Accident News : कार आणि ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

बिहारच्या कटिहार येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 31 वर ही दुर्घटना घडली आहे. कारमधील प्रवासी लग्न समारंभातून परतत असताना हा भीषण अपघात झाला. 

जाहिरात
Read Time: 1 min

Bihar Accident News : कार आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे, ते दोघे गंभीर जखमी आहेत. बिहारच्या कटिहार येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 31 वर ही दुर्घटना घडली आहे. कारमधील प्रवासी लग्न समारंभातून परतत असताना हा भीषण अपघात झाला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलीस अधीक्षक वैभव शर्मा यांनी सांगितले की, ट्रॅक्टर विरुद्ध दिशेने येत होता. कारमधील लोक लग्न समारंभातून परतत होते. सोमवार आणि मंगळवारी रात्री समेली ब्लॉक ऑफिसजवळ झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मदत आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी पीडितांना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले.

ट्रेंडिंग बातमी - Rahul Gandhi meets Modi: पंतप्रधान कार्यालयात मोदी- राहुल गांधी यांची बैठक, चर्चा काय झाली?

डॉक्टरांनी आठ जणांना मृत घोषित केले. दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिकांच्या मते, मृत नागरिक सुपौलचे रहिवासी आहेत.  सध्या पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Topics mentioned in this article