जाहिरात
This Article is From Apr 16, 2024

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी कुठे व कशा आवळल्या? वाचा सविस्तर

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या (Actor Salman Khan) गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करणारे दोन्ही आरोपी जवळपास महिनाभरापासून नवीन मुंबईतील पनवेल येथे एका घरामध्ये भाडेतत्त्वावर राहत होते. 

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी कुठे व कशा आवळल्या? वाचा सविस्तर
Salman Khan: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे आरोपी अटकेत

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या घराबाहेर (Salman Khan Galaxy Apartment Firing) रविवारी (14 एप्रिल 2024) गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. सोमवारी (15 एप्रिल 2024) रात्री उशीरा या दोघांनाही गुजरातमधील भूज परिसरातून अटक करण्यात आली. गुजरात पोलिसांनी मुंबई पोलिसांनी आरोपींच्या लोकेशनबाबतची महत्त्वपूर्ण माहिती दिली. यानुसार आरोपी कच्छ जिल्ह्यामध्ये असल्याचे पोलिसांना समजले. या माहितीच्या आधारे कच्छमधील स्थानिक गुन्हे शाखेला सूत्रांच्या मदतीने आरोपी मतानमध मंदिर परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाली. यानंतर परिसरात छापेमारी करून आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस तातडीने तेथे दाखल झाले. 
 

गोळीबार करणारे आरोपी कसे आणि कुठे पकडले गेले?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्याचे काम तातडीने सुरू केले. तपासादरम्यान आरोपी मुंबई-अहमदाबाद हायवेच्या दिशेने फरार झाल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हायवेवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आणि यासाठी सायबर एक्सपर्ट्सची मदत घेतली. यादरम्यान आरोपी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील भूज परिसरात असल्याची माहिती मिळाली. यानंतर मुंबई पोलीस स्थानिक पोलिसांच्या टीमसह तेथे पोहोचले. क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये दोन्ही आरोपींच्या मंदिर परिसरात मुसक्या आवळण्यात आल्या. विकी गुप्ता आणि सागर पाल अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील एकाच गावचे रहिवासी आहेत. या दोघांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली. 

आरोपी महिनाभर राहत होते पनवेलमध्ये  

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे आरोपी जवळपास महिनभरासाठी नवी मुंबईतील पनवेल परिसरामध्ये भाडेतत्त्वावरील घरामध्ये राहत होते. सलमान खानचे फार्महाऊस देखील याच परिसरात आहे. याप्रकरणी पोलिसांनी घरमालक, बाईकचा आधीचा मालक, बाईक विक्री करणारा एजंट आणि अन्य काही लोकांचीही चौकशी केली आहे. 

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, चाहते चिंतेत 

सलमान खानच्या घराबाहेर रविवारी (14 एप्रिल) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गोळीबार करून दोन आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान ताब्यात घेण्यात आलेली बाईक पनवेलमधील एका रहिवाशाच्या नावे नोंद आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या एका टीमने तेथे जाऊन बाईकच्या मालकासह अन्य लोकांचीही चौकशी केली. 

दरम्यान सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी बाईक परिसरातील चर्चजवळ सोडली आणि काही अंतर चालून त्यांनी रिक्षेतून वांद्रे रेल्वे स्टेशन गाठले. तेथून बोरिवलीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये आरोपी बसले, पण सांताक्रूझ रेल्वे स्टेशनवर उतरून ते स्टेशनच्या बाहेर आले.  

दरम्यान या घटनेमुळे सलमान खानचे कुटुंबीय आणि चाहते चिंतेत आहेत.

आणखी वाचा

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या 2 आरोपींना गुजरातमधून अटक, क्राइम ब्रांचची मोठी कारवाई

जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमान खान पहिल्यांदाच घराबाहेर, बंदोबस्त किती? Watch Video

सलमान खानची सुरक्षा वाढवा, गोळीबारानंतर थेट PM मोदींकडे मागणी
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com