
दुबई हे भारतीय पर्यटकांसाठी आवडत्या देशांपैकी एक आहे. मात्र गेल्या काही दिवसात दुबईला जाणाऱ्या भारतीयांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. दुबईला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी नियमांमध्ये झालेल्या बदलांनंतर व्हिसा मिळणं कठीण झालं आहे. परिणामी भारतीय पर्यटकांसह ट्रॅव्हल एजंटनाही नुकसान सहन करावं लागत आहे.
नक्की वाचा - भारतीय रेल्वेचं सुपर ॲप लाँच, तिकीट काढण्यापासून जेवणाच्या ऑर्डरपर्यंत सर्व एका क्लिकवर!
ट्रॅव्हल एजंटनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिसा नाकारण्याची संख्या अचानक वाढली आहे. नव्या नियमांमुळे व्हिसा मिळण्यात अडचणी येत आहेत. परिणामी पर्यटकांनी व्हिसा शुल्काचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. महत्त्वाचं म्हणजे आधीच विमानाचं तिकीट आणि हॉटेल बुकिंग केल्यामुळे ते पैसेही वाया जात आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, नेमकी ही समस्या केव्हापासून सुरू झाली हे सांगता येऊ शकत नाही. मात्र नवे नियम लागू झाल्यानंतर व्हिसा नाकारण्याच्या संख्येत अचानक वाढ झाली. दुबईच्या टुरिस्ट व्हिसासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आता हॉटेल बुकिंग, परतीचं तिकीट आणि राहण्याच्या ठिकाणाचे पुरावे द्यावे लागतील. अनेक पर्यटकांनी नव्या नियमांची माहिती नाही आणि याच कारणामुळे त्याचे व्हिसा रिजेक्ट होत आहेत.
यापूर्वी कधीच इतक्या मोठ्या प्रमाणात व्हिसा रिजेक्ट झालेले नाहीत. यापूर्वी तब्बल 99 टक्के दुबई व्हिसा अॅप्लिकेशन मान्य केले जात होते. आता तर पूर्ण तयारी असलेल्या पर्यटकांनाही व्हिसा मिळत नसल्याचं दिसून येत आहे. सर्व कागदपत्रं असतानाही व्हिसा मिळू शकलेला नाही. एका एजंटने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 35 लोकांच्या ग्रुपची दुबई ट्रिप व्हिसा न मिळाल्याने रद्द झाली. यामुळे मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे.
(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतीयांसाठी कोणती कागदपत्रं हवीत?
व्हिसा मिळविण्यासाठी दुबईत राहणार असलेल्या हॉटेलची माहिती, आयडी, निवासी व्हिसाची प्रत, संपर्क तपशील आवश्यक आहे. विशेष म्हणजे तुम्ही जर दुबईतील नातेवाईकांकडे राहणार असाल तर त्यांच्या घराच्या भाडे कराराची प्रतही आवश्यक आहे. दुबईमध्ये प्रतिदिवस हॉटेलसाठी 20 हजारांपासून 1 लाखांपर्यंत पैसे मोजावे लागतात. त्यामुळे अधिकतर पर्यटक नातेवाईक किंवा मित्रमंडळींकडे राहणं पसंत करतात. मात्र आता नियम बदलले आहेत. आणि नातेवाईक किंवा मित्रमंडळींकडून भाडे करार मागणं कोणाहीसाठी कठीण जाऊ शकतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world