Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत मोठ्या ताकदीने उतरलेल्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाच्या पदरी निराशा पडली आहे. प्रशांत किशोर यांनी निवडणुकीआधी केलेली भविष्यवाणी देखील आता चर्चेत आहे. प्रशांत किशोर यांचं राजकीय करिअर सुरु होण्याआधीच संपणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. प्रशांत किशोर यांनी केलेलं वक्तव्य यासाठी कारणीभूत ठरत आहे.
जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बिहार निवडणूक प्रचारादरम्यान अनेक वेळा दावा केला होता की, यावेळी जेडीयू 25 पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही. अनेक टीव्ही मुलाखतींमध्ये पीके यांनी असेही म्हटले होते की जर जेडीयू 25 पेक्षा जास्त जागा जिंकला तर ते राजकारण सोडतील. पीके यांनी हे विधान अनेक वेळा केले आणि टाळ्या मिळवल्या. मात्र जेडीयू 25 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर असून दमदार कामगिरी करत निकालात दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. त्यामुळे प्रशांत किशोर आता त्यांच्या शब्दांवर टिकून राहतात का हे पाहावं लागेल.
(नक्की वाचा- Solapur Lawyer Suicide: वकीलाच्या आत्महत्येने खळबळ, सुसाईड नोटमध्ये आईवर गंभीर आरोप)
प्रशांत किशोर यांनी सातत्याने दावा केला आहे की यावेळी त्यांची कामगिरी चांगली असेल. मात्र काही जागा वगळता, पीके यांच्या जनसुराज पक्षाला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. जनसुराज केवळ तीन ते चार जागांवर आघाडीवर आहे आणि यामध्येही फरक लक्षणीय नाही.
एनडीएची मुसंडी
सध्या एनडीए 190 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे, तर महाआघाडी 50 चा आकडाही ओलांडताना दिसत नाही. प्रशांत किशोर यांचा पक्ष जनसुराज काही जागांवर आघाडीवर असेल, परंतु पक्षाची कामगिरी फारशी विशेष दिसत नाही.
(नक्की वाचा- Bihar Election Results 2025: बिहारमध्ये NDAची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल! महाआघाडी फेल, वाचा LIVE अपडेट्स)
एनडीएने या निवडणुकीत मोठी मुसंडी मारता विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. काँग्रेससाठी तर बिहारमध्ये अस्तित्वाची लढाई आहे. तेजस्वी यादव यांच्या आरजेडी पक्ष देखील मोठ्या पिछाडीवर आहे. नितीश कुमार आणि पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे एनडीए बिहारमध्ये 2010 चा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. 2010 मध्ये एनडीएने 206 जागा जिंकल्या होत्या.