जाहिरात
Story ProgressBack

जेसीबी आणि रिक्षामध्ये धडक, भीषण दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू

Patna Accident: पाटणामध्ये जेसीबी आणि रिक्षाची एकमेकांना धडक बसून मोठा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत गंभीर स्वरुपात जखमी असलेल्या व्यक्तीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Read Time: 1 min
जेसीबी आणि रिक्षामध्ये धडक, भीषण दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू
पाटणामध्ये भीषण अपघात

Patna Accident: बिहार राज्यातील पाटणा (Patna Road Accident) शहरामध्ये भीषण अपघात झाला आहे. जेसीबी आणि रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या दुर्घटनेमध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. मंगळवारी (16 एप्रिल 2024) पाटणा येथील कंकडबाग पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामलखन मार्गावर हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे रिक्षेवरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा जाऊन थेट जेसीबीला धडकली. पाटणा मेट्रोच्या सुरू असलेल्या कामामध्ये या जेसीबीचा वापर केला जात होता.   

सात जणांचा जागीच मृत्यू

हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक व्यक्ती गंभीर स्वरुपात जखमी झाली आहे. जखमीवर हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरू आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि अपघाताचा तपास करण्यास सुरुवात केली.  

आणखी वाचा

जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमान खान पहिल्यांदाच घराबाहेर, बंदोबस्त किती? Watch Video

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या 2 आरोपींना गुजरातमधून अटक, क्राइम ब्रांचची मोठी कारवाई

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी कुठे व कशा आवळल्या? वाचा सविस्तर

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination