसांकडून अटक

पोलिसांच्या मदतीने या पाचही पर्यटकांना जागीच अटक करण्यात आली. अटक झाल्यानंतर पर्यटकांनी एका मित्राला फोन करून बिलाची रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगितली, अशी माहिती मिळाली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com