बंगळुरु ब्लास्टच्या मास्टरमाईंडला अटक, NIA नं 'या' पद्धतीनं राबवलं सर्च ऑपरेशन

बंगळुरुमधील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात (Bengaluru Cafe Blast) NIA ला मोठं यश मिळालं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Bengaluru Cafe Blast : 2 आरोपी ताब्यात
मुंबई:

बंगळुरुमधील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात (Bengaluru Cafe Blast) NIA ला मोठं यश मिळालं आहे. NIA नं या प्रकरणात दोन संदिग्ध आरोपींना कोलकातामधून ताब्यात घेतलंय. मुसाविर हुसेन शाजेब आणि अब्दुल मथीन ताहा असं या आरोपींचं नाव आहे. मुसावीरवर कॅफेमध्ये स्फोटाची उपकरणं लावण्याचा आरोप आहे. तरं अब्दुल मथीन हा या स्फोटाचा मास्टरमाईंड असल्याचं मानलं जात आहे. 

कसं राबवलं सर्च ऑपरेशन?

या दोन्ही आरोपींचा तपास करण्यासाठी NIA नं विशेष मोहीम राबवली.  याबाबत मिळालेल्या एका माहितीनंतर NIA चं पथक शुक्रवारी सकाळी कोलकातामधील एका ठिकाणी पोहचलं. NIA, राष्ट्रीय गुप्तचर संश्था, पश्चिम बंगाल, तेलंगना, कर्नाटक आणि केरळ पोलिसांनी संयुक्तपणे राबवलेल्या या अभियानानंतर या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

'पेगॅसस'सारख्या तंत्राद्वारे आयफोन लक्ष्य होण्याची भीती? अ‍ॅपलने दिला इशारा
 

तपास यंत्रणांनी गेल्या आठवड्यात कर्नाटकमधील शिमोगा जिल्ह्यातील तीर्थहळ्लीमध्ये राहणाऱ्या शाजेब आणि ताहा यांची ओळख पटवली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये 18 ठिकाणी सर्च ऑपरेशन चालवण्यात आले. या प्रकरणातील मुजम्मिल शरीफ या एका आरोपीला 26 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्यावर मुख्य आरोपीला स्फोटासाठी मदत केल्याचा आरोप आहे. 

चोरी करण्यासाठी विग अन् पळून जाण्यासाठी विमान; ठाणे पोलिसांनी असा पकडला 'टक्कल चोर'
 

10 लाखांचं होतं बक्षीस

1 मार्च रोजी बंगळुरुतील रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यामध्ये हॉटेलमधील अनेक ग्राहक तसंच कर्मचारी जखमी झाले होते. या दोन्ही आरोपींची माहिती देणाऱ्यांना 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. त्यांना अटक करण्यापूर्वी तपास यंत्रणांनी आरोपीच्या शाळा कॉलेजमधील मित्रांसह अन्य परिचित मित्रांची चौकशी केली होती. 
 

Advertisement