Bihar Election Result Live Updates: : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल, त्यानंतर ट्रेंड समोर येऊ लागतील. एनडीए असो किंवा महाआघाडी, प्रत्येकजण विजयाचा दावा करत आहे. मात्र, बिहारच्या जनतेने कोणावर विश्वास ठेवला आहे हे लवकरच स्पष्ट होईल.
मतदान संपल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये जवळजवळ सर्व सर्वेक्षण संस्थांनी एनडीएला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. एक्झिट पोलनुसार, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करू शकते. बिहारमध्ये, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये जनता दल-संयुक्त (जेडीयू), भारतीय जनता पक्ष (भाजप), लोक जनशक्ती पक्ष (रामविलास), हिंदुस्तान अवामी मोर्चा (एचयूएम) आणि राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) यांचा समावेश आहे.
Bihar Assembly Election Result LIVE Updates: भाजप- एनडीएला कसा फायदा झाला?
नितीश कुमारांचा सुशासन फॅक्टर - महिलांना मोफत बस प्रवास, पंचायतींमध्ये ५०% आरक्षण, दारूबंदी, गुन्हेगारी कमी, रस्ते-वीज-पाणी योजनांमुळे महिला आणि EBC मतदार मोठ्या संख्येने NDA कडे. नितीशांना विकास पुरुष म्हणून क्रेडिट मिळाले.
मोदींची तगडा प्रचार आणि राष्ट्रीय इमेज - मोदींनी 20 हून अधिक सभा घेतल्या. डबल इंजिन सरकार, केंद्राच्या योजनांचा (आवास, उज्ज्वला, आयुष्मान भारत) फायदा, जंगलराज परत येईल असे RJD वर हल्ला. मोदींची लोकप्रियता + नितीशांचा स्थानिक चेहरा = परफेक्ट कॉम्बिनेशन.
महिला मतदारांचा मोठा पाठिंबा: बिहारमध्ये महिलांचे मतदान जास्त (67 टक्के). NDA च्या महिला कल्याण योजनांमुळे (जसे 33% पोलिस भरतीत आरक्षण, शिक्षिका भरती) महिला मतदार NDA कडे झुकल्या.
जंगलराजची भीती - भाजपने लालू-राबडी काळातील गुन्हेगारी, अपहरण यांची आठवण करून दिली. लोकांना स्थिरता हवी होती.
Bihar Election Result LIVE Updates: महाआघाडीचे तेजस्वी यादव का चालले नाहीत ?
महाआघाडीचे (विशेषतः तेजस्वी यादव/RJD चे) मुद्दे का चालले नाहीत ?
राहुल गांधींचा मतचोरीचा आरोप लोकांना पटला नाही
बेरोजगारी आणि 10 लाख नोकऱ्यांचे आश्वासन - 2020 मध्ये हे आश्वासन खूप चालले होते, पण 2025 मध्ये लोकांना वाटले की NDA च्या 20 वर्षांच्या सत्तेत काही सुधारणा झाल्या (महिला सक्षमीकरण, रस्ते, वीज, पाणी). तेजस्वींचे "एक कुटुंब-एक नोकरी" आश्वासन अवास्तविक वाटले.
जातनिहाय जनगणना आणि आरक्षण वाढ - बिहार सरकारने आधीच जात जनगणना केली होती आणि NDA नेही त्याचा फायदा घेतला. केंद्रातही जात जनगणना होईल असे मोदींनी सांगितले, त्यामुळे हा मुद्दा "विशेष" राहिला नाही. EBC/OBC मतदार NDA कडे राहिले.
अग्निवीर योजना आणि युवा असंतोष - अग्निवीरवर टीका केली, पण मोदींच्या प्रचारात "राष्ट्रीय सुरक्षा आणि सैन्यात बिहारी युवकांना संधी" असे सांगितले गेले. युवा मतदारांचा काही भाग NDA कडे गेला.
