जम्मू-काश्मीरमधील भाजप उमेदवाराचं निधन, 25 सप्टेंबरला झालं होतं मतदान

Jammu Kashmir News : मुश्ताक अहमद शाह बुखारी यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये नॅशनल कॉन्फरन्ससोबतचा त्यांचा चार दशकांचं नांत तोडलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या तिन्ही टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आहे. आता 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. मात्र निकालाआधीच भापला धक्का बसला आहे.  जम्मू आणि काश्मीरचे माजी मंत्री  आणि भाजपचे सुरनकोटचे उमेदवार मुश्ताक अहमद शाह बुखारी यांचं बुधवारी (2 ऑक्टोबर) निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने बुखारी यांचं निधन झालं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

मुश्ताक अहमद शाह बुखारी हे 75 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, बुखारी यांची तब्येत मागील अनेक दिवसांपासून खराब होती. दरम्यान सकाळी 7 वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचं निधन झालं.

(नक्की वाचा-  मविआच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला NDTV मराठीच्या हाती, कोणाच्या वाट्याला किती जागा?)

सुरनकोटचे दोन वेळा आमदार राहिलेले बुखारी यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये केंद्राने त्यांच्या पहाडी समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना सुरनकोटमधून रिंगणात उतरवण्यात आले होते, जे 25 सप्टेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात इतर 25 मतदारसंघांसह मतदान झाले होते.

(नक्की वाचा-  - युद्ध पेटणार! इस्रायलच्या भीतीने इराणमध्ये नागरिकांच्या पेट्रोल पंपांवर लांब रांगा)

मुश्ताक अहमद शाह बुखारी यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये नॅशनल कॉन्फरन्ससोबतचा त्यांचा चार दशकांचं नांत तोडलं होतं. पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्याशी पहाडी समुदायाला अनुसूचित जमातीच्या दर्जाबाबत मतभेद झाल्याने त्यांनी पक्ष सोडला.

Advertisement

Topics mentioned in this article