Crime News:"महिलांना गर्भवती करा आणि 10 लाख मिळवा"; बिहार पोलिसांकडून 'प्रेग्नेंट जॉब' घोटाळ्याचा पर्दाफाश

Bihar Cyber Fraud: रजिस्ट्रेशन फी, सिक्युरिटी मनी आणि हॉटेल बुकिंगच्या नावाखाली लोकांकडून हजारो रुपये उकळले जात. 10 लाखांच्या लालसेपोटी अनेक तरुण या जाळ्यात अडकून आपली जमापुंजी गमावत होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
Cyber Crime
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • नवादा साइबर पुलिस ने नि:संतान महिलाओं को गर्भवती करने का झूठा इनाम देने वाले गिरोह का पर्दाफाश किया है
  • गिरोह सस्ते लोन और फर्जी नौकरी का झूठा दावा कर लोगों से लाखों रुपये की साइबर ठगी करता था
  • विशेष जांच टीम ने मनवा गांव के रंजन कुमार को गिरफ्तार किया और एक नाबालिग को निरुद्ध किया है
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

सायबर गुन्हेगारीचे केंद्र बनत असलेल्या बिहारच्या नवादा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलांना गर्भवती करण्याच्या कामासाठी चक्क 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे प्रलोभन दाखवून तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अशा प्रकारे घातला जायचा गंडा

नवादा सायबर पोलीस आणि विशेष तपास पथकाने (SIT) केलेल्या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. हे ठग सोशल मीडियावर 'ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब' आणि 'प्लेबॉय सर्व्हिस' सारख्या नावांनी जाहिराती देत असत. लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी मॉडेल्स आणि सुंदर मुलींचे फोटो व्हॉट्सॲपवर पाठवले जात.

कशी करायचे वसुली?

रजिस्ट्रेशन फी, सिक्युरिटी मनी आणि हॉटेल बुकिंगच्या नावाखाली लोकांकडून हजारो रुपये उकळले जात. 10 लाखांच्या लालसेपोटी अनेक तरुण या जाळ्यात अडकून आपली जमापुंजी गमावत होते.

अटक आणि जप्तीची कारवाई

पोलीस अधीक्षक अभिनव धीमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रंजन कुमार याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून ठगीसाठी वापरले जाणारे 4 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. 7 जानेवारी रोजी सायबर पोलीस ठाण्यात बीएनएस (BNS) आणि आयटी ॲक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा (क्र. 03/26) नोंदवण्यात आला आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)

फसवणुकीचे विविध प्रकार

ही टोळी केवळ 'प्रेग्नेंट जॉब'च नाही, तर 'धनी फायनान्स' आणि 'सीबीआय स्वस्त कर्ज' या नावांनी देखील लोकांना फसवत होती. विशेष म्हणजे, सामाजिक प्रतिष्ठेपोटी अनेकजण फसवणूक होऊनही पोलिसांकडे तक्रार करायला पुढे येत नव्हते, ज्याचा फायदा हे गुन्हेगार घेत होते.

नवादा सायबर सेलने जनतेला आवाहन केले आहे की, सोशल मीडियावरील कोणत्याही असामान्य दाव्यांना बळी पडू नका. 10 लाख किंवा कोणत्याही मोठ्या रक्कमेचे आमिष दाखवणारे मेसेज हे पूर्णतः बनावट असतात. अशी संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

Advertisement