स्थलांतर (मायग्रेशन) - दोन्ही बाजूंनी हा मुद्दा उचलला, पण NDA ने "गेल्या जंगलराजात शिक्षण-रोजगार नव्हते, आता सुधार झाला" असे सांगितले.
महाआघाडीमध्ये अंतर्गत मतभेद - RJD-काँग्रेस-डावे यांच्यात समन्वय कमी, काही जागांवर उमेदवारांच्या निवडीत गोंधळ झाला
---------------------------------
Bihar Assembly Election LIVE Updates: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप बाहुबली!
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजप ८३ जागांवर आघाडीवर आहे आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. नितीश कुमार यांचा जेडीयू ७९ जागांवर आघाडीवर आहे. तेजस्वी यादव यांच्या आरजेडीने ३२ जागांवर आघाडी घेतली आहे आणि चिराग पासवान यांचा एलजेपीआर २२ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि सीएमपीआयएमएल प्रत्येकी सहा जागांवर आघाडीवर आहेत.
Bihar Assembly Election Result LIVE Updates: तेजस्वी यादव यांना मोठा धक्का
बिहार विधानसभा निवडणुकीतील सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. तेजस्वी यादव यांची मतमोजणीत मोठी पिछेहाट झाली आहे. तेजस्वी यादव हे तब्बल ३००० मतांनी पिछाडीवर आहेत. आरजेडी पक्ष पिछाडीवर असतानाच आता तेजस्वी यादव यांची निकालात पिछेहाट म्हणजे आरजेडीला मोठा धक्का आहे. काँग्रेसला मतदारांनी नाकारल्याचा मोठा फटका तेजस्वी यादव यांना बसल्याचे दिसत आहे.
Bihar Assembly Election LIVE Updates: राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची पिछेहाट
बिहारच्या निवडणुकीत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांची पिछेहाट झाली आहे. प्रशांत किशोर यांचा पक्ष अवघ्या तीन जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
Bihar Assembly Election Result LIVE Updates: बिहारमध्ये एनडीएची सत्तेकडे वाटचाल! मोठा भाऊ कोण ठरणार?
बिहार निवडणुकीतील आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयू नेतृत्वाखालील एनडीए १९० जागांवर आघाडीवर आहे, तर तेजस्वी यादव यांचा महाआघाडी फक्त ५० जागांवर आघाडीवर आहे. शिवाय, इतर तीन जागांवर आघाडीवर आहेत.
बिहार निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार, नितीश कुमार यांचा जदयू ८१ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप ७८ जागांवर आघाडीवर आहे. याचा अर्थ जेडीयू आतापर्यंतचा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. शिवाय, तेजस्वी यादव यांचा राजद ३५ जागांवर आघाडीवर आहे आणि चिराग पासवान यांचा लोजपा २२ जागांवर आघाडीवर आहे.
Bihar Assembly Election Result LIVE Updates: चिराग पासवान यांच्यासाठी Good News, उमेदवार आघाडीवर
चिराग पासवान यांच्यासाठी आनंदाची बातमी
निवडणूक आयोगाच्या आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये चिराग पासवान यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष (राम विलास, एलजेपीआर) २२ जागांवर आघाडीवर आहे. पासवान यांच्या पक्षाने २९ जागांवर निवडणूक लढवली.
Bihar Assembly Election Result 2025: तेज प्रताप यादवसाठी मोठा धक्का!
तेज प्रताप यादवसाठी मोठा धक्का!
महुआ विधानसभा मतदारसंघात तेज प्रताप यादव चौथ्या स्थानावर घसरले आहेत. निवडणूक आयोगाने मतमोजणीच्या तीन फेऱ्यांनंतर ही आकडेवारी जाहीर केली. चिराग पासवान यांचे उमेदवार संजय कुमार सिंह या जागेवर आघाडीवर आहेत. राजदचे मुकेश कुमार रोशन दुसऱ्या स्थानावर, एआयएमआयएमचे अमित कुमार तिसऱ्या स्थानावर आणि जनशक्ती जनता दलाचे तेज प्रताप यादव चौथ्या स्थानावर आहेत.
Bihar Election Result LIVE Updates: बिहार निवडणूक निकाल लाईव्ह अपडेट्स, शिवदीप लांडे यांची पिछेहाट
बिहारचे सिंघम म्हणून ओळखले जाणारे माजी अधिकारी शिवदीप लांडे यांनी विधानसभा नि वडणूक लढवत आहेत. मात्र निकालात त्यांची जोरदार पिछेहाट झाली आहे.याठिकाणी जनता दलाचे नचिकेत यांनी आघाडी घेतली आहे. शिवदीप लांडे हे जमालपूर विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवदीप लांडे हे शिवसेना नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत.
Bihar Assembly Election Results: 'अब की बार...' अमित शहांचे स्वप्न पूर्ण होणार, एनडीएने गाठला जादुई आकडा
गृहमंत्री अमित शहा यांनी "अबकी बार १६० पार" ( ही घोषणा दिली. त्यांचा हा नारा खरा ठरत असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाच्या मते, एनडीए १६० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. भाजप ६८, जेडीयू ६५, एलजेपी १६ आणि एचएएम ४ जागांवर आघाडीवर आहे:
Bihar Assembly Election Result LIVE Updates: मतचोरीचा मुद्दा सपशेल फसला! बिहारमध्ये काँग्रेसची दाणादाण
निवडणूक आयोगाच्या मते, भाजप ४४ जागांवर, जेडीयू ४३ जागांवर, आरजेडी २४ जागांवर, लोजपा १२ जागांवर आणि काँग्रेस ६ जागांवर आघाडीवर आहे. बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी सांगितले की, बिहारचा मुख्यमंत्री संवैधानिक प्रक्रियेद्वारे ठरवला जाईल. मत चोरीच्या मुद्द्याने महाआघाडी बुडाली.
Bihar Election Result LIVE Updates: बिहार निवडणूक निकाल! कोणत्या जागेवर कुणाची आघाडी? वाचा...
कुणे कुणाची आघाडी?
विभूतिपूर – जेडीयूच्या रुबिना कुशवाह आघाडीवर
दानापूरमध्ये आरजेडीचे रीतलाल आघाडीवर
झाझा विधानसभा मतदारसंघात जेडीडीचे दामोदर रावत आघाडीवर आहेत
अलीनगरमध्ये भाजपच्या मैथिली ठाकूर आघाडीवर आहेत
मोहिउद्दीन नगरमध्ये भाजपचे राजेश कुमार आघाडीवर आहेत
मटिहानीमध्ये आरजेडीचे बोगो सिंग आघाडीवर आहेत
Bihar Election Result LIVE Updates: भाजप सर्व रेकॉर्ड मोडणार: चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास
बिहारच्या जनतेचे आभार मानतो. मोदीजी आणि नितीशकुमार जी यांनी केलेल्या विकसित बिहारच्या संकल्पावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. बिहारच्यांकनेते विकास, विश्वास आणि विकसित भारतासाठी मते दिली. अभूतपूर्व विजय. बिहारच्या इतिहासामध्ये कधीच एवढे बहुमत मिळाले नव्हते असे बहुमत मिळणार आहे: चंद्रशेखर बावनकुळे
Bihar Election Result LIVE Updates: बिहारमध्ये पुन्हा NDA! सुरुवातीच्या कलात स्पष्ट बहुमत, आरजेडीची कडवी झुंज
बिहार निवडणुकीतील सर्व सर्व २४३ जागांसाठीचे कल समोर आले आहेत. एनडीए १६० जागांवर आघाडीवर आहे. महाआघाडी ७९ जागांवर आघाडीवर आहे. इतर चार जागांवर पुढे आहेत. सध्या भाजप ७० तर आरजेडी ५८ जागांवर आघाडीवर आहे.
