Naxalite Bhaskar Killed : 45 लाखांचं बक्षीस, मोठ्या हल्ल्याचा मास्टरमाईंड भास्करचा खात्मा; सुरक्षा दलाची मोठी कारवाई

भास्करवर छत्तीसगडमध्ये 25 लाख आणि तेलंगाणात 20 लाखांचं बक्षीस घोषित करण्यात आलं होतं.

जाहिरात
Read Time: 1 min

छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील नॅशनल पार्क भागात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अभियानात सुरक्षा दलांनी 45 लाखांचं बक्षीस असलेला तेलंगणा स्टेट समिती सदस्य आणि मंचेरियल कोमाराम भीमचा सचिव भास्कर ऊर्फ माइलारापु अडेल्लु याचा खात्मा करण्यात आला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भास्करवर छत्तीसगडमध्ये 25 लाख आणि तेलंगाणात 20 लाखांचं बक्षीस घोषित करण्यात आलं होतं. तो तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील उरुमादलाचा राहणारा होता. चकमकीदरम्यान जवानांनी घटनास्थळावरुन एके-47 असॉल्ट रायफल आणि विस्फोटक ताब्यात घेतलं आहे. 

Advertisement

नक्की वाचा - वरमाला नाकारल्याने वऱ्हाडींचा गोंधळ, वधू पक्षातील लोकांना लाठी-काठीने मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, चकमकीदरम्यान भास्करची पत्नी आणि नक्षली कमांडर अनितादेखील त्यावेळी भास्करच्या सोबत होत्या. त्यांच्याबाबत अद्याप काही माहिती मिळू शकलेली नाही. भास्कर हा नक्षलवाद्यांचा महत्त्वपूर्ण आदिलाबाद जिल्हा समितीचा सचिव होता आणि तो धोकादायक नक्षलवादी मानला जात होता. यापूर्वी 21 मेला झालेल्या चकमकीत 27 नक्षलवादी मारले गेले होते. यामध्ये 1.5 कोटींचं बक्षीस असलेला राजूचाही समावेश होता. याशिवाय 21 मेच्या चकमकीत सात दिवसांपूर्वी पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेत कर्रेगुट्टा ऑपरेशनचीही माहिती दिली होती. यामध्ये 31 नक्षलवादी मारले गेले होते. छत्तीसगड-तेलंगणा सीमेस्थित कर्रेगुट्टातील डोंगराळ भागात सुरक्षा दलाने 24 दिवसांपर्यंत ऑपरेशन केलं होतं.


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world