Bihar Crime News: 1 कोटींची कॅश, 344 ग्रॅम सोनं अन् बरचं काही... चहावाल्याच्या घरात सापडलं घबाड!

गुप्त माहितीच्या आधारे 17 ऑक्टोबर रोजी गोपालगंजमधील एका घरावर छापा टाकण्यात आला होता. या छाप्यात 1 कोटी 5 लाख 49 हजार 850 रुपये रोख, 344 ग्रॅम सोने आणि 1.75 किलो चांदी जप्त करण्यात आली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Crime News: बिहारमधील गोपालगंजमध्ये पोलिसांनी सायबर ठगांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. एका चहा विक्रेत्याच्या घरातून 1 कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम, 344 ग्रॅम सोने, 1.75 किलोग्राम चांदी आणि सायबर फसवणुकीशी संबंधित अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. पोलिसांनी या छापेमारीत दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे 17 ऑक्टोबर रोजी गोपालगंजमधील एका घरावर छापा टाकण्यात आला होता. या छाप्यात 1 कोटी 5 लाख 49 हजार 850 रुपये रोख, 344 ग्रॅम सोने आणि 1.75 किलो चांदी जप्त करण्यात आली. आरोपींकडून 85 एटीएम कार्ड, 75 बँक पासबुक, 28 चेकबुक, दोन लॅपटॉप, तीन मोबाइल फोन आणि एक लक्झरी कार देखील जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत अभिषेक कुमार आणि आदित्य कुमार या दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी अभिषेक कुमार पूर्वी चहाचे दुकान चालवत होता. नंतर तो दुबईला गेला, जिथून त्याने या सायबर फसवणुकीचे नेटवर्क चालवण्यास सुरुवात केली. त्याचा भाऊ आदित्य कुमार गावात राहून या बेकायदेशीर कामात त्याला मदत करत होता.

(नक्की वाचा-  Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)

एवढे पैसे आले कुठून?

प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, ही टोळी सायबर फसवणुकीद्वारे विविध बँक खात्यांमध्ये पैसे मागवत असे आणि नंतर रोखीत व्यवहार करत असे. पोलिसांना संशय आहे की, या नेटवर्कमध्ये अनेक इतर लोक सामील असू शकतात आणि हे नेटवर्क राज्याबाहेरही पसरलेले आहे.

Advertisement

पोलिसांनी सांगितले की, छाप्यात जप्त केलेल्या एटीएम कार्ड आणि पासबुकच्या तपासणीत बहुतांश पासबुक बेंगळुरूची असल्याचे आढळले आहेत. यानंतर पोलीस आणि सायबर सेलची टीम संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दागिने आणि सायबर फसवणुकीशी संबंधित वस्तू सापडल्याने आयकर विभाग आणि एटीएसच्या टीम देखील गोपालगंजमध्ये पोहोचल्या आहेत.

Topics mentioned in this article