"Exit polls show BJP will have record margin victory": Party spokesperson Satyabrata Panda as counting underway for by-polls
— ANI Digital (@ani_digital) November 14, 2025
Read @ANI Story | https://t.co/4MsUBueHI9#Exitpolls #BJP #Bypolls pic.twitter.com/LFADpFTTjA
Bihar Election Result LIVE Updates: मतमोजणीच्या पहिल्या फेरीत कोण पुढे आणि कोण मागे?
बिहार निवडणूक मतमोजणी लाईव्ह: मतमोजणीच्या पहिल्या फेरीत कोण पुढे आणि कोण मागे
लौरियामध्ये भाजपचे विनय बिहारी पहिल्या फेरीत ७० मतांनी आघाडीवर आहेत, तर व्हीआयपीचे रंकौशल दुसऱ्या स्थानावर आहेत. पहिल्या फेरीत वाल्मिकीनगरमध्ये जेडीयूचे रिंकू सिंह १,२०० मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे सुरेंद्र कुशवाह येथे पिछाडीवर आहेत. बेतिया विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रेणू देवी ५९६ मतांनी आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे उमेदवार वासी अहमद मागे आहेत.
Bihar Election Result LIVE Updates: औरईमध्ये भाजप पुढे, मोकामामध्ये अनंत सिंह २,६०० मतांनी पुढे
औरईमध्ये भाजप पुढे, मोकामामध्ये अनंत सिंह २,६०० मतांनी पुढे
पहिल्या फेरीत अनंत सिंह २,६०० मतांनी आघाडीवर आहेत, तर आरजेडीच्या वीणा देवी पिछाडीवर आहेत. कांती विधानसभा मतदारसंघात जेडीयूचे उमेदवार अजित कुमार हे आरजेडीचे उमेदवार इस्रायल मन्सूरी यांच्यापेक्षा १,६३४ मतांनी आघाडीवर आहेत. मतिहानी विधानसभा मतदारसंघात आरजेडीचे उमेदवार बोगो सिंह हे राजकुमार सिंह यांच्यापेक्षा ७,३०० मतांनी पुढे आहेत. जमुई विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार श्रेयसी सिंह २००० मतांनी पुढे आहेत. औरई विधानसभा मतदारसं
Bihar Election Result LIVE Updates:बिहारमध्ये एनडीएने गाठला बहुमताचा आकडा, भाजप सर्वात मोठा पक्ष
बिहार निवडणुकीतील सर्वात मोठी अपडेट: एनडीएने बहुमताचा आकडा गाठलेला आहे. भाजपची सर्वात मोठा पक्ष होण्याकडे वाटचाल सुरु, तेजस्वी यादव यांची कडवी झुंज, ५५ जागांवर आघाडी:
Bihar Assembly Election Result LIVE Updates: बहुमताकडे वाटचाल! एनडीएचे शतक पूर्ण
बिहार निवडणूक मतमोजणीत एनडीएने बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु केली असून शतक पूर्ण केले आहे. एनडीएने १०३ जागांवर आघाडी घेतली असून महाआघाडी सध्या ६८ जागांवर आहे.
Bihar Election Result LIVE Updates: महाआघाडीत जोरदार स्पर्धा, एनडीएचे शतक पूर्ण
महाआघाडीत जोरदार स्पर्धा सुरू आहे. राजद ४३ जागांवर आघाडीवर आहे आणि दोन जागांवर विजय मिळवत आहे असे दिसते. सध्याच्या आकडेवारीनुसार, काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर आहे आणि तीन जागांवर पराभव पत्करत आहे. डावे पक्ष तीन जागांवर आघाडीवर आहेत. ट्रेंडनुसार डावे पक्ष तीन जागांवर पराभव पत्करतील.
Bihar Assembly Election Result LIVE Updates: भाजपचे सचिंद्र सिंह आघाडीवर
कल्याणपूरमध्ये भाजपचे सचिंद्र सिंह हे राजदचे मनोज यादव यांच्यापेक्षा पुढे आहेत. मोतिहारीमध्ये भाजपचे प्रमोद कुमार हे त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आरजेडीचे देवा गुप्ता यांच्यापेक्षा पुढे आहेत. कल्याणपूरमध्ये भाजपचे सचिंद्र सिंह हे राजदचे मनोज यादव यांच्यापेक्षा पुढे आहेत.
Bihar Assembly Election Result LIVE Updates: बिहारमध्ये काँग्रेसची पिछेहाट
महाआघाडीत जोरदार स्पर्धा सुरू आहे. राजद ४३ जागांवर आघाडीवर आहे आणि दोन जागांवर विजय मिळवत आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर आहे आणि तीन जागांवर पराभव पत्करत आहे.
Bihar Assembly Election Result LIVE Updates: बिहार विधानसभा निवडणूक: पोस्टल बॅलेटवरील 150 जागांचे कल समोर
पोस्टल बॅलेट वरील १५० जागांचे कल आले. भाजपची हाफ सेंच्युरी
एनडीए ८६
भाजप ४९
जेडीयू ३३
इतर २
महाआघाडी ५८
आरजेडी ४६
कांग्रेस ७
Bihar Assembly Election Result LIVE Updates: बिहारमध्ये काँग्रेसचा सुफडा साफ? किती जागांची आघाडी
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपरफ्लॉप शो पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे अवघे सात उमेदवार आघाडीवर आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला बिहारच्या जनतेने नाकारल्याचे संकेत पहिल्या कलात मिळत आहेत...
Bihar Assembly Election LIVE Updates: मुंगेर विधानसभेत भाजपचे कुमार प्रणय आघाडीवर
पोस्टल मतमोजणीच्या ट्रेंडमध्ये मुंगेर विधानसभेत भाजपचे कुमार प्रणय आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. तारापूर विधानसभेत भाजपचे सम्राट चौधरी आघाडीवर आहेत. जमालपूर विधानसभेत जेडीयूचे नचिकेता मंडल आघाडीवर आहेत.
Bihar Election Vote Counting LIVE Updates: तेजस्वी प्रताप यांची जोरदार मुसंडी, तेजप्रताप मात्र पिछाडीवर
बिहारमधील सुरुवातीचे कल समोर: एनडीए = ७८, महाआघाडी = ५५, तेजस्वी पुढे, तेज प्रताप मागे
Bihar Election Vote Counting LIVE Updates: बिहारमध्ये एनडीएची मुसंडी; शतकही पूर्ण
एनडीए: 77
महागठबंधन: 53
इतर: 5

Bihar Election Result LIVE Updates: कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? वाचा लाईव्ह
कोण आघाडीवर कोण पिछाडीवर! वाचा लाईव्ह अपडेट्स!

Bihar election results 2025: तेजस्वी यादव आघाडीवर, तेजप्रताप यादव पिछाडीवर
Bihar election results 2025: तेजस्वी यादव आघाडीवर, तेजप्रताप यादव पिछाडीवर
Bihar election results 2025: सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीए आघाडीवर, एनडीए 66 जागांवर
सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीए आघाडीवर
एनडीए- ६६
महागठबंधन- ४७
इतर - ५
Bihar Assembly Election Result LIVE Updates: बिहार निवडणूक: भाजपची जोरदार मुसंडी, एनडीएला आघाडी
एनडीए - 38 पर आगे
महागठबंधन -24 पर आगे
बीजेपी -25
जेडीयू - 10
आरजेडी- 19
Bihar Assembly Election Result LIVE Updates: बिहार निकालाचे पहिले कल समोर, कोणाची आघाडी?
बिहार विधानसभा निवडणुकीचे पहिले कल समोर:
भाजपला 24 जागांची आघाडी:
प्रशांत किशोर 3 जागांची आघाडी:
तेजप्रताप यादव पिछाडीवर:
तेजस्वी यादव आघाडीवर:
मैथली ठाकूर आघाडीवर:
भाजप आणि आरजेडीमध्ये कांटे की टक्कर:
Bihar Assembly Election Result LIVE Updates: बिहार मतमोजणीला सुरुवात, एनडीएची आघाडी
बिहार विधानसभेच्या निकालाला सुरुवात: भाजप सहा जागांवर आघाडी:
तेजस्वी यादव, मैथली ठाकूर, रजनीश कुमार, छोटी कुमारी आघाडीवर:
Bihar Assembly Election Result LIVE Updates: विजयाआधीच भाजपची जोरदार तयारी
मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच भाजपमध्ये आनंदोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पराठे आणि जलेबी तयार केल्या जात आहेत. एनडीएला विश्वास आहे की ते बिहारमध्ये पुढील सरकार स्थापन करतील. जवळजवळ सर्व एक्झिट पोल असेही सूचित करतात की नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारमध्ये सत्तेत येतील.
#WATCH | Delhi: Bihar Assembly Election Results | Sattu paratha, jalebis being prepared at the BJP Headquarters in Delhi ahead of the beginning of counting of votes for #BiharElections2025 pic.twitter.com/lfPYXKMwxR
— ANI (@ANI) November 14, 2025
Bihar Assembly Election Result LIVE Updates: "बिहारमध्ये बदल घडणार..." तेजस्वी यादव यांना विश्वास
मतमोजणीपूर्वी तेजस्वी यादव उत्साही दिसले. त्यांनी बिहारमध्ये बदल घडत असल्याचे जाहीर केले. "बिहारमध्ये बदल म्हणजे सरकारमध्ये बदल," असे ते म्हणाले.
#WATCH | Patna: Bihar Assembly Election Results | Mahagathbandhan's CM face and RJD leader Tejashwi Yadav says, "We are going to win. Thanks to everyone. A change is about to come. We are forming the government" pic.twitter.com/p6pVag0e96
— ANI (@ANI) November 14, 2025
Bihar Assembly Election Result LIVE Updates: विजयाचा आत्मविश्वास.. भाजपकडून जल्लोषाची जय्यत तयारी
बिहार निवडणूकीचा निकाल हाती येण्यास सुरूवात होण्यापूर्वीच दिल्लीतील भाजप मुख्यालयात जलेबी आणि कचोरी करण्याचं काम सुरू केलं आहे. एकप्रकारे बिहार निवडणूकीत जिंकण्याचा आत्मविश्वास भाजपला असल्याचं दिसून येत आहे.
Bihar Assembly Election Result LIVE Updates: बिहारच्या निवडणुकीतील 4 लक्षवेधी लढती, निकालाकडे अख्ख्या देशाचे लागलेय लक्ष
1. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सर्वेसर्वा आणि महागठबंधनचे उपमुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्यासाठी राघोपूरची जागा अत्यंत प्रतिष्ठेची आहे. राघोपूर विधानसभा मतदारसंघ हा दीर्घकाळापासून लालू कुटुंबाच्या राजकीय वारशाशी जोडलेला आहे. याच मतदारसंघातून लालू प्रसाद यादव आणि नंतर राबडी देवी यांनी विजय मिळवत राज्याला मुख्यमंत्री दिले. तेजस्वी यादव यांनीही येथूनच विजय मिळवत उपमुख्यमंत्रीपद भूषवले होते.
2. राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे मोठे चिरंजीव तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) जनशक्ति जनता दलातून निवडणूक लढवत आहेत. महुआ मतदारसंघात तेज प्रताप यांचा थेट मुकाबला राजदचे उमेदवार मुकेश कुमार रौशन यांच्याशी आहे. या मतदारसंघात एकूण १५ उमेदवार रिंगणात असून, यात लोजपा (रामविलास) कडून संजय कुमार सिंह आणि जन सुराज पार्टीचे इंद्रजीत प्रधान यांचाही समावेश आहे।
3. अलीनगर मतदारसंघात भाजपने प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूर यांना रिंगणात उतरवले आहे. मैथिली ठाकूर यांची ही पहिलीच निवडणूक आहे. तिचा सामना आरजेडीचे स्थानिक नेते विनोद मिश्रा यांच्याशी आहे. विनोद मिश्रा हे स्थानिक असल्याने, निवडणुकीदरम्यान मैथिली यांना 'बाहेरील उमेदवार' म्हणून लक्ष्य करण्यात आले होते. स्थानिक विरुद्ध बाहेरील या वादात कोण बाजी मारते, हे लवकरच स्पष्ट होईल।
4. बिहारचा सिंघम' म्हणून ओळख असलेले महाराष्ट्रातील मूळचे असलेले माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे या निवडणुकीत चर्चेत आहेत. त्यांनी मुंगेर ( आणि अररिया या दोन विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आहे. त्यांच्या या लढतीकडे प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांच्या कामावर प्रेम करणाऱ्या जनतेचे लक्ष लागले आहे।
Bihar election results 2025: बिहारमध्ये लाडकी बहीण ठरणार गेम चेंजर?
Bihar election results 2025: बिहारमध्ये लाडकी बहीण ठरणार गेम चेंजर?
Bihar election results 2025: नितीश कुमारांनी 20 वर्षांत बिहारला उद्ध्वस्त केले : काँग्रेस खासदार मनोज कुमार
बिहार निवडणुकीच्या निकालापूर्वी काँग्रेस खासदार मनोज कुमार यांनी नितीश कुमार यांच्यावर घणाघात केला. "बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या 20 वर्षांत बिहारला उद्ध्वस्त केले आहे. तुम्ही 10 हजार रुपये देऊन रोजगार देऊ शकता का? बिहारच्या लोकांनी मोठ्या संख्येने मतदान केले आहे, कारण त्यांना राज्यात बदल हवा आहे. मला विश्वास आहे की बिहारमध्ये महागठबंधनचे सरकार स्थापन होईल आणि तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री होतील."
#WATCH | Delhi | Ahead of the Bihar election result, Congress MP Manoj Kumar says, "...Bihar CM Nitish Kumar ruined Bihar in these 20 years. Can you provide employment by giving Rs 10,000?... The people of Bihar have voted in large numbers, as they want change in the state...I am… pic.twitter.com/kCRiG4W1x1
— ANI (@ANI) November 13, 2025
Bihar election results 2025: बिहारमधील 2616 उमेदवारांचे भवितव्य ठरणार
निवडणूक आयोगाच्या मते, बिहारमध्ये एकूण ७४,५२६,८५८ मतदारांची यादी आहे . २६१६ उमेदवार आणि १२ मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी पुनर्मतदानासाठी कोणतीही विनंती केली नाही . त्याचप्रमाणे, एसआयआर प्रक्रियेदरम्यान ३८ जिल्ह्यांमधील पक्षांकडून एकही अपील प्राप्त झाले नाही .
Bihar election results 2025: सकाळी 8 वाजता मतमोजणीला होणार सुरुवात
Bihar election results 2025: सकाळी 8 वाजता मतमोजणीला होणार सुरुवात
शुक्रवारी सकाळी 8 वाजता सुरू होणाऱ्या मतमोजणीसाठी आयोगाने संपूर्ण व्यवस्था केली आहे .
Bihar election results 2025: बिहारमध्ये 1951 नंतर सर्वाधिक मतदान
भारतीय निवडणूक आयोगाने ( ECI ) बिहार विधानसभा निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्याचे जाहीर केले आहे . बिहारमध्ये 1951 नंतर सर्वाधिक 67.13 टक्के मतदान झाले .